हर्षोल्लासीत नावर्यांनो, आधीच सांगतोय शीर्षक वाचून भलते समज करून घेऊ नका. लेख चक्क चक्क बाईक वर आहे. “बाईक 'को' विकल्यावर”. थोडासा आपला हिंदीमिश्रित कोट्या करायचा क्षीण प्रयत्न.
आता काय सांगू कसं सांगू असं झालंय. सुरुवात, “धूम” युगा पासूनच करतो. जो तो आपलं टॅनंनॅ नन नॅनननॅ करत गाड्या उडवू लागला. आमच्या इमारतीतलं एक कार्टं तर शेजारच्या इमारतीत गोट्या खेळायला पण स्कुटी वर जाऊ लागलं. फादरकडे बाईक मागताच त्यांनी मला मुस्काडून “दत्त दाखवायची” महत्वाकांक्षा जाहीर केली. शेवटी अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाला असताना मातोश्रींना अगदीच दया आली आणि मला “कमीतकमी फक्त पास तरी हो रे बाबा” या अटीवर नवी कोरी बाईक बहाल केली गेली. पण खरं तर बाईक देण्यामागच मुख्य कारण असं होतं की माझं महाविद्यालय तसं वेशीबाहेरच होतं. आणि अस्मादिक पुणेकर असल्यामुळे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरायचा भ्याडपणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.
असो, बाईक घेतल्यावर पहिली अपेक्षा अशी होती की कॉलेजातल्या एखाद्या मृगनयना रसिकमोहिनीने लाडीकपणे रुमालाशी चाळ करत, हळूच नजर चुकवत लिफ्ट मागावी. पण असे आश्चर्य काही घडले नाही. त्या नजरा चुकवीत, भलत्याच्याच बाईकवर चौफेर उधळू लागल्या आणि आमच्यावर मात्र डोक्यावर रुमाल बांधलेल्या रानरेड्यांना लिफ्ट द्यायची वेळ आली.
यथावकाश बाईकची मागील सीट बळकावली गेलीच. अगदीच मृगनयना नाही, पण रसिकमोहिनी मात्र सापडली. आणि मग ‘कोई ना कोई चाहिये प्यार करनेवाला’ म्हणणारा मी, ‘चांदी की सायकल सोनेकी सीट, आओ चले डार्लिंग चले डबल सीट’ असली गोविंदापंथी गाणी म्हणू लागलो. सहसीटधारिणी सोबत लोणावळा-खंडाळाच्या वाऱ्या घडू लागल्या.
असो, परत लायनीवर येतो. बाईक घेतल्याच्या दुसऱ्या दिवशीच ती आपटायचा पराक्रमही पार पाडला. कारण पुण्यात बाईक अथवा कार घेतल्यावर ती ३ दिवसांत आपटली नाही तर तो पु.लं.च्या उक्तीनुसार फाउल धरतात. तर झालं असं की रात्री अलका टॉकिझला, ‘सुपरमॅन रीटर्न्स’ नामक सुमारपट पाहिल्यामुळे अर्ध झोपेत टिळक रस्त्यावर बाईक चालवत असताना जरा गुंगी आली आणि मी एका गाढवावर जाऊन आपटलो. आता टिळक रस्त्यावर रात्री १२:३० वाजता गाढव कुठून आले हे विचारू नका. पुण्यात हल्ली अजगर, बिबट्या, गव्यापासनं मगरीपर्यंत काही सापडू शकतं. महानगरपालिकेत तर लांडग्यांचा सुळसुळाट झालाय म्हणतात. हल्ली काय माणसं जंगलात आणि प्राणी शहरात असंच चाललाय. जाऊद्या तर सांगत काय होतो, गाढव बहुदा हुशार असावं, कारण त्याने त्याचे भाई-बंद (पक्षी:मी आणि मागे बसलेला मित्र) ओळखले, म्हणून आम्हाला ‘प्रसाद’ दिला नाही. बाईकला पण काही नव्हते झाले, फक्त बाईकचा आरसा आकाशाकडे वळला होता. आरश्यात बघून, वरून एखादं विमानं येत नाहीयेना याची शहनिशा करून आम्ही मार्गस्थ झालो.
कॉलेज संपलं. चुकून अभियंताही झालो. थोडा खुर्दा खिशात खुळखुळू लागला, आणि मग “ट्रेकिंग” नामक एका व्यसनाने पूर्णपणे ताबा घेतला. बाईक आणि ट्रेकिंग ही आपली सचिन-सेहवाग प्रमाणे जोडीच जमली. खाच-खळगे, नदीपात्रात, जंगलात, चिखलात, सगळीकडे मुक्त संचार सुरु झाला. पार गुजरात सीमेवरील साल्हेर-मुल्हेर पासून खाली गोंयपर्यंतचे बरेचसे किल्ले ‘बाईक’दळी भटकून झाले. अभिमानाची गोष्ट अशी की बाईकनी कधी दगा नाही दिला. मित्रांच्या बाईक पंक्चर काय व्हायच्या, बंद काय पडायच्या, घसरायच्या काय, पेट्रोल काय संपायच. भलतीच नाटकं हो.
