मुंबई कट्टा

सुबोध खरे जनातलं, मनातलं
आजच सकाळी मुक्त विहारींकडून असे कळले कि श्री इस्पिकचा एक्का भारतात आले आहेत आणी पुण्यात वास्तव्याला आहेत. आपण त्यांना भेटूया असे आम्ही ठरविले आहे. त्यावर मी त्यांना दूरध्वनी( हा मुक्त विहारीनीच दिला) केला आणी ते शनिवार दिनांक २१ डिसेम्बर रोजी परत विदेशी जात आहेत. त्यांचे विमान सायंकाळी ७.३० ला सुटत आहे आणी त्यांना ४.३० ला चेक इन करायचे आहे म्हणून आम्ही त्यांना सहार विमानतळाजवळ एखाद्या हॉटेल मध्ये साधारण २ वाजता भेटायचे ठरविले आहे. ज्या मित्रांना तेथे येण्याची इच्छा आहे त्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. खर्च स्वतःचा स्वतःने करायचा आहे. (प्रायोजक मिळाला तर सोन्याहून पिवळे) या वेळेत आणी स्थळात बदल होणे नाही. कारण एक्का साहेब थोडा वेळ अगोदर येत आहेत आणी त्यांना चार वाजल्यानंतर थांबणे शक्य नाही. तरी सर्वांनी अगत्य येण्याचे करावे. वय वजन उंची आकार लिंग जात धर्म देश याचे कोणतेही बंधन नाही.
वर्गीकरण
लेखनप्रकार

129 टिप्पण्या 23,560 दृश्ये

Comments

यसवायजी नवीन

आमच्या शुभेच्छा. वृतांत येवुद्यात.

प्यारे१ नवीन

सर्वसमावेशक कट्ट्याला शुभेच्छा! >>>वय वजन उंची आकार लिंग जात धर्म देश याचे कोणतेही बंधन नाही. रंग राहीला.

सुबोध खरे नवीन

In reply to by प्यारे१

रंग राहिलाच. क्षमस्व असो. पुढच्या वेळेस इत्यादी इत्यादी टाकेन. अवांतर -- इत्यादी--म्हणजे आपण आहोत त्यपेक्षा हुशार आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न

प्रभाकर पेठकर नवीन

सुबोध खरे, एसवायजी, प्यारे१, मुक्त विहारी आणि उत्सवमूर्ती इस्पिकचा एक्का ह्यांना भेटण्याची तीव्र इच्छा असूनही येणे अशक्य असल्याने कट्ट्यास इथुनच शुभेच्छा.

प्रभाकर पेठकर नवीन

In reply to by मुक्त विहारि

जरूर. कट्ट्याचा मुख्य खर्च माझ्याकडून प्रायोजित समजा.

मुक्त विहारि नवीन

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

या नक्की या... बदलापूरची मिसळ खावून झालीच आहे. आता साकी नाक्याला सँडविचेस खावू,चहा पिवू, सिग्रेटी ओढू आणि मस्त गप्पा टप्पा मारू.

भाते नवीन

भारतात येऊनसुध्दा मिपावर कळवले सुध्दा नाहीत का? आता तुमच्या या सफरीचासुध्दा वृतांत मिपावर येणार आहे का? एक्का काकांना भेटायची मनापासुन ईच्छा आहे. यायचा नक्की प्रयत्न केला जाईल. आयत्या वेळी सांगितले किंवा अचानक न सांगता आले तर चालेल का? माफ करा, पुढल्या शनिवारचे आत्ता नक्की काही सांगता येत नाही आहे. ठिकाण (हॉटेल) आणि नक्की वेळ या धाग्यावर कळेलच!

ज्ञानोबाचे पैजार नवीन

साला हे मि.पा. म्हणजे देशी दारु सारखे आहे. एकदा त्याची चटक लागली की सुटता सुटत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा कट्टा. विमानात बसायच्या आधी वेळात वेळ काढुन जीवाचा आटापिटा करत कट्ट्या साठी येणार्‍या श्री इस्पिकचा एक्का यांचे जेवढे कौतुक वाटते तेवढेच कौतुक कट्टा आयोजीत करणार्‍या डॉ. खरे आणि मु.वि. चे पण वाटते. कट्टया साठी मनापासुन शुभेच्छा.

