तू गुड बॉय ना
लेखनप्रकार
हा लेख वाचला
या लेखातल्या एलिफंटवरून जाणवलं. आम्ही लहानपणी अगदीच खेडवळ होतो. आजकालची मुले छान
टाय, बूट मधे असतात. पाहूनच ती कशी स्मार्ट दिसतात. इंग्लिश फाड फाड बोलतात. आम्हाला इंग्लिश जाऊद्या हिंदीसुद्धा ऐकायला कधी मिळायचे नाही. चपला घालणे सातवीपर्यंत माहीत नव्हते. जीवन शिक्षण मंदिर नावाची शाळा. शाळेत गेल्यावर शाळेची घंटा अडकवण्यापासून, शाळा भरताना ती वाजवण्यापर्यंत सर्व कामे मुलांनाच नेमून दिलेली असत. शाळेत आलो की पहिल्यांदा खराटा हातात घेऊन अंगण झाडावे लागे. पडलेले कागदाचे कपटे बाजूला करून मैदान साफ करावे लागे. वर्ग साफ करावा लागे. वर्ग कुणी व्यवस्थितपणे झाडत असेल तर गुरुजींच्या डोळ्यात कौतुक दाटून येई.
महिन्यातून एकदा आमचे गुरुजी आम्हाला दोघा दोघांच्या जोड्या करून शेण आणायला गावात पिटाळत असत. छान नवाकोरा गाईचा पो पाहून कोण आनंद होई. आजही होतो. यामुळे गावात गायी कोठे आहेत हे आधीच हेरून ठेवलेले असे. मग शाळेत आल्यावर सगळ्यांनी आणलेले शेण पायरीच्या बाजूला साठवले जाई. मग वर्ग सारवायला सुरुवात होई. पाणी शेंदून आणण्याचे काम मुलांचे, सारवण्याचे काम मुलींचे असे. पुढचे काही दिवस त्या सारवलेल्या वर्गात बसताना विलक्षण प्रसन्न वाटे. स्वतःच शाळा स्वच्छ करावी लागत असल्याने सार्वजनिक ठिकाणी कचरा करू नये ही शिकवण कुणी देण्याची गरज पडली नाही.
शाळेला कुंपण नव्हते. मैदानातून कुणाचीही येजा आरामात चाले. दुपारच्या वेळी शेळ्यांचा एक कळप मैदानातून हमखास जाई. बहुधा मधल्या सुटीची वेळ असे. तो नेणारा मुलगा ओळखीचा झाला होता. तो कळप जाताना दिसला की मी तिकडे धाव घेई. मग तो मुलगा एका शेळीला पकडून आणी, मला तिच्याखाली हात धरायला सांगे. तो तिचे दूध काढून मला देई. शेळीचे ते धारोष्ण दूध विलक्षण उर्जा देणारे असे.
या सगळ्या वातावरणात मराठी/भारतीय संस्कृतीची वेगळी ओळख करून घ्यावी लागत नसे, ती आपोआप होत असे.
(अलिकडे झी मराठीच्या कार्यक्रमातून मराठी संस्कृती समजून घेणारे पालक पाहिले की गंमत वाटते...)
थंडीच्या दिवसात वर्ग कडूनिंबाखाली उन्हात भरे. मुलांनो मातीत हात घालू नका,
खड्यांशी खेळू नका हे अधून मधून गुरुजी सांगत. बहुतेक मुलांचा वेष अर्धी चड्डी, शर्ट आणि डोक्यावर टोपी असा असे. हे सगळे असले तरी तिथले शिक्षण मात्र उत्तम असे. तेव्हा शिकलेला भूगोल, गुरुजींनी आमच्यासमोर उभा केलेला इतिहास आजही विसरता येणे शक्य नाही.
तर एकूण असे आहे, बाकी गोष्टी नंतर केव्हातरी ...
वाचने
8408
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
वा..
अ हा हा ते दिवस!!!!!!
यस..
अच्छा हे....
मस्त आठवणी!
In reply to मस्त आठवणी! by पैसा
आमची लग्नानंतर शाळा सुरु झाली
In reply to आमची लग्नानंतर शाळा सुरु झाली by विजुभाऊ
=))
शेणानं सारवायला लागलं नाही
स्पर्धा आहे च्या नावाखाली
शेणाचं नाव काढुन ..
In reply to शेणाचं नाव काढुन .. by यसवायजी
...
मस्त लेख आहे हो जोग. आवडला.
एवढी सुंदर शाळा आमच्या नशिबात
In reply to एवढी सुंदर शाळा आमच्या नशिबात by पिलीयन रायडर
खालील शाळा चांगल्या आहेत असे
In reply to एवढी सुंदर शाळा आमच्या नशिबात by पिलीयन रायडर
शाळेत अॅडमिशन
जोग साहेब, अजून लिहा...
व्हयजी
...
आमच्या जुन्या सोसायटीत
स्पर्धा आहे च्या नावाखाली
...
मस्त ! मला वाटत सर्वच जिल्हा