गपचिप
लेखनप्रकार
आमची आई येकदम वाईट.
च्या काय देत नाही कदी.
ही मोटी मान्सं बरी च्या पित्यात. आमाला मात्र न्हाई.
आण्णा म्हन्त्यात, “चहा नको पिऊ; काळी होशील.”
त्यादिशी पाटीलकाका आल्ते. आई च्या दिऊन बोलत बसली तितचं.
मला म्हन्ली, “बेटा, तेवढी कपबशी आत नेऊन ठेव मोरीत. न फोडता ने.”
आता पावणे होते; तेंच्यासमोर आईचं ऐकाया पायजे ना! वाईट असली ती तरी!
पाटीलकाकांनी कपात उलिसा च्या तसाच ठुला व्हता.
म्या पिऊन टाकला तो गपचिप.
येकदम झ्याक.
तवापासून आले पावणे, की उचल कपबशी ...
प्या च्या.....
पावणे नाय आले तर?
म्या रस्त्यावर जाऊन कुणालाबी सांगतिया “आई-आण्णा बोलावत्येत” म्हनूनशान.
आई करतेच च्या.
म्याबी पिते.
उलिसा.
गपचिप.
* शतशब्दकथा
वाचन
31211
वाचनखूण
प्रतिक्रिया
65
:)
कथा आवडली हाय .
लै भारी ! ही पोर लै चॅप्टर
In reply to लै भारी ! ही पोर लै चॅप्टर by डॉ सुहास म्हात्रे
एकदम खरं हाय.
कथा आवडली.
पोर लय गुणाची
(No subject)
आवडेश!
काय ट्याक्ट तरी
In reply to काय ट्याक्ट तरी by बॅटमॅन
आंजीच हाय न्हव ही.
In reply to आंजीच हाय न्हव ही. by अभ्या..
आंजी?
In reply to आंजी? by प्यारे१
ढेप?
In reply to ढेप? by आतिवास
(No subject)
In reply to आंजीच हाय न्हव ही. by अभ्या..
आवचिंदर
झ्याक हाये…
मस्त लिहिलंय!
आवडली गोष्ट
गपचिप. टाळी घ्या!!
लै भारी!!!
मस्त...
(No subject)
आंजी थोडी मोटी जाली की
आवड्ली
आवडली
एवढी छोटि का कथा अजुन जरा
In reply to एवढी छोटि का कथा अजुन जरा by युगन्धरा@मिसलपाव
धन्यवाद.
(No subject)
(No subject)
ओके माहितच न्हवत मला असाही
भारीच!
या पोरीचा..
वाटलं नव्ह्तं वं पोट्टे
In reply to वाटलं नव्ह्तं वं पोट्टे by जयनीत
इचक?
In reply to इचक? by आतिवास
लई ऊचक वाचक करते पोट्ट!!!
In reply to लई ऊचक वाचक करते पोट्ट!!! by जयनीत
आमच्या विदर्भात हा शब्द खुप
आमच्या विदर्भात हा शब्द खुप वापरला जातो बदमाश पोट्टे लोकाई साठी म्हनुनशान तसं म्हटलं:-) शब्द वापराबद्दल काहीच नाराजी नाही हो, शब्द मला माहिती नव्हता म्हणून त्याचा अर्थ विचारला इतकंच. शब्द या प्रसंगाला चपखल बसतो आहे हे वेगळे सांगायला नको :-)In reply to आमच्या विदर्भात हा शब्द खुप by आतिवास
नाही हो, तुम्ही फक्त शब्दाचा
In reply to आमच्या विदर्भात हा शब्द खुप by आतिवास
इचक..
In reply to इचक.. by चिगो
अरे वा! एकदम बरेच नवीन शब्द
In reply to इचक.. by चिगो
इचक हा शब्द नवीन होता. बाकी
In reply to इचक हा शब्द नवीन होता. बाकी by बॅटमॅन
मख्या..
In reply to इचक हा शब्द नवीन होता. बाकी by बॅटमॅन
इपितर मराठवाड्यात पण चालते.
In reply to इपितर मराठवाड्यात पण चालते. by अभ्या..
गैबती
In reply to इपितर मराठवाड्यात पण चालते. by अभ्या..
हाहाहा गहिन्या, गाबड्या हे
In reply to इचक.. by चिगो
>>>इपित्तर
आवडली
आभार
:-)
In reply to :-) by जयंत कुलकर्णी
बघा, आणि लोकांना उगीच शंका की
अर्थात तुमच्या एवढे काही
मस्त
आंजीला नवीन वर्षात कप भरून
आवडली
In reply to आवडली by तिमा
सहमत आहे.असे लहान मुलांना
असे लहान मुलांना काहीबाही सांगून, त्यांचा हिरेमोड करणारेही लहानपणी खूप बघितलेत.लहान मुला-मुलींशी काही लोक असे विचित्र वागतात - हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे - म्हणजे इतका मोठा आहे!आवडली.
In reply to आवडली. by राही
त्यांच्यावर एकाच स्वभावाचा
त्यांच्यावर एकाच स्वभावाचा शिक्का अजून बसायचा असतो.सहमत. स्वतःला हवं ते कसंही मिळवायचा प्रयत्न करणं ही स्वाभाविक प्रवृत्ती दिसून येते लहानपणी. लहान मुला-मुलींच्या वागण्यावर मोठ्यांचा काय प्रतिसाद मिळतो त्यावरुन मग स्वभाव 'बनत' जातो माणसाचा असं मला वाटतं. बरोबर-चूक - माहिती नाही.'गोंडस' कथा! आवल्डी
आवडेश!
गमतीदार आहे कथा. आवडली.
मस्तच!
In reply to मस्तच! by पैसा
चांगली कल्पना
च्या लै भारी व्ह्ता.....उलिसा
लै मंजे लईच भारी राव.
In reply to लै मंजे लईच भारी राव. by चित्रगुप्त
आवडला
चित्रगुप्तजी आणी जयंत काकाचा
असं वागणं बरं नव्हे, हे