जि एस पी पी व्ही

कापूसकोन्ड्या's picture
कापूसकोन्ड्या in काथ्याकूट
27 Oct 2013 - 7:53 am
गाभा: 

नामांतर पुणे विद्यापिठाचे.
ही लिन्क here
या बातमीत सुद्धा "ज्ञानज्योती" आणि " 'क्रांतिज्योती " असा घोळ शिर्षक आणि मुख्य बातमी यात आहेच. असो
नांमांतर करताना नवीन झालेले नाव संक्षिप्त केले जाते, आणि त्याचा उद्देश सफल होत नाही. काही उदाहरणे

  • एस बी रोड (सेनापती बापट)
  • एलबिएस (लाल बहादुर शास्त्री) काही लोक अजुन एटी (80) फिट तर काही जण चक्क AT feet असेही म्हणतात
  • मुम्बै चे सिएस्टी
  • COEP चा वाद बराच चालू होताच.
  • न ता वाडी (शिवाजीनगरच्या बाजूची)
  • न ता मा रोड (सिंहगड रोड)
  • एस व्ही रोड (स्वामी विवेकानंद रोड, बिबवेवाडी)
    मोठ्या लोकांचे स्मरण आणि त्यातून स्फुर्ती घेण्यासाठी नामांतर केले जाते, पणं ते रूढ करणे आवश्यक आहे, नाहीतर फक्त काही अल्फाबेट्स चे स्ट्रिंगच राह्ते.
    अर्थात आपण मिपा वापरतोच म्हणा पुन्हा असो.
    काकों (कापुसकोन्ड्या)

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

27 Oct 2013 - 9:25 am | नितिन थत्ते

हे बहुधा व्यक्तीच्या सर्व पदव्या नावात लिहिण्याने होते. शनिवारवाडा ते स्वारगेट दरम्यानचा शिवाजी पथ हा शिवाजीपथ म्हणूनच ओळखला जातो. त्याऐवजी त्याचे नाव गोब्राह्मणप्रतिपालक अत्रियकुलवतंस छत्रपती शिवाजी महाराज पथ असे ठेवले असते तर मग तो शिवाजी पथ म्हणून ओळखला न जाता जीकेसीएसएम रोड म्हणून ओळखला गेला असता.

आता सुद्धा सावित्रीबाई फुले विद्यापीठ एवढेच नाव ठेवले तर जमून जाईल.

कापूसकोन्ड्या's picture

27 Oct 2013 - 9:52 am | कापूसकोन्ड्या

एकदम मान्य!

कंजूस's picture

27 Oct 2013 - 10:01 am | कंजूस

बरोबर .

प्रसाद गोडबोले's picture

27 Oct 2013 - 10:23 am | प्रसाद गोडबोले

पुणे विद्यापीठाला पुवि म्हणल्याचे ऐकीवात नाही .

(ही नांमांतर चळवळ एकुणच झोल आहे. )

ध्यानस्थ बगळा's picture

27 Oct 2013 - 10:29 am | ध्यानस्थ बगळा

यावर एक धागा काढतोय

नितिन थत्ते's picture

27 Oct 2013 - 12:14 pm | नितिन थत्ते

>>एलबिएस (लाल बहादुर शास्त्री) काही लोक अजुन एटी (80) फिट तर काही जण चक्क AT feet असेही म्हणतात

आमच्याकडे जुना आग्रा रोड म्हणतात. ;)