१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती.
असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा...ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका... काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा....पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची.
अॅन्ड्रॉईड (Android)- इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत
अॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८--९ हजारापासून ४० हजारापर्यंत अॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी)
सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर - मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला.... असो !!)
आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम.
१. WhatsApp Messenger - सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM - BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट.
२. M-Indicator - मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते.
३. NewsHunt - अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत.
४. Smart App Protector - तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता.
५. Wattpad - Free Books & Stories - भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता.
६. मराठीत टाईप करण्यासाठी -
अ) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन
ब) PaniniKeypad Marathi IME
क) AnySoftKeyBoard - Devanagari
ड) Lipikaar Hindi Keyboard Free
मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले.
७. Hide It Pro - तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो.
८. Truecaller - Global directory - नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता.
९. Scan - आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर.
१०. Justdial - ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता.
११. Instagram - फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त.
१२. Autodesk SketchBook Mobile - ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता.
१३. Misalpav - आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं :)
१४. TED - Ideas worth spreading :) :)
बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप ही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा.
- सुझे !!
वाचने
447897
प्रतिक्रिया
716
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुप्रियाजी,
In reply to एक अज्ञ प्रष्न by सुप्रिया
माहितीबद्द्ल आभार
In reply to सुप्रियाजी, by सुहास झेले
ऑपेरामध्ये मराठी उत्तम दिसतं.
In reply to माहितीबद्द्ल आभार by सुप्रिया
अच्छा....
सर्वांचे आभार !
सेटिंग्जमध्ये जाऊन > कॉल >
In reply to सर्वांचे आभार ! by ईन्टरफेल
१ नं
In reply to सेटिंग्जमध्ये जाऊन > कॉल > by सुहास झेले
धन्यवाद मन ......जमले एकदाचे
In reply to सेटिंग्जमध्ये जाऊन > कॉल > by सुहास झेले
काही नविन अॅप्स :-FREE Hindi
मस्त दुवे
In reply to काही नविन अॅप्स :-FREE Hindi by मदनबाण
मस्त
In reply to काही नविन अॅप्स :-FREE Hindi by मदनबाण
पीसी रेडीओ
In reply to काही नविन अॅप्स :-FREE Hindi by मदनबाण
हिंदी किंवा मराठी भाषा ४ आय
नोकीयाचा सिंबीयन बेले ओ एस
In reply to हिंदी किंवा मराठी भाषा ४ आय by निनाद
मस्त फोन
In reply to हिंदी किंवा मराठी भाषा ४ आय by निनाद
हे अॅप अनेकांना आवडेल आणि
आजोबा,
In reply to हे अॅप अनेकांना आवडेल आणि by मदनबाण
हे सगळ वाचल्यावर आपण या
मदत
प्रा. डॉ.
--------डीफॉल्ट देश - भारत .
In reply to प्रा. डॉ. by तर्री
(१)कार्बन लावा वगैरे फोनवाले
बरोबर.
In reply to (१)कार्बन लावा वगैरे फोनवाले by कंजूस
अॅन्ड्रॉईड ४.० वर मराठी नीट
फोन कोणता आहे?
In reply to अॅन्ड्रॉईड ४.० वर मराठी नीट by आदूबाळ
फोन नाही, शामसुंग ग्यालेक्षी
In reply to फोन कोणता आहे? by आनंदी गोपाळ
मस्त.
प्राडॉ,
In reply to मस्त. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मायक्रोमॅक्स कॅनव्हास २
मराठी टाईप करण्यासाठी तसे
वायबर: स्काईप सारखंच अॅप आहे
viber मस्तच अॅप आहे. २जी
In reply to वायबर: स्काईप सारखंच अॅप आहे by मराठे
वायबर अल्टीमेट आहे.... मी
In reply to वायबर: स्काईप सारखंच अॅप आहे by मराठे
र र रिप्लायचा
Google Currents - एक जबरदस्त
अरे नवं काही आलं का नाही.
We Chat म्हणून एक अॅप आलं
In reply to अरे नवं काही आलं का नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे गुर्जी,
धन्स
In reply to बिरुटे गुर्जी, by आनंदी गोपाळ
सापडलं एकदाचं.
