Skip to main content

आनंद - कार्लसन डाव ६

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 16/11/2013 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
काल पहिला पाडाव झाला! आज काय होणार? आधीच्या दोन्ही वेळा २०१० आणि २०१२ मधे एक डाव हारल्यावर ताबडतोब पुढच्या डावात आनंदने वचपा काढला होता. गेल्फंडला तर त्यने केवळ १७ खेळ्यात हरवले होते. चमत्कार पुन्हा होईल का? विशेषतः कार्लसनला हरवणे हे कितपत कठिअण आहे? चला बघूया.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 21548
प्रतिक्रिया 115

प्रतिक्रिया

ई४ ने सुरुवात केली आनंदने. दोघांचे किल्लेकोट झालेत्.अजूनही थिअरीत आहे दोघे प्रत्येकी सहा खेळ्या झाल्यात.

आज निश्चित गंभीर वाटतोय. आनंद सुद्धा नक्कीच निश्चयाने उतरलाय मैदानात, शंकाच नाही! जी५ वरच्या उंटाला मागे हाकलताना राजाच्या बाजूची प्यादी ढकलली की वजीर आनी राजा अशा दोन्ही बाजूला काळ्यासाठी प्याद्यांची रचना दुबळी होते. मॅग्नुस त्यासाठी जाईल का? त्याचा घोडा वजिराला पिन झालाय

मधल्या उंटावर आले तर बी ३ मधला उंट डि ५ मधे येऊ शकतो कारण जी ५ मधला उंट मारला तर सी ६ मधला घोडा पडतो आणि काळ्याचे हत्ती फोर्कमधे बसतात, आणि एक पडतो!

अवांतर माहिती : आज तानिया नाही समालोचनाला... फ्यामिलीत लग्न आहे म्हणे... ८ तारखेला येणार आहे चेन्नैत परत...

मधे ७ ते १७ वर्षांच्या सर्वांना बुद्धिबळ कम्पल्सरी सब्जेक्ट! बुद्धिबळासाठी चांगली पण बिचार्‍या विद्यार्थ्यांसाठी दु:खद बातमी. :)

आता मारामारी टाळली आनंदने. आता एच ६ प्यादे उंटावर आले. आनंदने इथे त्याचे इनिशिएटिव किंचित घालवले का? उंट मागे गेला एच ४ मधे

स्थिती काँप्लिकेटेड करुन आनंदने मॅग्नुसला पहिल्यांदा मारामारी करायला भाग पाडले. आता घोड्याने उंट मारला तर सी ५ वरचा उंट मागे घेणे भाग पडते किंवा ए प्याद्याने उंट मारुन ए स्तंभ हत्तीसाठी मोकळा करुन घेता येईल.

आनंद सुरुवातीला आक्रमण करणार नाही हे आता पक्के डोक्यात बसल्याने आपण त्याची काही प्यादी सुरुवातीस घेतली तर कदाचित तो अधिक बचावाकडे लक्ष देईल आणि आक्रमण करणे सोपे होईल ही खेळी आहे कार्लसनची.

परत गेला घोडा. एका खेळीचे इनीशिएटिव जाऊ दिले कार्लसनने.कारण त्याला तो डी७ वर आणायचा आहे आणि पिन झालेला घोडा सपोर्ट करयचा आहे मग वजीर बी १ किंवा सी मधे जायला मोकळा!

In reply to by भडकमकर मास्तर

खरेतर हा वीकनेस समजला जातो परंतु आत्ताच्या परिस्थितीत आनंदची मोहोरी चांगल्या जागा पकडून आहेत आणि शिवाय हत्तीला ए स्तंभ मोकळा मिळालाय काँपेन्सेशन म्हणून!

प्यादे टाकून ऊंटावर चाल करता येईल प्याद्यांची मारामारी झाली पुढल्या खेळीत ई४ वरचे प्यादे ई५ असे येऊन एफ ६ वरच्या घोड्याला अडचणीत आणू शकते!

खेळून त्याचे इनीशिएटिव डाव जिंकण्यात बदलणे अत्यावश्यक आहे. आधीच्या दोन्हीवेळा थोडा डिफेन्सिव खेळून त्याने ते अ‍ॅडवांटेज ड्यूसमधे घालवले होतेन! त्याचा डाव अतिशय डायनामिक झालाय एच ३ प्यादे पुढे टाकले. मॅग्नुसचा घोडा अंदाजाप्रमाणे घोडा डी७ मधे आला.

घोडा एच२ मधे आणला आता प्लॅन जी ४ मधे आणून एफ ६ घोड्यावर दुसरा जोर आणायचा आहे. मॅग्नुसने वजीर ई७ मधे घेतलाय.

