मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शीळा घास

वैभवकुमारन · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
शीळा घास भीक मागत दारापुढे भिकारीण आली फाटके पोलके अन जिरलेली चोळी सुकलेल्या ओठी अश्या भाकारीच्या ओळी ठीगळांची नटलेली भुकेलेली झोळी भीक मागत दारापुढे भिकारीण आली -------1 कपाळ नीस्तेज पोटी हातभर खोली 'आशा' बाळ्गुनी पायी अंगठा ती घोळी उन्हाचे चटके त्यात डोळी कड ओली शिळ्या घासासाठी दारी उभी अशी भोळी भीक मागत दारापुढे भिकारीण आली----2 माय -माय करतच अनवाणी आली भान साऱ हरपुनी भुकेसाठी आली आली आली अशी एक भिकारीण आली शीळा घास पडे झोळी दुसऱ्या दारी गेली भीक मागत दारापुढे भिकारीण आली वैभव कुलकर्णी

वाचने 1235 वाचनखूण प्रतिक्रिया 2

अत्रुप्त आत्मा 30/11/2013 - 14:58
ठीक! :) पुढील लेखनासाठी शुभेच्छा! :)

अग्निकोल्हा 30/11/2013 - 16:02
हाताळला गेलेला विषय. दोन लिखाणात पुरेशी विश्रांती घेतली नाही तर वाचक दमतिल.