In reply to बिरुटे गुर्जी, by आनंदी गोपाळ
जेलीबीन चे फायदे
अॅन्ड्रॉईडसाठी नवं काही आलं
बॅटरी सेव्ह करण्याचे एक
महासुविधा
आज एक नविन गेम देत आहे, एकदम
नाव वाचून सुरुवातिला वाटलं की
In reply to आज एक नविन गेम देत आहे, एकदम by मदनबाण
नाव वाचून सुरुवातिला वाटलं की
In reply to नाव वाचून सुरुवातिला वाटलं की by डॉ सुहास म्हात्रे
छान आहे. ल्बेंड उर्फ रंगछटा
In reply to नाव वाचून सुरुवातिला वाटलं की by मदनबाण
छान आहे.
व्हॅट्स ऍप प्लस
काढुन टाका ते whatsaap+
In reply to व्हॅट्स ऍप प्लस by दिपक
official whats app
In reply to काढुन टाका ते whatsaap+ by जोशी 'ले'
मी असं वापरलंय ...
In reply to व्हॅट्स ऍप प्लस by दिपक
अहं नाय जमलं. :(
In reply to मी असं वापरलंय ... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धागा उपयोगी पडेल
Check out "Software Data
माहितीबद्दल आभार.
In reply to Check out "Software Data by जोशी 'ले'
मी माझ्या जुन्या गॅलॅक्सी वाय
ओटीजी
डोंबिवलीच्या श्रीपाद भोसले
आजचे अॅप्स
(१)जावा सपॉट आहे/नाही म्हणजे
जावा सपॉट आहे/नाही म्हणजे काय
In reply to (१)जावा सपॉट आहे/नाही म्हणजे by कंजूस
#मदनबाण ,नोकिआ लुमिआ ६२० हा
मदनबाण ,नोकिआ लुमिआ ६२० हा
In reply to #मदनबाण ,नोकिआ लुमिआ ६२० हा by कंजूस
फ़ोन फ़ूल रुट करायचे
सर अहो वरती एका प्रतिसादात
In reply to फ़ोन फ़ूल रुट करायचे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाणा
In reply to सर अहो वरती एका प्रतिसादात by मदनबाण
जमण्यास हरकत नसावी.माझ्या फोन
In reply to बाणा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाही.
In reply to जमण्यास हरकत नसावी.माझ्या फोन by मदनबाण
प्रथम Root Checker वापरुन फोन
In reply to नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमचा बॉ आमच्यावर विश्वासच नै. :(
In reply to प्रथम Root Checker वापरुन फोन by मदनबाण
#मदनबाण .६२०च्या रिव्युची
लिँक http://techradar.com
कंजूस महोदय तुम्ही
In reply to लिँक http://techradar.com by कंजूस
#मदनबाण ,मला यामध्ये HERE
#मदनबाण ,मला यामध्ये HERE
In reply to #मदनबाण ,मला यामध्ये HERE by कंजूस
Ndtv gadets च्या http:/
Framaroot
गुगलची ओएस चांगली असली तरी
आरं कै नवीन आलंय का ?
NewsHunt : India News | eBooks
In reply to आरं कै नवीन आलंय का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
?
सेटींग > मॅनेज अॅप > आॅल >
In reply to ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्स.
In reply to सेटींग > मॅनेज अॅप > आॅल > by जोशी 'ले'
मुळात हा बग नाहिचये हे
In reply to धन्स. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> हे रिस्ट्रिक्शन सर्विस
In reply to मुळात हा बग नाहिचये हे by जोशी 'ले'
अड्राईड वडापाव
मिठाईची नावं असतात.
In reply to अड्राईड वडापाव by सत्याचे प्रयोग
सध्या Sophos Antivirus and
ब्लॅकबेरी मेसेंजर
ब्लॅकबेरी मेसेंजर (BBM for
In reply to ब्लॅकबेरी मेसेंजर by सॅगी
WECHAT & LINE
मी माझ्या काही कोन्टॅक्ट्सना
शेअर बाजार अभ्यासकांसाठी...
इंजिनीयर लोकांसाठी... dwg /
अरे कोणी क्रुड स्केचिंग साठी
हे वापरून बघ...