In reply to by चतुरंग

ई-३ नि मग एफ-५ वजीरावर मोर्चेबांधणी. वजीर फारच संकुचित ठिकाणी अडकल्याने हा धोका ओळखून मॅग्नसला त्याचा विचार आताच करावा लागेल. त्यामुळे कदाचित त्याचा स्वतःचा प्लान एक खेळी पुढे ढकलावा लागेल.

आनंद लांबवतो आहे. जितक्या खेळ्या त्या वजिराला बाहे पडायला लागतील तेवड्।ए आनंदची डेवलपमेंट आनी इनीशिएटिव वाढतत जाणार आहे! आता मॅग्नुसने उंट बी ६ मधे मागे घेतला. या सामन्यात प्रथमच मॅग्नुस बॅकफुटवर गेल्यासारखा वाटतोय. पुढचा प्लॅन काय आहे मॅग्नुसचा?

ई३ मधे आणि अखेर मॅग्नुसचा वजीर अनपिन करुन घेतलान त्याने आता प्यादे बी ४ मस्त खेळी मॅग्नुसचा घोडा आता सी ५ वर येऊ शकत नाही!

आता आनंदने अ‍ॅटॅक करायलाच हवा! डी४ खेळत येईल का? की आधी बी ४ करुन उंटाला मागे रेटावे?

उंटाने अखेर तो घोडा (एफ-६) घेतला. मला तो घोड्याने घेतला जाईल असे वाटले होते. यामुळे मागून बाहेर येऊ पाहणार्‍या वजीराचा मार्गही मोकळा झाला असता.

वजीर जी-४? एफ-२ चे प्यादे नाजूक असल्याने आता घोडा हलत नाही. अशा वेळी वजीर दूर नेणे म्हणजे राजाच्या बाजूवर एफ-२ ला मोर्चे लावून बसलेले मॅग्नसचे उंट्+वजीर कॉम्बिनेशनला बळ देणे. नक्की काय विचार करतोय आनंद?

In reply to by चतुरंग

डाव्या बाजूने हल्ला करण्याची संधी असताना उजवीकडे घोड्यांच्या डेवलपमेंटमधे वेळ घालवला त्याने सगळं बिनसलं. (कालही डावीकडे राजाचा कोट करण्याच्या नादात मॅग्नसचा उजवीकडचा हत्ती मोकळा सोडला नि त्याने घात केला) घोडे नैसर्गिकरित्या जिथे बाहेर येतात त्याहून ऑकवर्ड पोजिशनला नेण्याच्या नादात काही खेळ्या वाया गेल्या.

In reply to by रमताराम

कारण घोडी जनरली बोर्डाच्या कडेला गेली की आता आणणे अवघड असतेच. त्यात अशी काँप्लिकेटेड पोझीशन असताना अधिकच अवघड. अनैसर्गिक खेळ्यांची किंमत त्याला मोजावी लागली!

In reply to by रमताराम

याच खेळीवर सगळ गाडं घसरलंय असं दिसतंय. मागचा ए पट्टीतला हत्ती नाजूक असल्याने दुसरा हत्ती कायम शेवटच्या फळीत ठेवावा लागत असल्याने वजीर पुढे काढण्याने उंट-घोड्याच्या अदलाबदलीतून कमकुवत झालेल्या एफ-२ प्याद्याला बाहेर खेचले मॅग्नसने आणि अचानक आनंदला राजाची काळजी करणे भाग पडले.

आता हत्ती एफ १. पोझीशन एकद्म सिंपल झाली राव. डाव ड्रॉ काढणे आता सोपे झाले मॅग्नुसला असे वाटते.

झटपट ड्रॉ होणार आज असं दिसतंय. हत्ती एफ-१ केव्हाही निष्प्रभ करू शकतो मॅग्नस. ए पट्टीतल हत्ती केव्हाही उचलता येतोय त्याला. आनंदला दुसर्‍या हत्तीने बरोबरी करण्याखेरीज पर्याय नाही. त्याचा सगळा प्लान उधळतोय. आनंद डिसपॉईंट्स मी. :(

आतापर्यंतचा खेळ पुस्तकी वाटला, त्यात दोघांचे वजिरही अजुन जागे त्यामुळे केल्क्युलेश्न्स करताना मेंदू हेंग होतोय. डाव कोणाकडे सरक्तोय कोणी समजावेल काय?

डॉ सीएनआर राव आणि आपला लाडका तेंडल्या यांना 'भारतरत्न' जाहीर. ये धत्तड तत्तड.....

In reply to by रमताराम

तेंडल्याची बातमी चेपुवर वाचली होती डॉ. रावांबद्दल आत्ताच समजले. दोघांचे अभिनंदन. तेंडल्याला योग्यवेळी दिले म्हणायचे, औचित्यपूर्ण!

कुठल्या sport channel वर हा गेम चालु आहे का? संगणक नसल्यामुळे पाहता येत नाही .