मित्रांनो!
एक विनंती
आपण अशा कोणत्या संघटने चे सभासद बनला आहात का की जी प्रत्यक्षात एक cult आहे? आपण ज्या ही संघटनेत (धार्मीक वा तत्सम) असाल त्या संघटने च्या कार्यप्रणाली चे संचालकांचे एकदा तरी कठोर परीक्षण करुन बघा जर त्यात खालील प्रकारच्या गोष्टी आढळत असतील तर वेळीच सावध व्हा आणि आपला अमुल्य वेळ,पैसा आणि क्षमता वाया जाण्या पासुन स्वतःला वाचवा ही कळकळीची नम्र विनंती !
CULT म्हणजे नेमके काय ? तिची वैशिष्ट्ये कोणती ?
याची एखादी स्पष्ट व्याख्या करणे तसे फार अवघड आहे पण अशा संघटने त काय चालते काय नाही हीची कार्यप्रणाली कशी आहे यावरुन कुठली संघटना cult आहे व कुठली normal organization आहे हे निश्चितपणे ठरवता येते.या विषयावर भरपुर संशोधन झालेले आहे आणि आंतरजाला वर ही भरपुर माहीती उपलब्ध आहे.या संशोधना च्या आधारे cult ची काही specific features आहेत जी संशोधना अंती निश्चित केली गेली आहेत ती खाली दिलेली आहेत.आपण एकदा प्रामाणिक पणे आपण ज्या संघटनेचे सभासद आहात तीला ही लागु पडतात की नाही हे तपासुन पहावे. नसतील लागु पडत तर आनंद च आहे पंण जर असे काही तुमच्या संघटनेत तुम्हास आढळत असेल तर मात्र वेळीच सावध व्हा ही विनंती!
१-प्रमुख/गुरु सर्वज्ञ सर्वव्यापी सर्वशक्तीमान
cult चा प्रमुख व्यक्ती व त्याच्या निकटचे सभासद यांना जगाचे अंतिम ज्ञान हे पुर्णपणे झालेले आहे,त्यांना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळालेले आहे ते जिवनाचे संपुर्ण रहस्य आणि भुत-भविष्य (शिष्या चे धरुन )जाणता ते big boss knows everything या पध्दतीने वारंवार शिष्यांना सांगितले जाते.ते सर्वव्यापी आहेत कुठे ही काय चालु आहे ते सर्व जाणतात (त्याच्यापासुन तुमची कुठलीही गोष्ट लपुन राहु शकत नाही) आणि ते सर्वशक्तीमान आहेत ते काहीही करु शकतात absolutely anything
२-चिकीत्सेला संपुर्ण विरोध
प्रमुख/गुरु ने केलेल्या कुठल्याही विधानाला किंवा संघटने मांडलेल्या कुठ्ल्याही थेअरी ला किंवा नियम वा तत्वांची चिकीत्सा करायला परवानगी तर नसतेच.पण असे करणे म्हणजे बंडखोरी किंवा वेडेपणा चे/ पतित झाल्याचे लक्षण मानले जाते व त्यावर योग्य असा इलाज शि़क्षा अथवा समज (brainwash) करुन दीला जातो, असे करणार्याला सह्जासहजी सोडले जात नाही ( हा प्रयोग करुन बघा)
३-बिनशर्त संपुर्ण समर्पणाची अपेक्षा
शिष्याने स्वतःची कुठली ही अट न ठेवता स्व्तः चे संपुर्ण शारीरीक-आर्थिक-मानसिक समर्पण गुरु/संघटने प्रती करावे ही मागणी वारंवार वेगवेगळ्या प्रकारे केली जाते.यात संपत्तीचा मोठा वाटा देण्यापासुन ते उत्पन्नातील ठराविक भाग दर महीना देण्यासाठी दबाव आणला जातो अशा दानाचे महत्व सतत बिंबविले जाते. विवीध प्रकारची शारीरीक कामे विनामोबदला सेवेचे मह्त्व पटवुन करवुन घेतली जातात ( चपला सांभाळणे ते पुस्तके विकणे ते प्रत्यक्ष गुरु सेवा करणे इ.) ( नकार देउन बघा )
