मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कारल्याची भाजी

काकाकाकू · · पाककृती
साहित्यः ४ मध्यम आकाराची कारली (बिया काढून, जरा जाडसर काचर्‍या कराव्या.) २-३ हिरव्या मिरच्या ८-१० कढीपत्याची पाने फोडणीचे साहित्य (मोहोरी, हिंग, ह्ळद या क्रमाने फोडणीत घालावे) मीठ (चवीप्रमाणे) गूळ (१/४ कप) कोथिंबीर (बारीक चिरलेली १/४ कप) तेल १/४ कप (ह्या कृतीत तेल जरा जास्त लागते) कृती: १. तेल जरा जाड बुडाच्या पातेल्यात गरम करुन फोडणी करावी. फोडणीत हिंग नेहमीपेक्षा जरा जास्त घालावा. २. फोडणीत मिरच्या व कढीपत्याची पाने घालून जरा परतून घ्यावी. ३. आता त्यात कारल्याच्या काचर्‍या घालाव्या. वर मीठ घालून नीट परतावे. ही भाजी करताना पातेल्यावर झाकण अजिबात ठेवायचे नाही. ४. भाजी शिजली की त्यात गूळ घालून तो पूर्ण वितळेपर्यंत परतावी. त्यात चिरलेली कोथिंबीर घालून वाढावी. हि भाजी पुरी, पोळी, भाकरी किंवा दहिभाताबरोबर छान लागते. जेवणे झाल्यावर फोटो काढायची आठवण झाली..... Karala bhaaji

वाचने 8806 वाचनखूण प्रतिक्रिया 7

In reply to by त्रिवेणी

काकाकाकू 28/12/2013 - 18:30
गूळ भाजी शिजल्यावर घातल्यावर हिरवा रंग टिकतो. हि भाजी आमच्याकडेपण सगळ्यांना आवडते. अजून २-३ प्रकार आहेत....जेव्हा करीन तेव्हा इथेपण देईन. आवडल्या तर जरुर कळवा. @इन्दुसुता आणि त्रिवेनी.....प्रतिसादाबद्दल आभार.

जेपी 28/12/2013 - 20:56
कारले चिरल्यावर थोडावेळ मिठाच्या पाण्यात भिजु घालणे (15 मिनीट ) नंतर चिंचे सोबत गुळा घालणे . कडवट पणा पुर्ण पणे जातो . बाकी पाक्रु आवडली .