मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नविनच

मिसळलेला काव्यप्रेमी · · जे न देखे रवी...
काव्यरस
पावसात भिजूनही मी कोरडाच राहणे हे जरा नविनच होते चिंब होऊनही मी धुंद न होणे हे जरा नविनच होते . हा कुठला नवा खेळ? . दाटून येता 'तो' जीव असा हुरहुरतो 'तो' येताच दारचा निशिगंध बहरतो ढग फुटून 'तो' असा काही बरसतो त्या गंधाने मी आकंठ मोहरतो . नेहमी हा पाऊस येतो आणि मी शुद्ध हरवतो सचैल भिजून भान हरपतो कोसळणाऱ्या मेघधारांनी माझे सूर भिजतात हृदयात मेघमल्हाराची गाज उमटू लागते मनात वसंत रुंजी घालाया लागतो मग आजच असे का व्हावे? . हा वर्षाव कोरडा का वाटावा कां आज मी ओथंबत नाही नेहमीसारखा . . हम्म... आज ह्या पावसाची दिशाच चुकली होती तो तुझ्या घराला टाळून आला होता हे जरा नविनच होते.... नविनच... |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (एक जुनी रचना)

वाचने 5207 वाचनखूण प्रतिक्रिया 19

काही गोष्टी जुन्या होतच नाहीत. स्मृतीतून जगाकडे पाहायची सवय सोडली तर सगळं नवं असतं. तसा हा पाऊस. जगजीतची एक गज़ल आहे : दुनिया जिसे कहेते है जादूका खिलौना है, मिल जाए तो मिट्टी है, ...खो जाए तो सोना तुझ्या कवितेच्या आशयाशी संगती सांगणार्‍या, गज़लेतल्या या ओळी आठवल्या: बरसातका बादल तो दिवाना है क्या जाने किस छत को भिगोना है,... किस राहसे बचना है दुनिया जिसे कहेते है जादूका खिलौना है।

तिमा Wed, 01/08/2014 - 11:39
कवितेचा आशय आवडला. पण नेहमीचे 'फिनिशिंग' वाटले नाही. थोडीशी विस्कळीत वाटली.