मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कॉफीचं कॅथार्सिस अर्थात चिडचिड-ए-सोमवार

आदूबाळ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
अरबट कॉफी चरबट कॉफी | कागदाच्या कपात करपट कॉफी || डोक्याची ग्रेव्ही, इनबॉक्सचं मटण | कॅफेनची किक, बुळबुळीत बटण | पहिला ढकलतोय, चारच बाकी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||१|| परीट घडी, टायचा बावटा | आकड्यांची उसळ, एक्सेल पावटा | बॉस निकम्मा, टीम पापी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||२|| पायांची घडी, मांडीवर पोट | अप्रेझल मीटिंग, बोका भोट | परफॉर्मन्स मदिरा, रेटिंग साकी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||३|| गारगिट्ट पोळ्या, बकाबकाबका | सिग्रेटचा धूर, फकाफकाफका | पगार, पीएफ, बोनस टॉफी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||४||

वाचने 8039 वाचनखूण प्रतिक्रिया 29

प्रचेतस 20/01/2014 - 20:26
जबरा. अशोककुमारांची 'रेलगाडी' आठवली.

In reply to by प्रचेतस

सस्नेह 22/01/2014 - 22:28
आणि मर्ढेकारी थाट्सुद्धा ! बाकी, इतकी वर्षे कॉफी पितेय पण कधी अरबट चरबट किंवा करपट नाही बॉ लागली. अरभाटच लागली प्रत्येक वेळी !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 20/01/2014 - 20:27
आवडेश. -दिलीप बिरुटे

पैसा 20/01/2014 - 22:54
भयानक्,हास्य, करूण सगळे रस अगदी नीट उतरलेत!
होई सायंकाळ, ऑफिस खलास| रिचवा रेडवाईन, हातात ग्लास|| रंगबेरंगी ढग, हवेत गारवा| फ्रेश होऊन आता, ऐका मारवा|| डोक्यावरून फिरेल मायेचा हात| वाईट परिस्थिती वर कराल मात|| सुख दु:ख हे असेच येईल अन जाईल| जन्म जन्मांतर हे नाते टिकून राहील|| आपला मिपास्नेही :आयुर्हीत

आतिवास 21/01/2014 - 07:41
आवडली.

आदूबाळ 21/01/2014 - 20:28
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार! कमीत कमी ओळींत जास्तीत जास्त चिडचिड ठासण्याच्या नादात थोडी दुर्बोध झाली - तथास्तु यांची सूचना रास्त आहे!

जॅक डनियल्स 21/01/2014 - 20:33
लैच भारी झाले आहे. हे लिहीताना पण हातात "अरबट कॉफी चरबट कॉफी" चाच कप आहे. क्याफिन धोसल्या शिवाय डोक्याची चक्रे फिरतच नाहीत.

राजेंद्र मेहेंदळे 21/01/2014 - 20:45
मंडे सीकनेस मस्त पकडलाय. बरे झाले सोमवारी सकाळी कविता वाचली नाही...डोक्याची मंडई झाली अस्ती. (कृ. ह. घ्या) अवांतर-- कोणत्यातरी ऐटी कंपनीत काम करता काय?

चाणक्य 21/01/2014 - 23:06
झकास झालीये. टोटल भा.पो.

नाखु 22/01/2014 - 08:46
ना लांबड ना क्रमशः ची जिल्बी सगळ एका झटक्यात (थेट)... "तुमचं आमच सेम असते" अ‍ॅप्रेझल दिंडीतला "वारकरी"

चित्रगुप्त 22/01/2014 - 08:51
मस्त. (तो मायेचा हात कुणाचा, तेवढं सांगा).

In reply to by चित्रगुप्त

आयुर्हित 22/01/2014 - 10:13
अर्थात आपल्याला समजून घेणाऱ्या प्रिय व्यक्तीचाच !(ती प्रिय व्यक्ती कोण हे प्रत्येकाने आपल्या categery प्रमाणे ठरवावे!)

विटेकर 22/01/2014 - 10:41
आवडली.. मर्ढेकरांचे उंदीर "पिपात मेले" आणि आपले "कपात मरताहेत" .. हाच काय तो फरक ! आयुष्य " आयटी" असले तरीही "बेकेलायटी" आहे हेच जास्त खरे आहे ! उत्तम !

म्हैस 22/01/2014 - 12:05
लय भारी.
बॉस निकम्मा, टीम पापी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||२||
हे जास्त

प्यारे१ 22/01/2014 - 18:47
आवडली. टाय सूट काढा नि जीन्स शर्ट हेल्मेट घाला. नॉन ऐटी असूनही सहमत. - 'आप बहुत ज़्यादा होपलेस काम कर रहे हो' चं पालुपद सगळ्यांना ऐकवणार्‍या बुडबत पांडेचा सबार्निडेट