योगी पावन मनाचा
In reply to +१ by अत्रुप्त आत्मा
In reply to चरकात कोण नाही? by कवितानागेश
In reply to धन्या.. रसाळ आणि सुंदर by गवि
धन्या.. रसाळ आणि सुंदर लिहिलंयस.अलबत! पण एखादी गोष्ट लिखित आहे हा ती वास्तवअसाण्याचा बेस नसतो रे...... कारण लार्ड ऑफ़ द रिंग्ज सुध्दा लिखीत आहे
In reply to धन्या.. रसाळ आणि सुंदर by बर्फाळलांडगा
In reply to लेख मुक्ताईच्या ताटीच्या by बाळ सप्रे
अशा कथा रंगवायला १४०० वर्षाचे चांगदेव वगैरे अतिशयोक्तिची खरंतर गरजच पडु नये.सहमत. मी हे टाळू शकलो असतो.
या वयात वादळात वीज पडुन झालेला तिचा अंत फार करुण आहे.. त्या घटनेला आदिमायेत विलिन वगैरे न वाटता एका महान प्रतिभेच्या व्यक्तिचा अकाळी झालेला शेवट वाटतो..मुक्ता आदिमायेत विलीन झाली असं सांगणं हा कथाकारांच्या कथा सांगण्याचा भाग झाला. ज्ञानदेवांचं आयुष्य एकवीस वर्षांचं होतं. त्यामुळे मुक्तेचा जेव्हा वीज पडून अंत झाला तेव्हा ती सतरा-अठरा वर्षांपेक्षा मोठी नसेल. वयाच्या नऊ दहाव्या वर्षी ताटीच्या अभंगांसारखं काव्य लिहिणार्या व्यक्तीमत्वाचं असं अकाली जाणं ही दुर्दैवी घटना होती.
In reply to एका चांगल्या धाग्याचं by यशोधरा
In reply to बर्फाळ लांडगा हे संजय by मारकुटे
In reply to मला ज्ञानेश्वरां बद्दल काही by काळा पहाड
१. समाधी घेतली म्हणजे नक्की काय?ज्ञानदेवांनी समाधी घेतली याचा सर्वसामान्यांमध्ये रुढ असलेला अर्थ "ज्ञानदेवांनी जिवंत समाधी घेतली" असा आहे. संत नामदेव हे ज्ञानदेवांचे समकालीन संत तसेच ज्ञानदेवांचे आदय चरीत्रकार होत. दोघेही अगदी पंजाबापर्यंत एकत्र प्रवास करुन आले होते. नामदेवांनी ज्ञानदेवांच्या समाधी प्रसंगाचे वर्णन आपल्या अभंगांमधून केले आहे. हे अभंग "समाधीचे अभंग" म्हणून ओळखले जातात. हे अभंग कुठल्याही धार्मिक पुस्तकं विकणार्या दुकानात "समाधीचे अभंग" याच नावाने मिळतील. ज्ञानदेवांच्या समाधी संदर्भात वेगळा दृष्टीकोन मु. रा. कुलकर्णी लिखीत "श्रीज्ञानदेवांचा मृत्यू" या पुस्तकात वाचायला मिळतो. लेखकाच्या मते संतांच्या मृत्यूला स्थूल मानाने "समाधी" म्हणण्याचा प्रघात आहे. त्यामुळे नामदेवांनी वापरलेला समाधी हा शब्दही असाच मृत्यू या अर्थी वापरला आहे असं लेखकाचं मत आहे.
समाधीची गरज काय होती? कार्य संपलं म्हणजे काय? समाज सुधरला होता का? की ज्ञानेश्वरांचं फक्त आणि फक्त कार्य ज्ञानेश्वरी लिहिणं हेचं होतं? आणि हे त्यांनी कशाच्या आधारावर ठरवलं?या प्रश्नांचा हेतू माहिती मिळवणं हा आहे असं वाटत नाही. काहीही असलं तरी या प्रश्नांची उत्तरे ज्ञानदेवांच्या काळानंतर आठशे वर्षांनंतर कुणीच देऊ शकणार नाही.
२. समाधी घेतल्या ठिकाणी सध्या काय असेल?आधूनिक तंत्रज्ञानाने हे तपासता येईल असं काहींचं म्हणणं होतं. मात्र श्रद्धावानांनी विरोध केल्यावर पुढे काही झालं नाही. अर्थात ही ऐकीव माहिती आहे. त्यात कितपत तथ्य आहे हे नाही माहिती.
३. चारिही भावंडं इतक्या लहान वयात एवढं मॅचुअर्ड कसं लिहू शकतात? मी एक समजू शकतो. पण चारिही?दिलजले नावाच्या अजय देवगण अभिनीत एका टुकार चित्रपटातील "हो नही सकता" या गीताच्या आधीच्या संवादातील एक वाक्य आहे, "होनेको तो कुछ भी हो सकता हैं मेरे श्याम". जोक्स अपार्ट, सारी सख्खी भावंडं समजूतदार, प्रतिभावंत उपजणं आणि आई वडीलांच्या संस्कारांनी त्यांची आयुष्ये सोन्यासारखी झळाळून निघणं ही अशक्य गोष्ट नाही.
४. या चारिही भावंडांचं आयुष्य एक प्रकारे ट्रॅजेडीच नाही का? मग ते देवाचे अंश कसे समजता येतील?ट्रॅजेडीच होती ती. सामान्य माणसाच्या कुवतीपलिकडची वाटणारी एखादी "असामान्य" गोष्ट एखादयाने केली की त्याचा देव बनवून त्याची पूजा करायची ही गोष्ट माणसाला नविन नाही. संत कान्होपात्रेच्या एका अभंगातील पहिली ओळ अशी आहे: शिव तो निवृत्ती, विष्णू ज्ञानदेव पाही । सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई।।
५. जर त्या वेळच्या समाजानं या भावंडांना त्रास दिला तर त्यांचं लिखाण कसं जपलं?त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या दिवसांमध्ये या गुणी भावंडांच्या विद्वत्तेने, प्रतिभेने आणि समजूतदारपणाने प्रभावीत होऊन हा त्रास निवळला असावा. ज्ञानदेव हे महाराष्ट्राला आठशे वर्षांपूर्वी पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं. मग कुणी त्यांना अवतार म्हणो वा ज्ञानियांचा राजा.
In reply to १. समाधी घेतली म्हणजे नक्की by धन्या
In reply to १. समाधी घेतली म्हणजे नक्की by धन्या
In reply to हा प्रतिसाद बाकी खूपच आवडला. by बॅटमॅन
In reply to १. समाधी घेतली म्हणजे नक्की by धन्या
In reply to १. समाधी घेतली म्हणजे नक्की by धन्या
ज्ञानदेव हे महाराष्ट्राला आठशे वर्षांपूर्वी पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं. मग कुणी त्यांना अवतार म्हणो वा ज्ञानियांचा राजा.
हे वाक्य तर त्यावरचा कळस आहे !!In reply to १. समाधी घेतली म्हणजे नक्की by धन्या
In reply to धन्यवाद. प्रतिसाद आवडला. by काळा पहाड
In reply to धन्यवाद. प्रतिसाद आवडला. by काळा पहाड
In reply to माहितीकण : by प्यारे१
In reply to एक शक्यता! by अत्रुप्त आत्मा
In reply to एक शक्यता! by अत्रुप्त आत्मा
In reply to बब्बौ वेद रेड्याने खरच म्हटले असतील by बर्फाळलांडगा
In reply to माहितीकण : by प्यारे१
In reply to अवतार. by अर्धवटराव
In reply to अवतार. by अर्धवटराव
अवतार, विभूती म्हणजे ज्यांना दु:ख शिवत नाहि असं काहिसं व्यक्तीमत्व आपल्यापुढे येतं आणि त्यात चमत्कारीक काहितरी शोधण्याचा आपण प्रयत्न करतो. पण त्यांना दु:ख शिवत नाहि असं होत नसतं, तर त्यांच्यात दु:ख (आणि सुख देखील) स्विकारायची, पचवायची असामान्य क्षमता असते हे लक्षात घेतलं पाहिजे. इतरांप्रमाणे ते देखील संसार सागरात बुडलेले असतात, फक्त त्यांची मान पाण्याच्या वर असते.या धाग्यावर खुप चांगले विचार प्रतिसादातून वाचायला मिळाले. त्यापैकी हा एक सुंदर विचार आहे.
In reply to अवतार. by अर्धवटराव
In reply to अतिशय सुंदर . by म्हैस
तुम्हा पामरात एक वाक्यता नाहीकोणाशी १ वाक्यता ठेवावी असं कुणीही मला इथे दिसत नाहीये.
विधान जर हाई लाईट केले तर तुम्हा पामरान्ना समजे पर्यंत व्यवस्थित स्पष्टीकरण देइन.हे अभंग लिहले मुक्ताईने साक्षात ज्ञानेश्वरांसाठी.. तो त्यांचा अधिकार सांगितली गीता श्रीकृष्णाने अर्जुनासाठी...तो ही त्यांचा अधिकार तुम्ही आम्ही हे का वाचतो अन वरून छान आहे म्हणतो... ? थोडक्यात सांगणारा अन ऐकणारा ज्या भावावस्थेत आहे त्याचा संदर्भ नसूनही आपण त्याला अनुमोदन देतो. कारण मोठी गुंता गुंत आहे. उदा.. जोकपाल हिशोबनिस समजतो तो ज्ञानेश्वर आहे अन मिपाकर त्याला छळणारि जनता म्हणुन तत्वज्ञान न पटुनहि तो फार छान आहे म्हणतो. काय विरोधाभास आहे.... प्रत्येकाचे कारण वेगळे आहे पण लिहणारा अन वाचणारा दोघेही चान चान म्हणत आहेत शंका येते ही तीच जमात का जी याच क्षणात तत्वापेक्षा अस्तित्व महत्वाचे म्हण्त जगणार आहे? ह्या प्रतिसादात नक्की काय म्हणायचंय ते समजला नाही. आणि ह्या नंतरचेही २-३ प्रतिसाद समजले नाहीत
आपल्या पोरांनी लहान वयातच काय पण वयाच्या सत्तराव्या वर्षीही असे आणि इतके प्रौढ अन पोक्त विचार करु नयेत अशी इच्छा मनात भरुन येते.थोडक्यात आपल्या पोरांना सत्याची जाणीव कधी होऊ नये अशी इच्छा मनात भरुन येते
In reply to तुम्हा पामरात एक वाक्यता नाही by म्हैस
In reply to मी तुम्हाला विचारलं होतं by म्हैस
+१