आत्मक्लेश४
लेखनविषय:
निवार्यासाठी पावसानं
माझंच घर शोधलं,
मग स्वागतासाठी त्याच्या
मी अंथरलं पातेलं.
डोळे पुसण्यास माझे
पाऊस धावूनी आला,
थेंब कोणता तुझा नि माझा
हेच कळेना म्हणाला.
ढगाच्या सावलीला
डोंगर समजला डाग,
पेटून उठला वणवा जेव्हां
ढग म्हणाला फुलतेय बाग.
वाचने
3285
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
कल्पनाशक्ती. विरोधाभास आवडले.
तीनही चारोळ्या मस्त !
मग स्वागतासाठी त्याच्या
मी अंथरलं पातेलं.
हे तर जबरदस्त !
--लिखाळ.
आवडल्या !!! जबरदस्त कल्पना.
मस्त
सुंदर!
आवडल्या
डोळे पुसण्यास माझे
पाऊस धावूनी आला,
थेंब कोणता तुझा नि माझा
हेच कळेना म्हणाला. ......सुंदर
In reply to चारोळ्या.. by मनीषा
सुंदर .... आवडलं!
वाचून मजा आली
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
आवडली कविता.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
मस्त!!!
छान!
(आस्वादक)बेसनलाडू
अफाट