Skip to main content

वाहनाच्या मागे...

लेखक निसर्ग यांनी शुक्रवार, 26/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यामध्ये सध्या ट्राफीक जाम मुळे वाहनाचा वेग कमीच ठेवावा लागतोय. पण त्यातूनही मला एक नवीन छंद जडलाय, काही वाहनांच्या मागे छान वाक्य वाचायला मिळताहेत.काही वाक्य सुरक्षे संबंधी तर काही विडंबनात्मक, काही विचार करायला लावणारी, अशी वेगवेगळी असतात. " सुरक्षित अंतर ठेवा " , "आईचा आशिर्वाद " या सारखी नेहमीच दिसणारी आहेतच पण वेगळी अशी वाचायला मिळालेली काही वाक्य.. .... १) बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलयं वाघानं २) योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये ...आणि ...मुलांमध्ये.. ३) कितने भी खरीद ले हिरे मोती,लेकीन कफ़नपर जेब नही होती ४) जळा पण प्रेमाने ५) Don't Kiss me. ६) एका मिनीडोअर (सहा आसनी) च्या मागे तर डब्लू डब्लू डब्लू.टमटम. काम असे वाक्य आहे. ७) अरे नाही , अहो रिक्शावाले म्हणा. ८) वाट पाहिन पण एस टी नेच जाईन . ९) Mom say's ,No Girl friend मिपाकरानो,कदाचित आपणासही अशी अनेक वाचायला मिळली असतीलच. सांगा...... ... आणि आमच्या परदेशातल्या मिपाकरानो तुम्हाला तिकडे अस काही वाचायला मिळतं काहो? आपल्या गाडीच्यामागे काहीही लिहायची इच्छा नसेल तर गाडी क्रमांक तरी लिहा :) वाचाळ --- निसर्ग

वाचने 10075
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

आपून फिदा है रे इस डाईलॉग पे....
कितने भी खरीद ले हिरे मोती, लेकीन कफ़नपर जेब नही होती!
अजून एक फंडू वाक्य एका कारच्या मागे पाहिले होते - Watch my rear, not her! ;)

In reply to by मनिष

तसेच, Don't touch me. I am not 'that' type of a car.

१. Mama says no girls papa says no race. २. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ( हे लिहिलेला टेम्पो पौड रोडला आनंदनगर बसस्टॉपमागे बरेच दिवस पडुन होता, जुन्या आठवणी काढत असेल कदाचित) ३. हेही दिवस जातील या पाट्यांमध्ये शुद्ध्लेखनाच्या चुकांमुळे आणखी गमतीजमती होतात ४. संत वहाते कृष्णामाई (पेंटरला संथ लिहायचे असावे) इकडे जपानमध्ये मात्र असे काहीही लिहिलेले नसते - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

देखो मगर प्यार से रीक्षा मागची ओळ.... "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

1) Dad's Gift 2) नाद खुळा ३) नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा ४) ऐ काय बघतोस? ५) जलो मगर दीपसमान ६) घर कब आओगे? ७) अनारकली भरके चली Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

अनेक ट्रकच्या मागे सिनेमांची नावे लिहिलेली असतात. त्यावरुन वाचलेला एक विनोद आठवला- एका ट्रकच्या मागे लिहिले होते- 'सावनको आने दो'. एक दुसरा ट्रक येऊन या ट्रकला धडकतो. पहिला ट्रकचालक भांडू लागतो. तोच दुसरा ट्रकचालक आपल्या ट्रक मागची पाटी दाखवतो- 'आया सावन झूमके! :) --शाल्मली.

एक बायपासने कोथरुडला जाताना वाटेत एका ट्रकवर वाचलेल वाक्य. "जली को आग केहते है बुझी को राख और जो चीज तुम्हारे पास नही है, उसे हम हिन्दी मे दिमाग केहते है" :D आणि त्याहुन जास्त विनोदि वाटत त्या ट्रकच्या नं प्लेटकडे पाहिल्यावर. हरियाना पासीन्ग्ची गाडी होती आणि बाते दिमागकी :D समस्त हरियाणा प्रेमीनी ह घ्या. ;) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

(१) १३ मेरा ७....... (२) A जलता Q? (३) पहा पन प्रेमाणे... (४) जलो मगर प्यार से....

लहानपणी आवाजच्या अंकात एक चित्र बघितले होते. एका माणसाच्या तोंडावर ट्र्क पाणी उडवतो. माणूस रागाने ट्र्ककडे पाहतो तर त्याला ट्र्कच्या मागील बाजूला खालील वाक्य दिसते "बुरी नजरसे देखनेवाले तेरा मुंह काला !!!" खादाडमाऊ (लहानपणापासून आवाज वाचणारा)

In reply to by योगी९००

'आवाज' मधे वाचण्यासारखं काही नसतं त्यामुळे वरचं वाक्य 'लहानपणापासून आवाज पहाणारा!' असे हवे! ;) (खुद के साथ बातां : मी एकदा लहानपणी 'आवाज' ला हात लावला तर माझ्या कानाखाली 'आवाज' आलेला मला अजून ऐकू येतो! :O ) चतुरंग

In reply to by चतुरंग

मीही 'आवाज' चोरुन 'बघायचो' आणि सापडलो की रंगलेली कानशीलं चोळत घरातुन धुम ठोकायचो :)

I don't drive fast , I fly slow You are behind the best रवि अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ......

१) May be I am slow, but still, I am ahed of you. २) आई जेऊ घालीना, बायको रिक्षा चालवू देईना. ३) दम है तो पास कर नही तो बरदाश्त कर. ४)मुलगी शिक्ली परगती झाली. ५) वर लिहीले होते 'मित्रांची मदत' खाली लिहीले होतं, 'पिंकी', अश्विनी आणि विरभद्र'

मागे लिहीले होते, १ १३ ६ रा एक तेरा सहा रा. रेवती

'ब्बलू' उच्चार करुन बघा! (त्याला 'बबलू' लिहायचे असावे हा माझा अंदाज - हे वाचताना मी हसून हसून सायकल वरुन पडायला आलो होतो! :D ) एका गाडीमागे 'If you can read this, then you are too close!' (मी लगेच माझ्या गाडीचा स्पीड कमी केला! ;) ) चतुरंग

१. सायकलच्या मडफ्लॅपवर - सायकल सोडून बोला (शहर - अर्थात पुणे!) २. ट्र्कच्या मागे (खूप कॉमन दृश्य) - (वरची ओळ) चिंकी पप्पू मन्नू राजू मुन्नी बिट्टू (खालची ओळ) छोटा परिवार सुखी परिवार (आजूबाजूला) हॉर्न . ओके. प्लीज.

पुण्यातल्या रिक्षावर [. . . . . म्हणजे पाठीमागे!] , ' थांबा , आलोच! '

भगवान सबका भला करे लेकिन शुरवात हमसे करे

एका खाजगी बसच्या मागे नाही पण समोरील काचेवर लिहिलेले वाचले होते. "All India Permit. Valid in Maharashtra." मला नाही अर्थ कळला ह्याचा.