शेवटी, घरकी मुर्गी दाल बराबर, असंच काहीसं माझ्याबाबतीत घडलं. मित्राची ‘अव्हेंजर’ चालवली आणि देवत्व प्राप्त करण्याची ओढ निर्माण झाली. Tagline आहे हो अव्हेंजरची “Feel Like God”. मी मर्त्य मानव तरी की करणार मग. शेवटी पल्सर देऊन अव्हेंजर आणली. पण ६ वर्षांच्या यशस्वी सहजीवानंतर करती सवरती बाईक विकताना, मनाला थोडी हुरहूर लागून राहायची ती राहिलीच.
सध्या तरी मी अव्हेंजर चालवण्यात रममाण आहे. पण परवाच “थंडरबर्ड”चं नवीन मॉडेल शेजारून धुप्-धुप करत निघून गेलं. जीव वर-खाली झाला हो. आता “थंडरबर्ड”चे वेध लागलेत. ती जर घेतली तर मग अव्हेंजरच्या लेखाची अजून एक जिलेबी पडायला मी मोकळा !!
वाचने
46036
प्रतिक्रिया
164
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच.
मस्तच
वाहवा वाहवा
बायकांचे आम्ही कट्टर फ्यान
हरल्या गेलेलो आहे
In reply to बायकांचे आम्ही कट्टर फ्यान by बॅटमॅन
आदाब!!
In reply to हरल्या गेलेलो आहे by वाह्यात कार्ट
(गडगडपक्षिणीच्या प्रेमात पडू
In reply to हरल्या गेलेलो आहे by वाह्यात कार्ट
बाईकाभेद
In reply to बायकांचे आम्ही कट्टर फ्यान by बॅटमॅन
हा हा हा
In reply to बाईकाभेद by मालोजीराव
तुफान
In reply to बायकांचे आम्ही कट्टर फ्यान by बॅटमॅन
एक नंबर प्रतिसाद !
In reply to बायकांचे आम्ही कट्टर फ्यान by बॅटमॅन
_/\_
In reply to बायकांचे आम्ही कट्टर फ्यान by बॅटमॅन
एकदम मस्त प्रतिसाद !!!
In reply to बायकांचे आम्ही कट्टर फ्यान by बॅटमॅन
संपलो मी हसून हसून!
In reply to बायकांचे आम्ही कट्टर फ्यान by बॅटमॅन
सपशेल लोटांगण.
In reply to बायकांचे आम्ही कट्टर फ्यान by बॅटमॅन
एकशृंगिणीच्या प्रेमामधे आकंठ
In reply to बायकांचे आम्ही कट्टर फ्यान by बॅटमॅन
एकपत्नीव्रत
१२? काही फार नाही
In reply to एकपत्नीव्रत by राजेंद्र मेहेंदळे

ब्याट्या, अत्त्युत्तम रे.
धन्स
In reply to ब्याट्या, अत्त्युत्तम रे. by अभ्या..
खटंकिनी :-D
In reply to धन्स by बॅटमॅन
आवेगा अथवा आवेगिनी मिताहारी
In reply to खटंकिनी :-D by अभ्या..
सहमत.
In reply to खटंकिनी :-D by अभ्या..
गडगडपक्षिणी (बुलेट ?), आवेगा
In reply to सहमत. by सूड
एकशृंगिणी= युनिकॉर्न !!
In reply to गडगडपक्षिणी (बुलेट ?), आवेगा by लॉरी टांगटूंगकर
थत तू इफ इ अम नोत व्रोन्ग !!
In reply to एकशृंगिणी= युनिकॉर्न !! by सूड
ये शाबास!
In reply to एकशृंगिणी= युनिकॉर्न !! by सूड
झकासच!!!
In reply to ये शाबास! by बॅटमॅन
आणी...
In reply to ये शाबास! by बॅटमॅन
चपला बाकी म्हैलावर्गात भल्ती
In reply to आणी... by अभ्या..
बॅट्या,
In reply to ये शाबास! by बॅटमॅन
येस्सार! ब्रोब्र तर आहेच
In reply to बॅट्या, by प्रास
गडगडपक्षिणी = थंडरबर्ड
In reply to गडगडपक्षिणी (बुलेट ?), आवेगा by लॉरी टांगटूंगकर
:)
लेखन आवडले.
या सॉल्लिड फिगर है बाप, ऐसेच
In reply to लेखन आवडले. by मदनबाण
अर्ररर राजकुमार बघ मग.
In reply to या सॉल्लिड फिगर है बाप, ऐसेच by बॅटमॅन
जबराट रे अभ्या
In reply to अर्ररर राजकुमार बघ मग. by अभ्या..
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्
In reply to अर्ररर राजकुमार बघ मग. by अभ्या..
नुसत्या बाईकचा देखणा फोटो आवडला!
