मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मडकी

सोनल कर्णिक वायकुळ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आभाळाच्या सावलीत जमिनीच्या पोटातून झरणारी माया पित शांत पहुडली होती सगळी कुणा दोन अनोळखी हातांनी ओंजळीत मावतील तेव्हढी उचलून नेली कच्ची बच्ची एकमेकांची ओळख घट्ट धरून मुठीत एका अनोळखी वर्तुळावर जावून पडली सारी सुरु झाला खेळ तशी, कधी भिजत, कधी थिजत शोधत राहिली हरवलेली जमिन फिरत राहिली काळचक्रावर भोवळ येईस्तोवर काही घडली,काही मोडली दोन हात तिम्बत राहिले त्यांना मनाजोगता आकार येईपर्यंत भाजून काढताना, हात कुणालातरी सांगत होते 'तावून सुलाखून निघाल्यावरच पक्की होतात मनं… वाजवून बघावीत एकदा , आणि नेभळट वाटली तर मांडूच नयेत बाजारात.' ऐकता ऐकता शोधत राहिली आपल आभाळ आपल्याच आतल्या अंध-या पोकळीत पुन्हा पुन्हा 'एक दिवस फुटून जेव्हा माती होऊ तेव्हाच भेटेल जमीन आणि आभाळ देखील' अस म्हणत मांडत राहिली स्वतःला दुकानात पुन्हा पुन्हा

वाचने 2337 वाचनखूण प्रतिक्रिया 9

केदार-मिसळपाव 27/11/2013 - 18:31
भारी

राजेंद्र मेहेंदळे 27/11/2013 - 19:10
पुकशु (पुढील कवितेला...)

राही 27/11/2013 - 23:23
कविता अतिशय आवडली. वेगळी वाटली. मडक्यांचे रूपक छान जमले आहे. शुभेच्छा.