शैलेन्द्र नवीन

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

साला हे मि.पा. म्हणजे देशी दारु सारखे आहे. एकदा त्याची चटक लागली की सुटता सुटत नाही.
काय भन्नाट उपमा दिलीत :) ज्याप्रमाणे पट्टीचा पिणारा कुठेही गेला तरी दोन घोट घशाखाली घालतोच तसचं पट्टीचा मिपाकर कुठही असलं तरी कट्टा घ्यायचा प्रयत्न करतोच..:) एक्का व इतर कट्टाकर्‍यांना शुभेच्छा !!!

अनिरुद्ध प नवीन

हार्दिक शुभेच्छा,एक्का साहेबान्च्या भेटीचा योग नाही,त्याबद्दल हुरहुर मात्र राहील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

काय आहे, लेटेष्ट कट्ट्याची पोझीशन ? -दिलीप बिरुटे

ज्ञानव नवीन

In reply to by सुबोध खरे

लाल टी शर्ट आणि नाकावर ढापणी...(अन्य मिपाकरांनबरोबर...प्रतिसाद लेखक उजवीकडून पहिला)

प्रभाकर पेठकर नवीन

ह्यात कोण कोण आणि कुठे कुठे (काय क्रमाने) बसले आहेत? हे लिहीले तर त्या सर्वांची ओळख होईल. क्रमांक दोनच्या फक्त नाकाच्या छायाचित्राचे प्रयोजन कळले नाही.

सुबोध खरे नवीन

In reply to by प्रभाकर पेठकर

लोकाना ऑप्टीकल झूम आणि डिजिटल झूम मधील फरक दाखवताना काढलेला फोटो. नाक खुपसले तर ते कसे दिसू शकते याचा एक परिचय

विजुभाऊ नवीन

In reply to by सुबोध खरे

हे पुढे फुटबॉलच्या पेनल्टीकीक अडवायच्या पोजमधले थोडेसे सुदेश भोसलें सारखे दिसणार्‍या सदगृहस्थांचा परीचय द्या की

प्रभाकर पेठकर नवीन

अरे व्वा! सपाटाच लावलाय की छायाचित्रांचा. (कांही छायाचित्र पुनर्प्रकाशित झाली आहेत.)

सुधांशुनूलकर नवीन

In reply to by सुबोध खरे

डावीकडून - सुधांशुनूलकर, विमे, विलासराव, किसन शिंदे, ज्ञानव, इस्पिक एक्का, भाते, मुक्त विहारी, स्पा. डॉ. सुबोध खरे यांनी हा फोटो काढला आहे.

सूड नवीन

In reply to by प्यारे१

>>मुवि काका का लत्तात? छे, त्यांच्या डोळ्यात काहीतरी गेलं असेल. एरवी तुमच्याइतकं छान रडता येणारे का कोणाला प्यारेकाका, तुम्हीपण ना कम्माल करता !! ;)

दिपक.कुवेत नवीन

स्पावडया (निळा चेक्सचा शर्ट), विमे (लाल टि शर्ट), मुवि (एक डोळा चोळतानाचे), एक्का तर माहितच आहेत, किसन शींदे (पिवळा टि शर्ट), सुबोधजी (ग्रे कलर शर्ट)....बाकिचे माहित नाय.

मस्त कलंदर नवीन

पुणे कट्ट्यांच्या तुलनेत स्त्री सदस्यांच्या उपस्थितीचे प्रमाण कमी दिसते.. नाही म्हणजे आमचा विमे म्हणतो तसे 'जाताजाता आपले निरिक्षण नोंदवले'

सूड नवीन

In reply to by मस्त कलंदर

>>पुणे कट्ट्यांच्या तुलनेत स्त्री सदस्यांच्या उपस्थितीचे प्रमाण कमी दिसते.. अर्रर्र लैच!! पुणे कट्ट्याला स्त्रिया येतात हे कोणी सांगितलं बयो तुला?

