मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"पाऊस येईल"

अमेय६३७७ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
नको फुलवूस श्वास नको हताश होऊस तुझ्या अंगणातही रे आता पडेल पाऊस येता बरसून धारा मेघव्यथेला घेऊन सहवेदनेची दिठी, डोळा जाईल भरून जाणीवाही नवनव्या उरातून वाहतील जे ना आकळले कधी माग त्याचा काढतील असे जगासाठी जुना तुझा पहिला असेल कायामन भिजताना खूप काही गवसेल नको आकांत जिवाचा नको पाण्यामध्ये देव फक्त स्वागतासाठी तू भुई नांगरून ठेव -- अमेय

वाचने 3422 वाचनखूण प्रतिक्रिया 22

वडापाव 06/12/2013 - 13:11
जाणीवाही नवनव्या उरातून वाहतील जे ना आकळले कधी माग त्याचा काढतील असे जगासाठी जुना तुझा पहिला असेल कायामन भिजताना खूप काही गवसेल
मस्तच!!!

प्रचेतस 06/12/2013 - 13:33
सुरेख. तुमच्या कविता अतिशय दर्जेदार असतात.

निरन्जन वहालेकर 06/12/2013 - 13:50
सुन्दर कविता. आवडली.

चाणक्य 06/12/2013 - 14:23
छानच झालीये. सहवेदनेची 'दिठी' म्हणजे काय?

राजेंद्र मेहेंदळे 06/12/2013 - 14:42
"फक्त स्वागतासाठी तू भुई नांगरून ठेव" मस्त आहे

मिसळलेला काव्यप्रेमी 06/12/2013 - 15:37
क्या बात!! सुंदर रचना..
येता बरसून धारा मेघव्यथेला घेऊन सहवेदनेची दिठी, डोळा जाईल भरून
दीठी शब्दाचा प्रयोग ग्रेसची आठवण देऊन गेला...

प्यारे१ 06/12/2013 - 16:12
छान! लयबद्ध नि अर्थपूर्ण रचना.

पद्मश्री चित्रे 07/12/2013 - 19:31
पूर्ण कविताच सुरेख. खास करून - फक्त स्वागतासाठी तू भुई नांगरून ठेव

निवांत पोपट 08/12/2013 - 00:51
फार सुंदर लिहिता हो तुम्ही अमेयदा! 'कालचा पाउस आमच्या गावात आलाच नाही' ह्या कवितेतल्या न आलेल्या पावसाचा रोख बदलण्याचं सामर्थ्य तुमच्या ह्या कवितेत आहे.त्या 'न आलेल्या पावसा'मधल्या वेदनेला सामाजिक आशयाची किनार होती. तुमच्या कवितेतल्या पावसामध्ये मात्र फक्त दिलासादायक आशेचा निर्मळ शिडकावा आहे.आवडली.. :) आता फक्त काही तासांनंतर आपण भेटणार आहोतच.तेंव्हा बोलूच.. :)

Atul Thakur 09/12/2013 - 21:58
फक्त स्वागतासाठी तू भुई नांगरून ठेव क्या बात है अमेयराव :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 09/12/2013 - 22:15
आवडली कविता. दिलीप बिरुटे