संस्कृती..
सर्व मंडळींचे मिसळपाववर स्वागत!
ऋणनिर्देश -
नीलकांत
गमभनकार ओंकार जोशी
===============================================
आमची आदरस्थाने -
मनोगत
उपक्रम
मायबोली
माझे शब्द
मराठीगझल
सुरेशभट डॉट कॉम
===============================================
राम राम मंडळी,
आज गणेशचतुर्थीच्या शुभमुहूर्तावर हे संकेतस्थळ सुरू करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आपणा सर्व सभासद मंडळींचा या संकेतस्थळावर सक्रीय सहभाग आणि सहकार्य राहील अशी आम्ही आशा व्यक्त करतो.
श्री पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे! महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व! त्यांच्या 'संस्कृती' या विषयाची फार सुंदर व्याख्या करणार्या चार ओळी इथे लिहून आम्ही या संकेतस्थळाचा शुभारंभ करत आहोत!
कळावे,
आपले नम्र,
मिसळपाव पंचायत समिती!
===============================================
संस्कृती!
"शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी, केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण, उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ, मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळाचे पाणी, दुसर्याचा पाय चुकून लागल्यावरदेखील आपण केलेला प्रथम नमस्कार, दिव्या दिव्या दीपत्कार, आज्जीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टी, मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी शेपटी, दसर्याला वाटायची आपट्याची पाने, पंढरपूरचे धूळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे, सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मूठभर अस्थिंचा गंगार्पणाच्यावेळी झालेला स्पर्श, कुंभाराच्या चाकावर फिरणार्या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूल हात लागून घाटदार मडके घडावे तसा ह्या अदृष्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो.
कुणाला देशी मडक्याचा आकार येतो, कुणाला विदेशी कपबशीचा!
-- पु ल देशपांडे.
वाचने
29420
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
श्रीगणेशा
In reply to श्रीगणेशा by नंदन
सहमत..
In reply to श्रीगणेशा by नंदन
श्रीगणेशा
अजुन एक ऐकलेली
In reply to अजुन एक ऐकलेली by प्रकाश घाटपांडे
अजुन एक ऐकलेली - अजून
आदरस्थानांबाबत थोडेसे
In reply to आदरस्थानांबाबत थोडेसे by सागर
चुकीचे आदर्श
In reply to चुकीचे आदर्श by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सर्किट
हॅलो ऑल
माझे शब्द बद्दल.
In reply to माझे शब्द बद्दल. by नीलकांत
साडेसाती
In reply to साडेसाती by आजानुकर्ण
आजानू, ही
राजसाहेबांनी संकेतस्थळ विकलेय!
आपल्या
अभिनंदन!
In reply to अभिनंदन! by माधवी गाडगीळ
मॅडम
मिपा ने अंतार्जालावर बरीच मजल
(No subject)
.
मिपा इज मिपा !
माझे अनुभव
In reply to माझे अनुभव by सर टोबी
हं
In reply to हं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थत्ते चाचा, सुनील, सर्वसाक्षी