मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उपवासाचे आप्पे

अनन्न्या · · पाककृती
साहित्यः दोन वाट्या वरी तांदूळ, अर्धी वाटी साबुदाणा, मिरची पेस्ट, आले पेस्ट, जिरे पावडर, कोथिबिर, दाण्याचे कूट, मीठ, आले पेस्ट, खायचा सोडा, तेल किंवा तूप. कृती: आप्पे करायचे असतील त्याच्या आदल्या दिवशी वरी तांदूळ आणि साबुदाणा वेगवेगळे भिजत घालावे. ७-८ तासांनी दोन्ही एकत्र मिक्सरवर वाटावे. मिश्रण इडलीच्या पिठाइतपत असावे. रात्रभर झाकून ठेवावे. सकाळी आप्पे करण्यापूर्वी या मिश्रणात अर्धा चमचा आले पेस्ट, अर्धा चमचा मिरची पेस्ट (आवडीनुसार प्रमाण घ्यावे.), मीठ, अर्धा चमचा जिरे पावडर, २-३ चमचे दाण्याचे कूट, चिरलेली कोथिंबिर मिसळावी. पाव छोटा चमचा खायचा सोडा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. आप्पेपात्रात नेहमीच्या आप्प्याप्रमाणे आप्पे करावे. नारळाच्या दही घातलेल्या सैलसर चटणीसोबत खावे. हे आप्पे गरमच छान लागतात.Appe

वाचने 12277 वाचनखूण प्रतिक्रिया 17

अनन्न्या 13/11/2013 - 17:48
मला तर दिसतोय फोटो!

जेपी 13/11/2013 - 18:09
काल टाकली असती तर आज करुन पाहिली असती . आता पुढच्या उपवासापर्यंत फोटो पाहुनच समाधान मानावे लागणार .

प्यारे१ 13/11/2013 - 18:12
एकादशी नि 'आप्पे' खाशी! मस्तच. फोटो बघून जळजळ झालेली आहे. - आज निरहंकाराच्या प्रयत्नात ;) फलाहारी प्यारे

विशाखा राऊत 13/11/2013 - 18:57
फोटु का दिसत नाही

स्पंदना 14/11/2013 - 07:50
मस्त पाककृती अनन्या! जो फोटो अल्बम आहे त्याला जोवर ओपन फॉर पब्लिक हे सटींग देत नाहीस तोवर फोटो दिसणार नाही, तेव्हढ कर.