चल परत नव्याने सुरू करू सारे
लेखनविषय:
चल परत नव्याने सुरू करू सारे
ओळख नव्हती कधीच आपली असे पुन्हा भेटू
डोळ्यात येईलच पाणी माझ्या
त्या अश्रुं समेच आपले अहं पण विरघळून टाकू
खूप पहिले आपण हिशोबचे जगणे
त्या पल्ल्याड जाऊन फक्त आपल्यासाठी जगू
असेल अजूनही अल्लड बालपण आपल्यातही
त्या निरागस पणाची थोडी चव चाखून पाहू
चल बरोबर मिळून चालू जरासे
हृदयातील स्वप्नापर्यंत पर्यन्त असेच आपण पोहोचू
आयुष्यात असणारच वळणे थोडीशी गहिरी
त्यातूनच आपल्या प्रेमाचा अर्थही नव्याने उमजू
वाचने
2986
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
वाह !!! खुपच सुंदर.... माशाअल्लाह !!!!
In reply to वाह !!! खुपच सुंदर.... by नित्य नुतन
प्रतिक्रियेबद्दल आभार
'गोजिरी' कविता :)
चान चान
In reply to 'गोजिरी' कविता चान चान by अभ्या..
प्रतिक्रियेबद्दल आभार
मस्त असेच लिहित रहा.
असेच लिहित रहा.
छान कविता !
१९६३ मध्ये प्रदर्शित झालेल्या गुमराह मधील साहीर लुधियानवी यांच्या
चलो एक बार फिर से, अजनबी बन जाये हम दोनों
ना मैं तुमसे कोई उम्मीद रखूँ दिलनवाज़ी की
ना तुम मेरी तरफ देखो गलत अंदाज़ नज़रों से
ना मेरे दिल की धड़कन लडखडाये मेरी बातों में
ना ज़ाहिर हो तुम्हारी कश्म-कश का राज़ नज़रों से
चलो एक बार फिर से, अजनबी बन जाये हम दोनों
या गीताची आठवण झाली.
In reply to चलो एक बार फिर से, अजनबी बन जाये हम दोनों by psajid
अगदी!
In reply to चलो एक बार फिर से, अजनबी बन जाये हम दोनों by psajid
धन्यवाद.......:)
छान रचना.
लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
In reply to लिहित राहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नक्की.:)
आपल्या प्रोत्साहनामुळे लिहित राहायला जमेल अस वाटतेय.....
खरोखर सगळयांचे आभार.......
वाह !!! खुपच सुंदर....