मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आनंद - कार्लसन डाव ७

चतुरंग · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
४-२ गुणांनी मागे पडलेल्या आनंदसाठी अत्यंत कळीचा डाव! आज त्याला जिंकायलाच हवे. ड्रॉ होणारा प्रत्येक डाव कार्लसनला विजयाच्या जवळ नेतोय अर्ध्या गुणानी. कोणते ओपनिंग? कोणती स्ट्रॅटॅजी? २० कोटी लोक जगभरातून हा गेम फॉलो करताहेत. कदाचित क्रिकेट्पेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली आहे! चला गेम बघूयात.

वाचने 20742 वाचनखूण प्रतिक्रिया 109

चतुरंग Mon, 11/18/2013 - 15:02
घोडा एफ ३, घोडा सी ६ मागल्या डावासारखीच सुरुवात रॉय लोपेझ

रमताराम Mon, 11/18/2013 - 15:09
ही बरीचशी परिचित खेळी. आल्याआल्या उंटाला हुसकावून लावणे. अगदी नवीन नवीन बुद्धिबळ खेळायला लागलो तेव्हा 'उंट इतका जवळ येतो म्हणजे काय?' असं म्हणत त्याला ताबडतोब हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला जाई त्याची आठवण झाली. :)

In reply to by रमताराम

चतुरंग Mon, 11/18/2013 - 15:11
अगदी, अगदी!! चल हाकल मागे असा आविर्भाव चेहेर्‍यावरती!! :)

चतुरंग Mon, 11/18/2013 - 15:09
सायकॉलॉजिकल लढाई जिंकण्याचा मार्ग. आनंद्ला वेगळ्या खेळ्या हुड्कल्याच पाहिजेत. आतापर्यंतच्या सगळ्या डावात आनंदची प्यादे रचना दुबळी पडल्याने तो एंडगेमला अडचणीत आला होता. तो भाग त्याला यावेळी सांभाळावा लागेल.

रमताराम Mon, 11/18/2013 - 15:12
त्यांने उंट एच पट्टीत नेऊन पिन कायम राखला. आनंद इतक्यातच जी प्यादे पुढे आणणार नाही असा त्याचा - वाजवी - अंदाज आहे. कारण तसे केले तर त्याला उजवीकडे कॅसल-इन करण्याचा पर्याय जरा दुबळा होऊन जातो.

In reply to by रमताराम

रमताराम Mon, 11/18/2013 - 15:14
वजीर पुढे सरकून राजाला पर्यायी जागा देत नाही तोवर मेट-थ्रेट (क्वीन ई-४ आणि नंतर क्वीन x एफ-२ ने येणार) वाचवण्यासाठी कॅसल हा पर्याय त्याला हाताशी ठेवावा लागेल.

चतुरंग Mon, 11/18/2013 - 15:14
आज आनंदला फायद्याचे आहे. कार्लसन ज्या प्रकारे बसलाय ते बघण्यासारखे आहे! इतका कॅज्युअल बसलाय तो की कुठल्याशा क्लबात कॉफीटेबल खेळ चालू असावा. आनंदला लक्ष फक्त पटावर ठेवायचे आहे. आणि जिंकायचे आहे.

रमताराम Mon, 11/18/2013 - 15:16
पुन्हा एकवार घो एफ-१? दुसर्‍या डावाप्रमाणे पुन्हा घोड्यांना जागा शोधण्यात आनंद वेळ घालवणार की काय?

In reply to by रमताराम

चतुरंग Mon, 11/18/2013 - 15:21
कारण घोडी राजाच्या बाजूला हल्ला करुन नेणे महत्त्वाचे आहे. कार्लसनने घोडा मारला. तो डाव सोपा करायला बघतोय. वजिराने घोडा घेतला. जी ६ प्यादे सरकले आता घोड्याच्या उड्या थांबवल्यान त्याने.

In reply to by चतुरंग

रमताराम Mon, 11/18/2013 - 15:30
तुला हव्या त्या ठिकाणी पोटभर मिसळ खाऊ घालेन. हत्तीवरून मिरवणूक काढेन तुझी. होऊ दे खरचं.

