एप्रील फळ (१०)
लेखनप्रकार
या पूर्वीचे दुवे
http://misalpav.com/node/1398 = एप्रिल फळ ; http://misalpav.com/node/1403 एप्रिल फळ (२) ; http://misalpav.com/node/1416 = एप्रिल फळ (३) ; http://misalpav.com/node/1424 एप्रिल फळ (४) ; http://misalpav.com/node/1466 = एप्रिल फळ (५) ; http://misalpav.com/node/1480 एप्रिल फळ (६)
http://misalpav.com/node/1492 = एप्रिल फळ (७)
http://misalpav.com/node/2482 = एप्रिल फळ(८)
एप्रिल फळ (९) http://misalpav.com/node/2538
फ़णासाचे गरे आयुर्वेदात रुचकर ; पौष्टीक असे काहीसे वर्णीले आहेत. पण खाणारा माणुस फ़णसाचे गरा तोंडात टाकतो तेंव्हा अजानतेपनी डोळे मिटतो. वाईन टेस्टरने वाईन तोंडात घोळवत त्याची लज्जत चाखावी तसे काहिसे गर्याची चव तोंडात घोळवतो दोन क्षण का होईना त्याची अक्षरश: ब्रम्हानन्दी टाळी लागते. अंतरात्मा तृप्त होतो.आणि हतिम बीन ताई च्या गोष्टीत सांगितलेल्या प्रमाणे "एकबार देखा है दूसरी बार देखने की चाहत है" या उक्तीनुसार आणखी एकदा ती तृप्ती अनुभवावी म्हणुन दुसरा गरा उचलण्यासाठी त्याचा हात दुस-या कोणाचे तरी नियंत्रण असावे त्याप्रमाणे हात गरे ठेवलेल्या भांड्याकडे आपोआप वळतो..
रंगपंचमी ला मस्त धुडगूस घालुन झालेला आहे साबणाने चारचारवेळा आंघोळ करुन सुद्धा नव्या नवरीच्या गालावर फुलावी तशी रंगाची गुलाबी लालसर झाक दाढिधारी पुरुषांचा गालावरही पुढचे दोनतीन दिवस दिसत असते. स्वतःला आरशात पाहुन उगाचच आनन्द होत असतो. अशाच वेळी वसन्ताचा आगमनाची वर्दी एखादा कोकीळ मुक्त कन्ठाने देत असतो. आम्ब्याच्या झाडावरच्या मोहोराने आता रूप घेतलेले असते. गुलाबी तपकिरी नारिन्गी रंगाच्या पानाआडून काहितरी डोकावत असते.
कधितरी सन्ध्याकाळी आकाशात रंगांची उधलण केलेली असते.भन हरपून पहात रहावे अशी ती कलाकारी कधी रंग बदलते ते समजत ही नाही.
निळा केसरी जांभळा गुलाबी लाल पारवा रंग एकमेकात कसे घुसळून गेलेले असतत. कोणता रंग कोठे सुरु होतो आणि ती रंगछता सम्पून दुसरी नवी कुठे सुरु होते मध्येच ती गायब होउन नवीच रंग छटा येते. अकाशात यक्षानी नुकतीच रंगपंचमी खेळलेली असावी आणि त्याने उधललेल्या रंगांच्या सड्यानी आकाशाचे अंगण सजलेले आहे असेच मला नेहमी वाटत आले आहे.
त्या रंगापंचमीला दाद म्हणून वसन्त ऋतु स्वतः इथे धरतीवर नव्या पालवीच्या रुपाने रंगपंचमी खेळत असतो हिरवा पोपटी नाजूक तपकिरी केसरी रंगांचे ती कोवळी पाने तान्ह्या वाळाच्या बोटांचा असावा तसा त्यांचा तो बाल स्पर्श अनुभवून लोभावला नाही असा इसम विरळाच.
पाडगावकरांच्या " या जन्मावरी ,या जगण्यावरी शतदा प्रेम करावे " या कवितेचे प्रचिती वसन्त पदोपदी आणुन देत असतो.
वसन्त ऋतुची एक गम्मत असते.
तो स्वतः रंगुन येतो. आसपासच्या सगळ्या आसमन्ताला ही रंगवतो.
वर्षा आणि वसन्त ऋतुं दोघेही वेगळे. वर्षा माणसाला रसीक बनवतो. वसन्त माणसाला श्रीमन्त बनवतो.
कोणितरी पाडगावकराना त्यांच्या साठीला वयाबद्दल काहितरी विचरले...पाडगावकर त्वरीत उद्गारले "मी साठ वसन्त अनुभवले आहेत.
वसन्त ऋतुची ही एक गम्मत असते. तो तुम्हाला कहितरी वेगळाच बनवतो . वर्षा ऋतु तुम्हाला मोहोरवतो वसन्त ऋतु तुम्ही मोहोरुन आला आहात हे सर्वाना दवन्डी पिटत सांगत असतो.
निसर्ग ;पाने फळे फुले आकाश झाडे या सर्वांमधुन रंगांची मुक्त हाताने उधळण करत असतो.
निसर्गाच्या या अदाकारीला सलाम म्हणून की काय गुढीपाडव्याला घराघरातून रंगीबेरंगी गुढ्यांची तोरणे या ऋतुराजाच्या स्वागतासाठी उभी करतात. शूभ्र केसरी शालू त्यावर उन्हात झगमगीत चमकाणारा चांदीचा पेला झाकलेला . त्यातून डोकावणारा हिरवाकच्च कडुलिम्बाचा पाला .सुर्य चन्द्र लटकलेले असावेत तशी ती गाठ्यांची माळ गुढीवर लटकत असते. मागे आकाशाचा निळापांढरा पडदा ही म्हणजे वसन्ताच्या आगमनाची नान्दी असते.
वाचने
19080
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
आहाहा एकदम
In reply to आहाहा एकदम by परिकथेतील राजकुमार
एकदम कडक,
In reply to एकदम कडक, by टारझन
खवाट ....?
एकदम कडक, टण्णक , खवाट ...
खवाट हा शब्द खास माझ्या माहेरचा आहे - निपाणीचा !! हा शब्द तु कुठून काढला, रे भाऊ ?In reply to खवाट ....? by सुधीर मुतालीक
खवाट हा शब्द मी पहिल्यांदाच
In reply to आहाहा एकदम by परिकथेतील राजकुमार
क्रमशः
In reply to आहाहा एकदम by परिकथेतील राजकुमार
क्रमशः
सुंदर.... दणक
In reply to सुंदर.... दणक by आंबोळी
+१
In reply to +१ by दशानन
+२
In reply to +२ by अवलिया
+३
झकास
In reply to झकास by सर्वसाक्षी
+१
वसंत बहार....
In reply to वसंत बहार.... by प्रभाकर पेठकर
सुंदर
In reply to सुंदर by विनायक प्रभू
+१
वा!
मन प्रसन्न
In reply to मन प्रसन्न by विसोबा खेचर
तात्या सध्य इथे जोहान्स्बर्ग
In reply to तात्या सध्य इथे जोहान्स्बर्ग by विजुभाऊ
जुन/जुलै मध्ये कडक हिवाळ तर
प्रसन्न!
छान लेख
दणक्यात पुनरागमन...
हुश्श !!!
विजुभाऊ
प्रसन्न..
In reply to प्रसन्न.. by स्वाती दिनेश
असेच बोल्तो !
In reply to असेच बोल्तो ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण
एप्रिल फळ
वा.. छान
पहील्या
एप्रील फळ +++
खल्लास !!