पगडी
लेखनविषय:
गाव तिथे चावडी
चावडी तिथे वावडी |
गोर्या गोर्या हातात
सखु भरते बांगडी |
लगबगीने चालताना
सांडली तीची बुगडी |
पायवाटेच्या धुळीने
माखली हिरवी साडी |
डोईवरती पदर घेता
डोळ्यात टोचली काडी |
उन्हाची काहीली
काळजास घरं पाडी |
ओरडून ओरडून कोणी
देतो पहा दवंडी |
गुलाल, बुक्का उधळीत
दंडवत घाली बेगडी |
आंधळ्याच्या हातात
होती एक तागडी |
पण नवलच घडले
पडली दाजीबाची माडी |
सांगोवांगीचीच कहाणी
ऐकते सारी वाडी |
गाव बोले चांगभलं
नवस देवाचा फेडी |
कशी , कुठे, कधी, कुणी
जोडली कडीला कडी |
रंगला कलगी-तुरा
मिरवते पुणेरी पगडी |
वाचने
2410
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
किप रायटिंग फर्दर... एंड फर्दर
जबरी !!! :)
भारी लिहिलंय!
In reply to मस्त! by पैसा
मला बी सांगा की इस्कटुन पैकातई.
तुमी भारी हाय म्हनताव म्हणजे आसणारच भारी :)
का उगी नव्कविउत्तेजक धोरण?
In reply to मला बी सांगा की इस्कटुन by अभ्या..
नव्कविता आपल्याला कळत नैत!
मी ही कविता अशी वाचली
-------
गाव तिथे चावडी
चावडी तिथे वावडी |
गोर्या गोर्या हातात
सखु भरते बांगडी |
लगबगीने चालताना
सांडली तीची बुगडी |
-------
पायवाटेच्या धुळीने
माखली हिरवी साडी |
डोईवरती पदर घेता
डोळ्यात टोचली काडी |
उन्हाची काहीली
काळजास घरं पाडी |
--------
ओरडून ओरडून कोणी
देतो पहा दवंडी |
गुलाल, बुक्का उधळीत
दंडवत घाली बेगडी |
आंधळ्याच्या हातात
होती एक तागडी |
----------
पण नवलच घडले
पडली दाजीबाची माडी |
सांगोवांगीचीच कहाणी
ऐकते सारी वाडी |
गाव बोले चांगभलं
नवस देवाचा फेडी |
-------------
कशी , कुठे, कधी, कुणी
जोडली कडीला कडी |
रंगला कलगी-तुरा
मिरवते पुणेरी पगडी |
-------
आता बघ काय कथा आहे ती?
नाहीतर
-------
लगबगीने चालताना
सांडली तीची बुगडी |
डोईवरती पदर घेता
डोळ्यात टोचली काडी |
उन्हाची काहीली
काळजास घरं पाडी |
ओरडून ओरडून कोणी
देतो पहा दवंडी |
आंधळ्याच्या हातात
होती एक तागडी |
सांगोवांगीचीच कहाणी
ऐकते सारी वाडी |
रंगला कलगी-तुरा
मिरवते पुणेरी पगडी |
------
एवढ्या ओळीतही पुरा अर्थ लागतो का बघ!
पगडीला शॉट !!
`प'गडी आल्यावर हायसं वाटलं!
भारुड स्टाइल वाटली
आवडेश :)
छान... :)
यु रोक़!