दॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका
इकडे अमुच्या भारताचा सातबारा गहाण है।
दॅट्स व्हाय शायनिंग यह इंडिया महान है॥
पोशिंद्याच्या घामाभवती बांडगुळांचे कडे
नितनेमाने रोज पाडती प्रेत-मढ्यांचे सडे
महासत्तेचे स्वप्न दावुनी तज्ज्ञ धावती पुढे
तिकडे त्रेपन-चौपन मजले मजल्यावरती चढे
चेले-चमचे, खुर्ची-एजंट गातसे गुणगान है ॥
क्षुल्लक संख्या ’नरबळी’ची, अन् तांडव केवढे यांचे
शतसहस्र "बळी" बळीचे, पण हाल पुसेना त्यांचे
या शहाण्यांच्या सद्बुद्धीवर, अवदसा कुठूनी आली?
मुळी कशाची लाज न उरली; की बुद्धी भ्रमिष्ट झाली?
पगार-वेतन विनाश्रमाचे यांना करतसे नादान है? ॥
या देशाच्या पुढारकांचा दिमाग सटकला आहे!
दीडदमडीच्या सुधारकांचा विवेक भटकला आहे!!
एकच प्रश्न अंतिम आता, पुसून घेऊ पुन्हा
विद्वानांनो, सुशिक्षितांनो, अरे! काय बिमारी तुम्हा?
काय नेमका इलाज तुम्हावर? आयुर्वेद की अॅलो?
धागे-दोरे की मांत्रिक-बाबा? बस एकबार तो बोलो!
जेणेकरूनी विवेक तुमचा येईल ताळ्यावरती
'अभय'तेने जगेल जनता त्यांच्या शेतावरती
आम्हालाबी जगू द्या आता! हम भी तो इन्सान है!!
- गंगाधर मुटे 'अभय’
--------------------------------------------------------

काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4438
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
जे बात !
हजारो शेतकरी आत्महत्या करून मरत आहेत
In reply to जे बात ! by वेल्लाभट
हम्म्म्म.
है शाब्बास. काय भारी सोल्यूशन
In reply to हम्म्म्म. by पैसा
मग?
In reply to है शाब्बास. काय भारी सोल्यूशन by अभ्या..
मस्त कविता. अमेय साहेब बाबा
बाकी अतिशिक्षित लोक मूर्ख
In reply to मस्त कविता. अमेय साहेब बाबा by विवेकपटाईत
बाकी अतिशिक्षित लोक मूर्ख असतात याचेच उदाहरण दिल्लीत दुप्पट किमतीत लो फ्लोर बसेस घेतल्या जेणे करून सायकल चालवीत अपंग व्यक्ती बस मध्ये येऊ शकेल, हे शहाण्यांनी सरकारला पटवून दिले.हे किंवा खड्डे न पडणारे रस्ते बनवणे हे अशिक्षित / मूर्ख नेत्यांमुळे होते असे तुम्हाला वाटते काय? अहो हे फक्त अत्यंत "चतूर" नेत्यांनाच जमते. याला "वेल मॅनेज्ड मिसमॅनेजमेंट" म्हणतात. ह्याच मुख्य तत्वावर तर सद्याचे राजकारण चालले आहे.मस्त कविता. अमेय साहेब बाबा
एकदम बेस्ट...!
:(
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी