नव्हाळी
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
नव्हाळी
प्रीत ही जुनी जरी, रीत ही नवी नवी
जोड हा जुना जरी, ओढ ही नवी नवी
खेळ हा जुना जरी, डाव हा नवा नवा
वाद हा जुना जरी, संवाद हा नवा नवा
शब्द हे जुने जरी, वेध हे नवे नवे
गूढ हे जुने जरी, उकलणे नवे नवे
गीत हे जुने जरी, संगीत हे नवे नवे
गुंतणे जुने जरी, सावरणे नवे नवे
गोडवा जुना जरी, स्वाद हा नवा नवा
वेग हा जुना जरी, आवेग हा नवा नवा
ताटवा जुना जरी, गंध हा नवा नवा
तोच चांदवा जरी, गारवा नवा नवा
बरसणे जुने जरी, भिजणे नवे नवे
बहर तो जुना जरी, फ़ुलणे नवे नवे
साद ही जुनी जरी, गवसणे नवे नवे
समजणे जुने जरी, उमजणे नवे नवे
जयश्री
वाचने
5979
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
छान कविता
In reply to छान कविता by धोंडोपंत
वृत्त
In reply to वृत्त by जयवी
बदल
In reply to बदल by धोंडोपंत
प्लीज....
In reply to प्लीज.... by जयवी
सुंदर गीत, वृत्तबाबत गडबड ती थोडीशीच
वा धोंड्या,
In reply to वा धोंड्या, by विसोबा खेचर
धन्यवाद !