In reply to लेखन आवडले. by मदनबाण
@मदनबाण
ही लाईट स्पोर्टीणी पल्सरणी
In reply to @मदनबाण by राजेंद्र मेहेंदळे
पल्सरिणी बद्दल लाईक केल्या
In reply to ही लाईट स्पोर्टीणी पल्सरणी by मदनबाण
आमच्या धकधक तारीकेचा
In reply to पल्सरिणी बद्दल लाईक केल्या by बॅटमॅन
ऐला!!!! ही तर सातवाहनकालीन
In reply to आमच्या धकधक तारीकेचा by प्रचेतस
अर्र
In reply to ऐला!!!! ही तर सातवाहनकालीन by बॅटमॅन
ही हा हा हा
In reply to अर्र by अभ्या..
अगोबाची बाईक अगोबासारखीच भव्य
In reply to आमच्या धकधक तारीकेचा by प्रचेतस
वा बुवा!
In reply to अगोबाची बाईक अगोबासारखीच भव्य by अत्रुप्त आत्मा
गुरजी म्या येलिमिनेटर वर
In reply to अगोबाची बाईक अगोबासारखीच भव्य by अत्रुप्त आत्मा
मी तरी मांडी घालुन बसलेला
In reply to गुरजी म्या येलिमिनेटर वर by अभ्या..
आर्नोल्ड्शास्त्री?????
In reply to गुरजी म्या येलिमिनेटर वर by अभ्या..
अगदी आर्नोल्डशास्त्री
In reply to आर्नोल्ड्शास्त्री????? by स्पंदना
गुरजी म्या येलिमिनेटर वर
In reply to अगोबाची बाईक अगोबासारखीच भव्य by अत्रुप्त आत्मा
अरे मस्तच गुर्जी....
In reply to अगोबाची बाईक अगोबासारखीच भव्य by अत्रुप्त आत्मा
आयला.. भारीच
In reply to अगोबाची बाईक अगोबासारखीच भव्य by अत्रुप्त आत्मा
काय ओ एलिमिनेटरवाले बुवा, हा
In reply to अगोबाची बाईक अगोबासारखीच भव्य by अत्रुप्त आत्मा
@शिन्व्ह्गड रोडवरचा
In reply to काय ओ एलिमिनेटरवाले बुवा, हा by प्रचेतस
बुवा खूष!
In reply to @शिन्व्ह्गड रोडवरचा by अत्रुप्त आत्मा
आई शप्पत!!! बुवा यू रॉक्स
In reply to अगोबाची बाईक अगोबासारखीच भव्य by अत्रुप्त आत्मा
हाहा.
In reply to आई शप्पत!!! बुवा यू रॉक्स by बॅटमॅन
(No subject)
In reply to हाहा. by प्रचेतस
भारीच!
In reply to अगोबाची बाईक अगोबासारखीच भव्य by अत्रुप्त आत्मा
बुवा आता एक ट्याबलेट पण घ्या
In reply to अगोबाची बाईक अगोबासारखीच भव्य by अत्रुप्त आत्मा
@मंजी लेडी असिस्टंट पण 'ठेवा'
In reply to बुवा आता एक ट्याबलेट पण घ्या by मालोजीराव
ठेवीदार बुवा =))
In reply to @मंजी लेडी असिस्टंट पण 'ठेवा' by अत्रुप्त आत्मा
ब्याटुक ... एक शब्द खाटुक!
In reply to ठेवीदार बुवा =)) by बॅटमॅन
आम्ही आमच्या यामिनी सोबत
आमची यामिनी उर्फ यमी
In reply to आम्ही आमच्या यामिनी सोबत by स्पा
आमची म्हणजे कोणाकोणाची ??
In reply to आमची यामिनी उर्फ यमी by स्पा
एकषष्ठांश गोरी यमी बेष्टंय हो
In reply to आमची यामिनी उर्फ यमी by स्पा
ब्याट्या, अरे ही गोरी कोणत्या
In reply to एकषष्ठांश गोरी यमी बेष्टंय हो by बॅटमॅन
अरे नाव यमी म्हणून
In reply to ब्याट्या, अरे ही गोरी कोणत्या by सूड
काय एकेकाच्या प्रतिभांना बहर
कायम दुसर्याच्या प्रतिभा
In reply to काय एकेकाच्या प्रतिभांना बहर by प्यारे१
आवडलंय
In reply to कायम दुसर्याच्या प्रतिभा by अभ्या..
हायला प्यारे.
In reply to आवडलंय by वाह्यात कार्ट
असं म्हनू ने! साला सगळ्याला
In reply to हायला प्यारे. by अभ्या..
आयला !!
In reply to काय एकेकाच्या प्रतिभांना बहर by प्यारे१
वरचा गॉगलवाला प्रतिसाद वाच की
In reply to आयला !! by सूड
@वरचा गॉगलवाला प्रतिसाद वाच
In reply to वरचा गॉगलवाला प्रतिसाद वाच की by प्यारे१
चोच्या!
>>>लेख मस्त!
cd dawn ला काय म्हंता .
हौ अबौट उषा?
In reply to cd dawn ला काय म्हंता . by जेपी
धाग्यापेक्षा
का ओ?
In reply to धाग्यापेक्षा by अनिरुद्ध प