मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'वाढदिवस'

अमेय६३७७ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
रोजच्याच राघववेळी, उठण्याची घटिका झाली  दिवसाचे विझले डोळे, रात्रीस नीज ना आली वडिलांच्या कानी बोले, आवाज आज आईचा, "पुत्राच्या वाढदिनाचा, सोहळा खास घाईचा" "पाहता पाहता सरली, परि कैशी इतकी वर्षे?"  बाळाचे कौतुक दाटे, डोळ्यांतुन श्रावण बरसे औक्षणास उठते माता, वडिलांचा धरुनी बाहू  "उठवाया सोनूल्याला, दोघेजण मिळुनी जाऊ"   थरथरत्या हातांवरती, सावरती हार फुलाचा भिंतीवर सैनिकवेषी, हसतो चेहरा मुलाचा -- अमेय

वाचने 6434 वाचनखूण प्रतिक्रिया 28

इन्दुसुता 02/11/2013 - 21:31
आई ग्गं !! पाभे भाऊंप्रमाणेच काय बोलू समजत नाही.

कवितानागेश 03/11/2013 - 01:09
....:(

अत्रुप्त आत्मा 03/11/2013 - 07:29
__/\__

निवेदिता-ताई 03/11/2013 - 15:33
........

चित्रगुप्त 03/11/2013 - 18:07
अगदी शेवटल्या ओळीत अनपेक्षित झटका देऊन निशब्द केलंस मित्रा.

माम्लेदारचा पन्खा 04/11/2013 - 15:10
खूप छान अमेय...लिहित रहा....

प्रभाकर पेठकर 06/11/2013 - 10:20
शब्दांचा फापटपसारा न मांडता एक अत्यंत प्रभावी काव्य प्रसविणार्‍या कवीच्या प्रतिभेला, संवेदनशीलतेला थरथरत्या हाताने सॅल्यूट.

मिसळलेला काव्यप्रेमी 06/11/2013 - 12:34
!!

आनंदमयी 07/11/2013 - 13:35
थेट मनाला जाऊन भिडली....

ब्रिज 07/11/2013 - 15:14
कवितेची गाडी त्या शेवट्च्या ओळींवर गचकन थांबली. नि:शब्द !

झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला) 11/11/2013 - 18:45
ताकत आहे राव तुमच्या शब्दात. खरंच. _/!\_

राघव 27/11/2013 - 00:14
काय बोलू? वाईट्ट लिहिलंय राव. नि:शब्द.