In reply to अरे कोणी क्रुड स्केचिंग साठी by कैलासवासी सोन्याबापु
यंदा कालनिर्णय ने त्यांचे
धन्यवाद गॉड फिश... डाउनलोडवले
In reply to यंदा कालनिर्णय ने त्यांचे by देव मासा
नवं काही आलंय का ?
ही आधी दिली आहेत की नाही ते
In reply to नवं काही आलंय का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डम्पस्टर
हं
In reply to डम्पस्टर by जोशी 'ले'
मराठयांच्या इतिहासासंबंधी
ह्या दोन्ही कल्पना खूप
In reply to मराठयांच्या इतिहासासंबंधी by सुहास झेले
अँड्रॉईड
अवांतर :-गेम्सच जास्त डाउनलोड
In reply to अँड्रॉईड by राजेंद्र मेहेंदळे
मेसेंजर अॅप्सची महाप्रचंड
मी ऑलरेडी टेलीग्रामवर स्वीच
In reply to मेसेंजर अॅप्सची महाप्रचंड by सुहास झेले
टेलिग्रामवाल्यांना आपल्या
In reply to मी ऑलरेडी टेलीग्रामवर स्वीच by मदनबाण
दुवा देता येइल काय ?$200,000
In reply to टेलिग्रामवाल्यांना आपल्या by आत्मशून्य
अजुन एक हे $200,000 बीटीसी
In reply to दुवा देता येइल काय ?$200,000 by मदनबाण
क्लास....! मस्त लोकं आहेत.
In reply to दुवा देता येइल काय ?$200,000 by मदनबाण
२-४ गोष्टी आम्हाला बी सांगा..
In reply to क्लास....! मस्त लोकं आहेत. by आत्मशून्य
फायदा नं १
In reply to मी ऑलरेडी टेलीग्रामवर स्वीच by मदनबाण
अच्छा हे माहित नव्हते ! सही
In reply to फायदा नं १ by अमोल मेंढे
आजचे अॅप :-NoRoot Firewall :
सहीच अॅप.. आवडले मला. धन्स
In reply to आजचे अॅप :-NoRoot Firewall : by मदनबाण
Prey Anti Theft: Track & find stolen Phones, Tablets and Laptops
@ निलापी
In reply to Prey Anti Theft: Track & find stolen Phones, Tablets and Laptops by रुस्तम
धन्यवाद …
In reply to @ निलापी by मदनबाण
विसराळूंसाठी - find my phone
टेलीग्राम
टेलीग्राम आवडलं मला... बाकी
In reply to टेलीग्राम by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आजच टाकलं.
In reply to टेलीग्राम आवडलं मला... बाकी by सुहास झेले
टेलीग्राम चे सातत्याने अपडेट
आजचे अॅप :-CM Security -
vulnerability बद्दल जरा
In reply to आजचे अॅप :-CM Security - by मदनबाण
यावर CM Security वे उत्तर
In reply to vulnerability बद्दल जरा by जोशी 'ले'
धन्यवाद
बाणा... मस्त आहे CM Security
भाग २ सुरू करावा
+१
In reply to भाग २ सुरू करावा by सुनील
हाच धागा असावा, नवीन
हो... शेवटच्या पानावर जाऊन
In reply to हाच धागा असावा, नवीन by देव मासा
महाग फोन चोरीला वा हरवले कि खूप वाईट वाटते ।
वर कुठे तरी याचं उत्तर आलं आहे असं वाटतं, पण तरीही
In reply to महाग फोन चोरीला वा हरवले कि खूप वाईट वाटते । by nandan
काल XOLO A500S घेतला
राव साहेब News Hunt ,
Take a look at "MoboMarket" -
Google Play Newsstand :-
आय फोन साठी जसे स्केच बाय
Autodesk SketchBook Mobile
In reply to आय फोन साठी जसे स्केच बाय by देव मासा
अॅपअडडा
इंटरेस्टिंग... जितकी जास्त
In reply to अॅपअडडा by भाते
बाकी नवीन काय....!
NewsHunt हे अॅप माहित असेलच,
निव्वळ अप्रतिम
In reply to NewsHunt हे अॅप माहित असेलच, by सुहास झेले
मी आता चेक केले. रु. १५० ला
In reply to निव्वळ अप्रतिम by आत्मशून्य