सुगरण ??
मध्यतंरी कोल्हापुरला गेलो होतो. त्यावेळी चिमण्यांचा आकाराचे काहि पोटावर पिवळसर झाक असलेल पक्षी अचानकच दिसले.
सहजच म्हणून घराच्या मागच्या बाजुला गेलो आणि बघतोय तर काय मला दिसली ही एक सुखी समृद्ध कॉलनी.
तिच नाव बहुद्धा "आदर्श कॉलनी"च असेल बॉ. :)
बघा बघा तुम्हीदेखील बघा.
मग जरा ह्या कॉलनीतील रहिवाशी कसे आहेत आणि काय करत आहेत हे बघुया म्हणल तर हे महाशय दिसले.
बहुद्धा मनातच म्हणत असतील, "छे एक घर असताना देखील ह्या आमच्या बयेन दुसर घर बांधायला सांगितलय.
तिला काय जातय नुसतच सांगायला. इकडे मी किती दमतो. चला ती जवळपास दिसत नाहिये तोवर एक डूलकी काढावी."
असच चिंतन चालल असेल नै? :)
"अरे बापरे! आली वाटत."
आता कुठे त्या दोघांमध्ये लक्ष देता म्हणुन मी दुसर्या एका रहिवाशाकडे मोर्चा वळवला. पण हे साहेब
त्यांच्या कामात फारच गर्क होते. त्यानी माझ्याकडे पुर्ण दुर्लक्ष केल आणि काम सुरुच ठेवल.
मग मी देखील त्याना फारस डिस्टर्ब न करता पुढच्या घराकडे पाहिल तर हे महाशय असे बसले होते. जणू म्हणत असावेत,
"चला घर बांधुन झाल. आता कारभारीण कधी येते त्याची वाट बघुया." :)
मंडळी मी तिथुन थोडस पुढे आलो तर कोणा एका हिरोने त्याच्या सखीसाठी दोनमजली घर बांधुन ठेवलेल दिसलं.
ते दोघेही कुठे दिसले नाहीत. मग लक्षात आल गेले असतील बाजारला खरेदी करण्यासाठी. कदाचित त्यांच्या
घरी कोणी लहान पाहुणा येणार असेल त्याची तयारी करत असतील.
म्हणूनच दोन मजली घर केल असेल. :)
तिथुन जरा पलिकडच्या फांदीवर हे एक घरट आणि त्याची मालकीण दिसली. ती बहुद्धा त्याची वाट बघत दाराच्या जवळच
बसली आहे आणि म्हणत आहे ," आता तर होता की हा, लगेच कुठे गेला??
मघाशी मी जरास रागवुन गेलास उडत असं म्हणाले त्यामुळे तर कुठे गेलेला नाहिये ना हा??"
आणि काय सांगु मित्रानो, तिच हे स्वगत त्याला लग्गेच कळाल आणि तो आलाच. हे बघा.
मग कशी वाटली "आदर्श कॉलनी' ?
नक्की सांगा बर..... :)
बाय द वे, हा पक्षी सुगरणच ना? कि त्यालाच शिंपिण म्हणतात??
अवांतर : मला पुर्वदृष्य मध्ये सगळे फोटो नीट दिसले आहेत. जर कोणाला दिसत नसतील तर
http://picasaweb.google.co.in/zakasrao/SugaranichiGharate#
इथे जावुन पहा. सगळे फोटो आणि त्यांची वर्णन लेखात असलेल्या क्रमानेच आहेत.
लेखनविषय:
वाचने
17523
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
मस्त फोटो...
In reply to मस्त फोटो... by प्रभाकर पेठकर
क्लासिक
सुंदर..
In reply to सुंदर.. by विसोबा खेचर
तात्या तुम्ही म्हणताय ते खरं आहे.
हेहे झकास
सुगरण
In reply to सुगरण by लिखाळ
शिंपी व सुगरण वेगळे?
In reply to शिंपी व सुगरण वेगळे? by चतुरंग
एकच नाहीत
In reply to एकच नाहीत by महेश हतोळकर
धन्यवाद, मी!
In reply to एकच नाहीत by महेश हतोळकर
+१
In reply to +१ by ध्रुव
शिंप्याचे चित्र!
मस्त
अरे वा झकासराव, झकास आलेत राव फोटू! :)
सुगरण
अरे
सुगरण
वा!
फोटो, टिप्पणी
छान
खास....
फोटो आणी
खुपच छान.
झकास!
मस्तच आभार
सुंदर चित्र!
मस्त चित्र
मस्त्च
सगळे फोटो लाजवाब!
झकास
वा!
खुप मस्त ....
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to सुरेख by नंदन
असेच
झकासराव
झकास
झकासराव, फो
इथे
झकास
वारेवा फोटो
व्वा..