४-अंतिम,अपरीवर्तनीय अशी एक Typical Exclusive Theory
प्रत्येक cult आपल्या सभासदांना एक असे रेडीमेड गोळीबंद तत्वज्ञान देतात जे की अंतिम सत्य च आहे असे भासविण्यात येते. या Typical Exclusive Theory ला वर म्हटल्या प्रमाणे कधीही चुकुनही challenge करता येत नाही.यात काय वाटेल ते असु शकते जसे आपले गुरु कोणाचा अवतार आहेत पासुन ते एक धुमकेतु अमुक दिवशि येणार त्याला धरुन आपल्याला जायचे आहे म्हणुन आत्मह्त्ये साठी तयारी करा ते अमुक दिवशी जगबुडी होणारच आणि आपण जे सर्व दीक्षीत आहोत तेच जिवंत राहणार किंवा जगातील प्रत्येक स्त्री-पुरुष हे बहीण भाउ च आहेत काय वाटेल ते यात बरेच नियमांची जंत्री असु शकते, बाहेरच्यां विषयी एक मार्गदर्शन केलेले असते काय चांगले काय वाईट याचे वर्गीकरण केलेले असते. याचा इतका पगडा शिष्यांवर टाकण्यात येतो. कि ते पुर्ण जिवनाल याच Typical Theory च्या चश्म्यातुन च बघतात.स्वतः च्या अनुभवाशी व बुध्द्दी शी ही असे शिष्य प्रामाणिक राहु शकत नाही. ही गोष्ट अत्यंत वाईट आहे.ते सभोवताली घडणार्या कुठ्ल्याही घटनेचा अन्वयार्थ निखळ चिकीत्सा करुन लावु शकत नाहीत.आणि ते पराकोटीचे संकुचित आणि संवेदनाशुन्य बनत जातात ( फलाइन वाद्ळ ना बरोबर च आहे आपल्या गुरुजींनी नव्हत का सांगितल की......)
५-आपण "विशेष" आहात म्हणुनच येथे आहात !
हे गाजर प्रत्येकच cult देते. यात शिष्यांना सतत एक गोष्ट सांगितली जाते की ते नक्की काहीतरी वेगळे आहेत सामान्यांपेक्षा विशेष आहे म्हणुन तुम्ही आमच्या संघटनेचे सभासद बनला आहात.तुमचे पुर्वजन्मी चे पुण्य वा संचित आहे ज्यामुळे तुम्ही येथे आहात.यात माणसाचा स्वाभाविक अहंकार भरपुर खतपाणी घालुन फुलविला जातो. यांचा खास शब्द म्हणजे तुम्ही chosen few आहात.आणि म्हणुन मग या शिष्यांचा द्रुष्टीकोण हा इतर लोकांविषयी हे "बाहेर चे" कोणी तरी दुर्दैवी जीव आहेत ( जे आमच्या संघात नाहीत) असा किंवा हे लायक च नाहीत असा बनत जातो.
क्रमशः
वाचने
8597
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच. प्रत्येकाला कुठला ना
प्रकाशजी मला अस वाटतं की
In reply to मस्तच. प्रत्येकाला कुठला ना by प्रकाश घाटपांडे
अरे आम्ही काय कुणाचे खातो रे
ग्रेटथिंकरजी आपल्याला नेमक काय म्हणायच आहे मला कळ्ल नाही हो
निरर्थक
In reply to ग्रेटथिंकरजी आपल्याला नेमक काय म्हणायच आहे मला कळ्ल नाही हो by गुल-फिशानी
आर्ट ऑफ लिव्हिंग हे देखील
विजुभाउ जी अगदी खर आहे पण यावर उघड साधी चर्चा देखील होत नाही
In reply to आर्ट ऑफ लिव्हिंग हे देखील by विजुभाऊ
MLM कंपन्या ह्या सुद्धा
आत्माजी माझा स्वतःचा अनुभव सांगतो
In reply to MLM कंपन्या ह्या सुद्धा by अत्रुप्त आत्मा
सारासार विचारशक्तीला
+ १
In reply to सारासार विचारशक्तीला by चौकटराजा
एकदम चपखल !
In reply to सारासार विचारशक्तीला by चौकटराजा
तेच म्हणतो. अॅम वे हा एक
विजुभाउजी मी आपल्या मताशी पुर्णपणे सहमत आहे
In reply to तेच म्हणतो. अॅम वे हा एक by विजुभाऊ
अॅम वे हा एक मोठा कल्टविजुभाउजी हा ही एक मह्त्वाचा मुद्द्दा आहे की फक्त धर्माशी संबधित किंवा धर्म आधारीत च संघटना कल्ट असतात असे अजिबात नाही. धर्माशी काहीही संबध नसलेली AMWAY ही एक कल्ट च आहे कारण ती अनेक निकषांवर कल्ट प्रमाणे च काम करते. जालावरील खालील दुवे आपण अवश्य अभ्यासा यावर भरपुर खल अगोदर च झालेला आहे. यातील काही भाग तर प्रचंड मनोरंजक आणि धक्कादायक असा आहे. http://marriedtoanambot.blogspot.in http://amwayglobalcultintervention.blogspot.inमाझ्या हाताला एखादाजरी अॅमवे
In reply to विजुभाउजी मी आपल्या मताशी पुर्णपणे सहमत आहे by गुल-फिशानी
जबरी आयडिया दिलीत अपर्णा ताई.
In reply to माझ्या हाताला एखादाजरी अॅमवे by स्पंदना
डावी विचारसरणी हाही एक मोठाच
बॅटमॅन जी धाग्या ला नविन परिमाण दील्याबद्द्ल धन्यवाद
In reply to डावी विचारसरणी हाही एक मोठाच by बॅटमॅन
असे असेल तर मग रा. स्व. सं.
In reply to बॅटमॅन जी धाग्या ला नविन परिमाण दील्याबद्द्ल धन्यवाद by गुल-फिशानी
विज्युईझ्म
In reply to असे असेल तर मग रा. स्व. सं. by विजुभाऊ
या माणसाच्या बोलण्यातून तो
च्यायला !
In reply to या माणसाच्या बोलण्यातून तो by जयंत कुलकर्णी
...
आम्हाला
जय गुरुदेव गुरुबंधु तिमाजी !
In reply to आम्हाला by तिमा
मराठी संकेतस्थळे
भारतातील निधर्मांध मंडळी हा
हारएसएस हा ही एक कल्टच आहे की
In reply to भारतातील निधर्मांध मंडळी हा by श्रीगुरुजी
एका विशिष्ट जातीचे लोक
In reply to हारएसएस हा ही एक कल्टच आहे की by ग्रेटथिन्कर
हे काहीच नाही
In reply to हारएसएस हा ही एक कल्टच आहे की by ग्रेटथिन्कर
निधर्मांध या शब्दावर एकदा
मी स्वतःला शहाणे समजणार्
रॉयल एन्फिल्ड
In reply to मी स्वतःला शहाणे समजणार् by धन्या
रॉयल एन्फील्ड
In reply to रॉयल एन्फिल्ड by llपुण्याचे पेशवेll
तेवढीच आमच्या ज्ञानात भर
In reply to रॉयल एन्फील्ड by मुक्त विहारि
आमचा वैयक्तीक कल्ट आहे.
मिपा कल्ट आहे का नाही यावरही जाणकारांनी उजेड टाकावा
हो आहे.
In reply to मिपा कल्ट आहे का नाही यावरही जाणकारांनी उजेड टाकावा by अग्निकोल्हा
ऐन वेळी कल्टी मारणारे पण कल्ट
सहकार