आपण सगळेच जाणतो, की, जर व्यायाम ही नाण्याची एक बाजू असेल, तर दुसरी बाजू अर्थातच सकस आहार आहे. सकस आहाराचा एक अविभाज्य भाग म्हणजे प्रथिनं. आपल्या शरीराला (पुरेसा व्यायाम करत असल्यास) प्रतिदिन १ ग्रॅम प्रति किलो (६० किलो वजन असलेल्या व्यक्तीला प्रतिदिन ६० ग्रॅम प्रथिनं) इतकी प्रथिनांची गरज असते. शरीरसौष्ठव, वजनवाढ किंवा इतर विशेष उद्दिष्ट असल्यास १.५ ग्रॅम प्रति किलो.
आता, शाकाहारीं मंडळींना प्रथिनांची गरज भागवण्याचे स्त्रोत कमी असतात. कम्प्लीट प्रोटीन जे म्हणतात ते शाकाहारात फार कमी मिळतं. त्यामुळे वेगवेगळ्या स्त्रोतांतून प्रथिनं शरीरात जावी लागतात. शाकाहारी मंडळींची प्रथिनांची गरज भागवणारा एक मस्त पदार्थ म्हणजे पीनट बटर. हे आपल्याकडे तसं कमी प्रचलित आहे. या पीनट बटर चं माझं व्हर्जन मी तयार केलंय, ते तुम्हाला सांगतो.
साहित्य:
२ वाट्या भाजलेले दाणे
१/२ वाटी बदाम
१ वाटी ओट्स (ओव्हन मधे ४० सेकंद भाजून घ्या)
१/४ वाटी तीळ
१/२ वाटी डाळं (भाजलेली चणाडाळ)
साधारण १-१/२ वाटी तिळाचं तेल
१/२ वाटी चॉकलेट किंवा कोको पावडर
कृती:
प्रथम दाणे, बदाम, डाळं, ओट्स, व तीळ मिक्सर मधे ३-४ वेळा फिरवून बारीक पावडर करून घ्या. मग त्यात कोको पावडर किंवा चॉकलेट घालून पुन्हा एकदा फिरवून घ्या. मग अंदाजाने तेल घालत मिश्रण मिक्सरमधे फिरवत रहा, जोवर मिश्रणाला चटणीइतपत प्रवाहीपणा येत नाही.
सकस, प्रथिनांनी भरपूर, ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स ने भरपूर असं पीनट बटर (माझं व्हर्जन बरं का) तयार आहे.
पोळीला लावून गुंडाळी खा, किंवा पावाला लावून सॅंडविच खा, किंवा व्यायामाच्या आधी/नंतर एक मोठा चमचा चवनप्राश सारखं खा....छान लागतं. नक्की कळवा कसं वाटलं.


वाचने
22322
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकदम मस्त !!!
यात मीठ नाही का?
नाही; आवश्यकता नाही आणि
In reply to यात मीठ नाही का? by कवितानागेश
मस्त पाकृ !!
मिक्सरमध्ये फिरवताना तेल
In reply to मस्त पाकृ !! by सूड
अगदी बरोबर
In reply to मिक्सरमध्ये फिरवताना तेल by कवितानागेश
सुटतं.
In reply to मिक्सरमध्ये फिरवताना तेल by कवितानागेश
पाकृ आवडली
निश्चित
In reply to पाकृ आवडली by सानिकास्वप्निल
ओट्स म्हणजेच मराठीत जवस
In reply to निश्चित by वेल्लाभट
जवस म्हणजे ओट्स नाही ओ
In reply to ओट्स म्हणजेच मराठीत जवस by वेल्लाभट
बर मग हे ही बघा बरं...
In reply to जवस म्हणजे ओट्स नाही ओ by सानिकास्वप्निल
मी हे वापरलं...
In reply to बर मग हे ही बघा बरं... by वेल्लाभट
ओट्स ला हिंदित
In reply to मी हे वापरलं... by वेल्लाभट
झकास रे दोस्ता!
मस्तच!
मस्त
याची चव साधारण कशी लागते?
शेंगदाणे
In reply to याची चव साधारण कशी लागते? by त्रिवेणी
मस्त पाक्रु करणेत येईल.
'क्वार्क' म्हंजे??
In reply to मस्त पाक्रु करणेत येईल. by इष्टुर फाकडा
हे बघाhttp://en.wikipedia.org
In reply to 'क्वार्क' म्हंजे?? by सूड
ही लिंक काही भलतंच दाखवत आहे.
In reply to हे बघाhttp://en.wikipedia.org by इष्टुर फाकडा
गुगलून बघा आणि गुगलोबाने सर्च
In reply to ही लिंक काही भलतंच दाखवत आहे. by परिंदा
Quark
In reply to गुगलून बघा आणि गुगलोबाने सर्च by सूड
छान
नुसतेच पीनट बटर खाल्ले आहे.
मस्त दिसतं आहे! पुण्यात कधी
अगदी !
In reply to मस्त दिसतं आहे! पुण्यात कधी by यशोधरा
छान पाकृ.
आपल्या सांगण्याप्रमाणे पीनट
स्वयंपाकाच्या ओट्यावर हळदीचे
In reply to आपल्या सांगण्याप्रमाणे पीनट by सूड
@स्वतःच वाघा बॉर्डर खुली करून
In reply to स्वयंपाकाच्या ओट्यावर हळदीचे by बॅटमॅन
लई बेस झालंय की ! एन्जॉय.....
In reply to आपल्या सांगण्याप्रमाणे पीनट by सूड
ओक्के. धन्यवाद वेल्लाकाका!!
In reply to लई बेस झालंय की ! एन्जॉय..... by वेल्लाभट
..पण त्यामुळे कार्बोरेटर
In reply to ओक्के. धन्यवाद वेल्लाकाका!! by सूड
कार्बुरेटरच्या धाग़्यावर नख़े
In reply to ओक्के. धन्यवाद वेल्लाकाका!! by सूड
हायला!! मस्त चमकतंय दाण्याचं
In reply to आपल्या सांगण्याप्रमाणे पीनट by सूड
मस्त...
In reply to आपल्या सांगण्याप्रमाणे पीनट by सूड
मी चुकुन "पनीर बटर" असे वाचले
उत्तम आणि सकस (हेल्थि) पदार्थ!
नक्कीच.... धन्यवाद
In reply to उत्तम आणि सकस (हेल्थि) पदार्थ! by आयुर्हित
किती दिवस टिकते हे ?
शीतकपाटात अनेक दिवस. महिनाभर
In reply to किती दिवस टिकते हे ? by स्पा
आणि खपलं नाही समजा, तर
In reply to किती दिवस टिकते हे ? by स्पा
कुल
मस्त कृती. बाजारात मिळणार्