मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेम-एक काव्यगुण

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
प्रेमाच्या उगमी येथे, सहजी कवित्व झरते जे बोलत जातो मी ही ते ते कवित्व होते जरूरी ना काव्यगुणांची श्वासासम सहजी येते कुणी न करताही तेथे ती-कविता होऊन जाते उस्फूर्तता ही कैशी?, प्रतिभेशी नाही घेणे ते देवाजीच्या घरचे सहजाचे साधे लेणे. कधी हात तिचे दिसतात मज मेहेंदी दिसून येते स्पर्शाची अठवण का ही? मग मनात उरुनी जाते? शरीराचा गंध तसाही मज वेडाऊनच जाई शब्दांचे सरते काम अन कविता केवळ राही प्रेमाच्या गावापाशी मी भिऊनी उभा आहे. आकर्षणी सीमा रेषा हलकीच मधेही आहे. हे नकळत कैसे कोडे ठरवून मनाला पडते? सुटकेची आली वेळ तरी सुटका कोठे घडते??? हव्यास अम्हाही ऐसा तो तुरुंग मोहक आहे जन्मोजन्मी प्रेमाचा मी...कायमचा कैदी आहे.

वाचने 6997 वाचनखूण प्रतिक्रिया 24

चाणक्य Mon, 12/02/2013 - 09:26
'मोहक तुरुंग' विशेष आवडला. मस्त रचना. (अगदी खोल, आतमधून आली आहे बर का :-) )

सस्नेह Mon, 12/02/2013 - 11:11
प्
रेमाच्या गावापाशी मी भिऊनी उभा आहे.
का वो ? प्यार किया तो डरना क्या ? रच्याकने, कोण ही कविता ?

चौकटराजा Wed, 12/04/2013 - 08:47
तृप्ती गोड तरीही नकोशीच वाटते अत्रुप्त आत्म्याच्या ओठीच कविता जन्म घेते !

मुक्त विहारि Wed, 12/04/2013 - 10:53
"हव्यास अम्हाही ऐसा तो तुरुंग मोहक आहे जन्मोजन्मी प्रेमाचा मी...कायमचा कैदी आहे." हे तर खासच.

विटेकर Wed, 12/04/2013 - 11:00
उत्तम कविता .. समिधा जुळविता जुळविता, पार्श्वभूमीवर मनात यमकं जुळविता की काय ?