चित्रकला
लहानपणी चित्र काढायला खुप आवडायचे वहिची बहुतेक पाने चित्रांनीच भरलेली असायची. काही वेळा छड्या मिळायच्या तर काहीवेळा शाब्बासकी पुढे बाकीच्या व्यापामुळे चित्र काढणे थांबले सरावही बन्द झाला पण मधेच केव्हातरी लहर येते आणि अशी चित्र साकारतात
आनि हे चित्र गावी मंदिरासमोर रांगोळीतुन काढले
आनि हे चित्र गावी मंदिरासमोर रांगोळीतुन काढले
लेखनविषय:
वाचने
54563
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
क्षमस्व, काढलेली चित्रे टाकायला जमली नाही
In reply to क्षमस्व, काढलेली चित्रे by अनिल तापकीर
खूपच सजीव आणि सुन्दर.... :)
कुठे आहे चित्र? दिसत नाहिये.
चित्रे अगदी लहान झालेली दिसताहेत. त्यांचा साईझ वाढवावा मग दिसतील.
आणि मला विठ्ठलाचा दर्शन झालं !
|| पांडुरंग पांडुरंग ||
In reply to १०००% झूम केला by कपिलमुनी
मला ५००% मध्येच विठ्ठल दिसला. मी तुझ्यापेक्षा जास्त पुण्यवान हेहे हेहे! हेहे हेहे!!
In reply to मला ५००% मध्येच विठ्ठल दिसला. by बॅटमॅन
५०० % मधे मला विठ्ठल तर दिसलाच, शिवाय त्याच्यामागे जीन्स घातलेले पायही दिसले! ते पण विठ्ठलाचेच असतील तर मी महापुण्यवान!
In reply to पाय by तिमा
राईट क्लिक करून मग "Open image in new tab" करा... है काय नी नै काय ! ...
पण अनिल तापकीर साहेब तुम्हाला ही width="10" वापरून चित्रे टाकायची विद्या कोणत्या गुरूने शिकवली ?
In reply to मला ५००% मध्येच विठ्ठल दिसला. by बॅटमॅन
मला झूम न करताच (नेहमीच्या सेटिंगला) दिसली विठुमाऊली ;-)
In reply to मला झूम न करताच (नेहमीच्या by आतिवास
तुम्हीच टॉपर पुण्यवान!!!
(तसे आम्हीही पुण्यवान पण हे नंतर लक्षात आलं =)) )
सुंदर आहे.
(चौकटीवर उजवे क्लिक करुन नव्या खिडकीत चित्र उघडले तर दिसले)
पण रखुमाई कुठे गेली? :-)
In reply to सुंदर आहे. by आतिवास
पयल्या चित्रातला धनुर्धारीपण आवडेश. त्याच्या पाठीवर दोन भाते दिसताहेत ते इनोव्हेशनही आवडलं.
In reply to +१ by बॅटमॅन
त्या मागच्या चौकटींनी रसभंग केला :-(
मस्त हो एकदम आवडले. फोटोची कॉपी करून काढलेल्या रंगोली पेक्षा हां इठोब्बा शंभर पट सुन्दर आहे. अगदी मोराच्या पिसासह. भवसागर अन एक भक्त पण दिस्ल्याचा भास् झाला.
योग्य तो बदल करून चित्रे अपडेटवली आहेत.
छान आहेत. :)
रामाचे चित्र छान आहे. पण त्याच्या गळ्यात जानवे आहे का? जानवे असेल तर ते उलटे घातलेय. जानवे डाव्या खांद्यावरुन घालतात.
दुसर्या चित्रात तो उंबरा आणि जीन्सवाला पाय यायला नको होता. बाकी मस्त आहे रांगोळी!
In reply to रामाचे चित्र छान आहे. पण by परिंदा
होउ द्या धूर !!
In reply to रामाच्या गळ्यात जानवे ? by कपिलमुनी
पण हर्कत काय आहे? जानवे हे त्रैवर्णिकांना अलाउड असते. एकट्या ब्राह्मणांची मक्तेदारी नाहीये ती.
In reply to रामाचे चित्र छान आहे. पण by परिंदा
जानवे डाव्या खांद्यावरुन घालतात.हे चित्र सव्य अपसव्याच्या वेळी काढले असावे. धागाकर्त्यासः आता ग्राफ वगैरे टाकून चित्र रेखाटण्याऐवजी डायरेक्ट काढण्याचा सराव करावा.
In reply to सव्य अपसव्य by चित्रगुप्त
>>हे चित्र सव्य अपसव्याच्या वेळी काढले असावे.
नॉट नेसेसरी. राम आरशात पाहतानाचं असेल चित्र!! ;)
सर्वांना धन्यवाद
आणि वल्लीजी तुमचे मनापासुन आभार चित्र व्यवस्थित केल्याबद्दल
पहिले चित्र विहिंपच्या रामायण पुस्तकाच्या मुखचित्रावरुन प्रेरित आहे काय ?
(मला तसे वाटले कारण मीही त्या चित्रावरुन असे मोठ्ठे चित्र काढले होते )
विठोबाची रांगोळी उशीरा दिल्यामुळे स्पर्धेत घेता आली नव्हती. दुसरं चित्र छान आहे. स्केल करून एखाद्या चित्रावरून काढलंय का? त्या स्केलसाठी काढलेल्या रेषा पुसून टाकायला हव्या होत्या.
पहिल्या रेखा चित्रातील दंडात येणारी बेडकी (|muscle) कोपराच्या पुढे सरकलेका दिसतोय. नको एवढे पुढे सकराकयचे ही पुणेकर दुचाकीवाल्यांची सवय त्या मसलला लागली की काय ?
धन्यवाद पैसा आणि चौकटराजा पैसाजी मला माहित होते की मी स्पर्धेसाठी उशिर केलाय तरीपण असेच ते विठ्ठ्लाचे चित्र टाकले होते. धन्यवाद
मला अजुन एक श्रीक्रुष्णाचे चित्र टाकायचे आहे पण ते जमत नाही क्रुपया कोणितरी व्यवस्थित मराठीमधे माहिती द्या
छान आहे…
धनुश्यापेक्षा बाण छोटा झाला वाटतंय…
आणि रांगोळी फोटोचा यांगल अजून निट असता तर डिटेलिंग दिसले अस्ते…
छान
सुरेखच !
सुरेख ! :)
विठ्ठलाची रांगोळी मस्त आहे आणि 'सुंदर ते ध्यान' पण मस्त लिहिलंय :)
धन्यवाद
क्षमस्व, काढलेली चित्रे