छोटा डॉन Mon, 11/18/2013 - 15:24
मागच्या ३ सामन्यात असेच धावते समालोचन देऊन आम्हाला अगणित आनंद दिल्याबद्दल ररा, रंगाशेठ आणि इतर सर्वांचे आभार. साला टिव्हीवरची कॉमेंट्री ऐकायला लै मज्जा येते. - छोटा डॉन

चतुरंग Mon, 11/18/2013 - 15:26
जाम वाढलाय! विडिओ थांबतोय मधेमधे. उंट ई३? उंटांचे एक्सचेंज का करतोय आनंद? वजिराने मारुन मग एच ६ असे घुसायचा प्रयत्न आहे का? वजीर जी ४ अशी जास्तडायनामिक होती. किंबहुना आज ओपनिंग सुद्धा दुसरे करायला हवे होते!

चतुरंग Mon, 11/18/2013 - 15:29
असं दिसतंय कारण राजाच्या बाजूला प्यादी रेटायची असली तर ते सोयीचे पडेल. आता बहुतेक ०-०-० आणि त्यानंतर एच४ असे प्यादे पुढे सरकेल असा अंदाज.

चतुरंग Mon, 11/18/2013 - 15:35
आता कार्लसनला चॉइस करायचाय कॅसल कुठल्याबाजूला? तोही बहुदा तेच करेल. येस! त्याचेही लाँग कॅसल. मॅग्नुस त्या त्या खेळीसाठी जे आवश्यक आहे तेवढेच करतो आहे. जास्त लांबवर विचारकरुन डोके शिणवून घेत नाहीये!

रमताराम Mon, 11/18/2013 - 15:38
कॅसल्स. लांबणार डाव पहिल्या सहा प्रमाणेच. (बायली या वीडिओला काय होतंय. बंद पडतोय सारखा. आणि पुन्हा चालू होतो तेव्हा पुन्हा मागचेच संवाद ऐकू येतायत.)

In reply to by रमताराम

चतुरंग Mon, 11/18/2013 - 15:51
रिफ्रेश करत राहा सारखं, मला ते करावे लागते आहे अधून मधून

चतुरंग Mon, 11/18/2013 - 15:48
जी ४ असे प्यादे टाकेल का? कारण मोहोरी हलवण्यात काही मतलब दिसत नाहीये.

चतुरंग Mon, 11/18/2013 - 15:50
राजा बी १ मधे गेला. ए२ मधले प्यादे सपोर्ट केले शिवाय पुढे मारामारी झाली तर राजा उघडा पडायला नको. मॅग्नुस बहुदा कॉपीकॅट स्टाईलने त्याचाही राजा हलवेल बी८ मधे.

चतुरंग Mon, 11/18/2013 - 15:59
एच प्यादे सरकवले आनंदने. उत्तम. आता उंट जी ५ अशी धमकी. कारण कार्लसन घोडा बी८ ला न्यायला बघत होता ती खेळी थांबली.

चतुरंग Mon, 11/18/2013 - 16:06
प्यादे एच ५ आता हत्ती पुढे काढून ई४ प्याद्याला सपोर्ट करायचा इरादा दिसतोय. मॅग्नुसने उंट मारला. पुढल्या २ खेळ्या चटचट झाल्यात. एच प्यादी पटावरुन गेलीत. काळ्याचा डाव सॉलिड आहे. अजूनतरी काही वीकनेस नाही.

चतुरंग Mon, 11/18/2013 - 16:11
फार हुषार आहे. डाव लाँग एंडगेमम्धे नेणे हे त्याचे उद्दिष्ट तो साध्य करतोय. आनंदला प्यादी सुद्धा सहज सरकवता येणार नाहीत. रुक एंडगेम तर आनंदसाठी चांगला नाहीच्.\जी ३ प्यादे सरकवले.

चतुरंग Mon, 11/18/2013 - 16:22
पहिल्यांदा मॅग्नुस विचारात पडलेला दिसतोय. गुरुची विद्या गुरुला करण्याशिवाय आनंदकडे पर्याय दिसत नाही. तुला लाँग एंडगेम हवाय का घे मग आणि त्यातही मी जिंकून दाखवतो!

चतुरंग Mon, 11/18/2013 - 16:28
या संपूर्ण सामन्यात कार्लसन आनंदला कोणत्याही डावात फार मोठे पोझीशनल अ‍ॅडवांटेज घेऊ देणार नाही त्यामुळे होम प्रिपरेशनचा फारसा उपयोग नाही. काय खेळायचे ते आत्ता इथे पटावर. मॅग्नुस खेळलाय ए ५! नेहेमीप्रमाणेच अनपेक्षित खेळी. तो राजाच्या बाजूला प्याद्यांची मोर्चे बांधणी करतच नहिये. सध्या जागा बळकावणे आणि वेटिंग मूव, आनंदला आव्हान आहे तुझा प्लॅन दाखव!

