मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भांडणानंतर...

चाणक्य · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
खोटेच आहे रागावणे, तुझेही अन् माझेही तोंड फिरवून झोपणे, तुझेही अन् माझेही अबोला जरी धरून, आसमंत आज सारा अस्वस्थ मनाशी बोलणे, तुझेही अन् माझेही कोण चुकले कोठे, जाणतो मनी दोघेही माघार परी न घेणे, तुझेही अन् माझेही घन बरसत आला होता, त्या कोणी ना पाहीले सांग कसे हे वागणे, तुझेही अन् माझेही अंगार निवता जरा, स्वत:शीच हासून मग ते विषय बोलण्या शोधणे, तुझेही अन् माझेही - चाणक्य २०/१०/२०१३

वाचने 5122 वाचनखूण प्रतिक्रिया 23

प्रभाकर पेठकर Sun, 10/27/2013 - 10:52
नि:शब्द संभाषण. भावनांचा कल्लोळ. मोजकेच शब्द परंतु डोंगराएवढा, वस्तुनिष्ठ, आशय. आवडली कविता. मला तर माझीच भावना कोणीतरी व्यक्त केल्यासारखी वाटली. घरोघर मातीच्या चुली.

In reply to by प्रभाकर पेठकर

पाषाणभेद Sun, 10/27/2013 - 14:45
+१ मोजकेच शब्द परंतु डोंगराएवढा, वस्तुनिष्ठ, आशय. एकदम जबरदस्त काव्य. चाण्यक्या तू जिंकलास!! हा चंद्रगुप्त तुझ्यावर खुष आहे. काय मागायचे ते मागून घे. संकोच नको!