बॅटमॅन नवीन

In reply to by सूड

आता "मआंजावर ठरलेल्या कट्ट्यांना स्त्रियांची उपस्थिती कमी का असते?" असा पुनरेकवार धागा येऊदे ;) (मक म्याम हल्के घेणे- न घेतल्यास अंमळ लोड इकडे पाठवून देणे)

पैसा नवीन

In reply to by बॅटमॅन

कट्टा करून वृत्तांत टाकला तर कोणीतरी येऊन सांगायचा, "ह्या:, हा काय कट्टा आहे? आम्ही कसे तेव्हा पिऊन रात्रभर पडत होतो!"

प्रचेतस नवीन

In reply to by पैसा

बस का? आमच्या कट्ट्यात कधी असं झालेलं दिसलंय का? ;)

पिलीयन रायडर नवीन

In reply to by बॅटमॅन

कमेंटांची भिती माझं खेटर.. आणि स्वतंत्र विभाग काढण्यासाठी जेव्हा पुरूष लोक एका धाग्यावर बोंबा मारत होते तेव्हा तुम्हाला नक्की कुणाच्या कमेंटांची भिती वाटत होती?

पिलीयन रायडर नवीन

In reply to by बॅटमॅन

"निघता विषय बालिकांचा.. पहा येई लगोलग कोण.. लागता विरोधी सुर स्त्रिद्वेष्ट्यांचा.. नाक खुपसे ब्याटम्यान"... हेच का?

बॅटमॅन नवीन

In reply to by पिलीयन रायडर

आम्ही स्त्रीद्वेष्टेविरोधी असल्याचे कबूल केल्याबद्दल धन्यवाद! बाकी तो नाकावरचा शेंड्यावरील राग इथूनही दिसतोय बरे =))

विश्वनाथ मेहेंदळे नवीन

In reply to by पिलीयन रायडर

मतप्रदर्शन केले असते. पण उगाच संपादिकांची कामे का वाढवा, म्हणून थत्ते चाचा व्हायचे ठरवले आहे.

बॅटमॅन नवीन

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

असे व्हायचा प्रयत्न करतो आहे पण अजून वास्तव स्वीकारण्याइतका निगरगट्टपणा नै आलेला.

सुबोध खरे नवीन

In reply to by पिलीयन रायडर

पिरा ताई, लोकांना कुणाच्या कॉमेंटची भीती वाटत नव्हती तर GOLF ( GENTLEMEN ONLY LADIES FORBIDDEN ) अशा प्रतिसादासाठी स्वतंत्र विभाग काढावा असे काथ्या कूट चालले होते. अजूनतरी आपली मिपा संस्कृती स्त्रियांसमोर सभ्य शब्दात बोलावे असे सांगते. आता तुम्ही फोडून सांगा म्हणताय म्हणून सांगितले.

पिलीयन रायडर नवीन

In reply to by सुबोध खरे

खरे काका.. तोच तर मुद्दा आहे ना.. भिती हे कारण नाहीये "अनाहिता" च्या निर्मिती मागे.. (आणि तसंही, मि.पा वरच्या बायका कमेंटस ना भितील??) जसं तुम्हाला तुमचे विषय आहेत, तसे आम्हाला आमचे.. आम्हालाही आमच्या असभ्य गप्पा मारायच्या असतील तर!? सो तुम्हाला तुमचा विभाग हवा की नको आणि का हवा ह्यावर बायका चर्चा करणार नाहित (ह्या उलट अनाहिता बद्दल मात्र पुरूषांनी पण हिरीरीने चर्चा केल्या होत्या.. असो..).. पण तुमचा विभाग निघालाच तर त्या मागची कारणं आम्हाला नक्की माहीती असतील.. "घाबरले म्हणुन स्वतःचा विभाग काढला रे.." असले फालतु मुद्दे आम्ही काढणार नाही!

सुबोध खरे नवीन

In reply to by पिलीयन रायडर

पिरा ताई अहो बैट मैन चे अजून लग्न झालेले नाही त्यामुळे त्याला बायकांच्या गप्पात कुतूहल असणारच. एकदा लग्न होउदे म्हणजे मग त्या काय गप्पा मारतात त्याबद्दल काहीच स्वारस्य राहणार नाही. बायकांचे आवडते विषय म्हणजे मुले, दागिने किंवा खरेदी आणि मोलकरीण. एकदा त्याला कळूदे मग पहा