चतुरंग Mon, 11/18/2013 - 16:34
आक्रमक खेळी हत्ती एच ७! आता हत्तींची मारामारी होणार का? दुसरा हत्ती एच स्तंभात आणून हत्तींची मारामारी झाली. आता वजीर एफ ६ असा घेणार मॅग्नुस.

चतुरंग Mon, 11/18/2013 - 16:48
आनंदने फक्त एक गोष्ट साध्य केली आहे की त्याची प्याद्यांची रचना उअत्तम आहे. आणि मॅग्नुसचे दी प्यादे डबल आहे. एवढ्या तुटपुंज्या भांडवलावर त्याला विजय मिळवायचा आहे!!

In reply to by चतुरंग

रमताराम Mon, 11/18/2013 - 16:53
त्या डबल झालेल्या प्याद्यांनीच उत्तर कोट करून ठेवला आहे त्याच्या राजासाठी. याउलट आनंदचा राजा शेवटच्या पट्टीत असल्याने आणि पुढची तीनही प्यादी जागीच असल्याने लास्ट-फाईल चेक चा धोका कायम ध्यानात ठेवून चाल करावी लागते आहे. हे बंधन काहीसे परवाच्या एच पट्टीतला बंधनासारखे ठरू नये म्हणजे मिळवली.

In reply to by रमताराम

चतुरंग Mon, 11/18/2013 - 16:55
स्थितीत बरोबर आहे. परंतु एंडगेम मधे त्याचे भांडवल करणे महत्त्वाचे ठरणार आहे, आनंदसमोर दुसरा पर्याय नाहीच आहे!

रमताराम Mon, 11/18/2013 - 16:50
आनंदने ई प्यादे घेण्याची घाई का केली कोण जाणे. कोपर्‍यात गेलेला वजीर पुन्हा सक्रीय झाला मॅग्नसचा. शेवटच्या फळीतला मेट-थ्रेट वाचवायला इतर पर्याय होते. खरंतर घोडा पुरेसा आहे. आणि घोड्यासाठी वजीर अडकवून ठेवणे परवडले नसते मॅग्नसला. :(

चतुरंग Mon, 11/18/2013 - 16:51
झपाट्याने ड्रॉकडे निघालाय असे दिसते. आता कार्लसन एफ ५ अशी धमकी देतोय. त्यामुळे एफ ३ मधे वजीर.

In reply to by चतुरंग

रमताराम Mon, 11/18/2013 - 17:09
आज तो रुक-पॉन एन्डिंगचा बराच अभ्यास करून आला असावा आणि मॅग्नसने झटपट दोन्ही हत्ती पटाबाहेर काढून त्याचा डाव उधळून लावला असे दिसते. :)

In reply to by रमताराम

रमताराम Mon, 11/18/2013 - 17:11
(हे रिकामे प्रतिसाद कसे पडतायत) कदाचित असं असेल की आनंद आज रूक-पॉन एन्डिंगचा भरपूर अभ्यास करून आला असावा. पण दोन्ही हत्ती झटपट पटाबाहेर काढून मॅग्नसने त्याचा प्लान उधळून लावला असे दिसते.

In reply to by रमताराम

चतुरंग Mon, 11/18/2013 - 17:18
कारण बर्‍याचदा या खेळी पटावरच्या स्थितीप्रमाणेच खेळाव्या लागतात फारसा अभ्यास करण्यासारखे नसावे. त्याने एनर्जी वाचवली. काळ्या मोहोर्‍यांकडून खेळण्याचे त्याने नक्की केले आहे. कारण आनंदकडे फार पर्याय आहेत असे वाटत नाही. कार्लसनला खेळी करु द्यायची आणि त्यावर उत्तम पर्याय शोधायचा हीच स्ट्रॅटेजी त्याला काही देऊ शकेल असा माझा अंदाज!

In reply to by चतुरंग

पण ते खुप म्हणजे फारच म्हणजे लैच म्हणजे अतिचशय अवघड आहे !! आणि ह्यात नशिबाचा काही भाग नाही ... बाकी हीच गोष्ट आपल्याला चेस बाबत आवडते .... इट्स अ गेम विदाऊट चान्स !! पाऊस पडला म्हणुन डकवर्थ लुईस नाही की दव पडल म्हणुन स्पिनरला अ‍ॅडव्हान्टेज नाही .... नो लक फॅक्टर ... प्रत्येक पॉईट हा झगडुनच मिळवावा लागेल !!