कारवार - दाण्डेली सहल भाग-१
तसा मिपावर लेख लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न…!!!
फार वर्षा पासून आरामशीर नोकरी हवी होती जिथे माझी विकांताला फिरण्याची हाउस पूर्ण करता येईल आणि ती मिळाल्यावर आता गाडी जोरात सोडली. बंगलोर हून निघून सकाळी हुबळी गाठली आणि सहलीला खर्या अर्थाने सुरवात झाली. हुबळी-गोकर्ण- मुरुडेश्वर-एडगुंजी - कारवार-दांडेली अशी २ दिवसात आटोपशीर वाटणारी सहल अपेक्षे पेक्षा फार सुंदर झाली.
हुबळी ते गोकर्ण हा रस्ता यल्लापुर नामक एका गावातून जातो. त्या गावात प्रसिद्ध असणारे डोसे (दोसे) हाणायचा कार्यक्रम झाल्यावर गाडी सुसाट सोडली.
हुबळी ते गोकर्ण या मुख्य रस्त्यात सहज नजरेस न पडणारा एक झुलता पूल लागला. झुलता पूल म्हणून त्याची किंमत सामान्याच पण त्यावरून दिसणारे हे दृश्य पहिले तर का थांबलो हे कळेल.
आणि
आधाशा सारखे फोटो काढले पण पुढे अनेक पूल लागले ज्या वरून अजून सुंदर दृश्ये टिपता आली.
जसे जसे पुढे गेलो तसा निसर्ग पेटला होता. पुढे जाउन मुंबई-गोवा रस्त्याचा पुढचा भाग म्हणजे गोवा-कोचीन रस्ता आला. तिथून दक्षिणे कडे गेल्यावर साधारण १ तासांनी गोकार्णाचा रस्ता दिसू लागलं.
शेवटी १२.२५ ला कसे तरी गोकर्ण मंदिरात पोचलो. कसे तरी पोचलो कारण मंदिर १२.३० ला बंद होते अशी ऐकीव माहिती होति. गोकर्णचे मंदिर अतिशय सुबक व कोरीव वाटले. जास्त पैसे भरून लवकर दर्शनाच्या वाटेला न जाता साध्या ओळी मधून पण लवकर दर्शन मिळाले. सोमवारी गोकर्ण दर्शनाचे पुण्य घेऊन आणि मंदिरा पासून जवळच असणाऱ्या मंडपात प्रसादचे जेवण करून मुरुडेश्वर कडे प्रयाण केले. वाटेत गोकर्णाच्या बाजूला असणारा ओम बीच लागला, आणि तिकडे जाणारा रस्ता पण तेवढाच सुंदर आहे. हा रस्ता पाहताना आन्जरल्याच्या मंदिरा बाहेरून दिसणारा देखावा आठवला.
हा बीच बघून मुरुडेश्वर गाठला कोण्या रत्नाकर शेट्टी नामक माणसाने हे मुरूडेश्वर्राचे भव्य मंदिर आणि मूर्ती बांधली आहे. हा क्रिकेट बोर्ड वाला शेट्टी नाही हे नंतर कळले. मंदिराच्या बाजूलाच मुरुडेश्वर चा बिच आहे. गर्दी फार असते पण हा बीच डेंजर आहे हे कळल्याने वोटर स्पोर्ट्स च्या नादाला लागलो नाहीं.
तसे या भागातले प्रसिद्ध लोक म्हणजे कामत. कामतांचा गोतावळा बराच मोठा असावा. अनेक कामतांची अनेक हॉटेल इकडे दिसली. एव्हाना ५ वाजले होते. रात्र पडायच्या आता १०० कि. मी. लांब असणारे कारवार गाठायचे होते. मुरुडेश्वर हून निघाल्यावर ३० कि. मी. अंतरावर एड्गुंजी नामक गणपती चे कर्नाटकात प्रसिद्ध असणारे सुंदर मंदिर लगले. मुख्य रस्त्यापासून साधारण ६-७ कि. मी. आत असणारे हे मंदिर भव्य आहे. ते दर्शन झाल्यावर मात्र मस्त अंधारात गाडी सुसाट सोडली आणि आता कारवारच्या हॉटेल अमृत कडे सगळे लक्ष लागले होते. कारवार मध्ये मासे मिळणारे हे सर्वात चांगले हॉटेल आहे असे ऐकले होते. तिथे पोचण्या आधी कारवार मध्ये एन्ट्री करताना रवींद्रनाथ टागोर बीच लागला. रात्रीच्या अंधारात पण त्याचे सौंदर्य खुलले होते. तिथे जुलमाचा राम राम करून जेवायला हॉटेल गाठले आणि जे वाटेला येईल ते मनसोक्त हाणले.
रात्री ओळखीच्या पाहुण्यान कडे मुक्काम टाकला. खास कोकणी घरात राहायचा योग फार वर्षांनी आला सकाळी तिथे कारवार स्पेशल पोळी/नीर डोसे खावून बीच कडे प्रयाण केले. देवबाग आणि माजली असे २ बीच लागून आहेत. माजली बीच च्या पलीकडे गोवा चालू होते. आख्या बीच वर फक्त आम्ही ७-८ जण सोडून कोणी नव्हते. एवढा स्वच्छ किनारा फार दिवसांनी पाहत होतो. यथासांग डुम्बायचा सोहळा झाल्यावर खास मास्याचे घरगुती जेवण मिळाले.
परतीचा प्रवास कारवार-दंडेली-हुबळी भाग २ मधे….!!!
वाचने
18053
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
आपल्या प्रतिक्रिया जरुर कळवा
मस्त ....
फारच छान फोटो .या सहलीकडे खास
In reply to फारच छान फोटो .या सहलीकडे खास by कंजूस
ह्म्म्म...
धन्यवाद !
मस्त लिहिले आहे, आवडले.
फोटो सुंदर आहेत. वर्णन जरा
सहल आवडली
या मार्च मध्येच जाऊन आलो होतो
जायचंच आहे अशा स्थळांपैकी एक.
गोकर्न महाबळेश्वर म्हणतात तेच
In reply to गोकर्न महाबळेश्वर म्हणतात तेच by स्पंदना
हो
आठवणीची खूण.
याना
ऐल्ला मस्तच!!!
In reply to ऐल्ला मस्तच!!! by राजेंद्र मेहेंदळे
सोप आहे.
In reply to ऐल्ला मस्तच!!! by राजेंद्र मेहेंदळे
पुण्याहून गोकर्ण कारवार
In reply to पुण्याहून गोकर्ण कारवार by घाटावरचे भट
ते सगळ राहु दे भटा ...
In reply to ते सगळ राहु दे भटा ... by सुहास..
ते सगळ राहु दे भटा ...
In reply to ऐल्ला मस्तच!!! by राजेंद्र मेहेंदळे
पुण टू पुणे
ट्रॅफिक आहे.
In reply to ट्रॅफिक आहे. by पुतळाचैतन्याचा
असहमत
फारच सुंदर दिसतोय हा भाग.
भाग २ मधे वर्णन केल आहे.
छान!