परदेश प्रवासाकरीता मार्गदर्शन
नमस्कार मंडळी,
मिसळपाव सदस्यांकडून एक मदत हवी आहे.
माझ्या पतिदेवाना एका नवीन नोकरीची संधी चालून आली आहे. जॉब साईट केनिया किंवा ब्राझिल यांपैकी एक असेल. साधारण एक ते दीड वर्षासाठी पाठवणार आहेत. आमच्यापैकी कोणालाही परदेश प्रवासाचा अनुभव नाही. त्यातून एकदम नोकरीसाठी जाणे म्हटल्यावर अनेक प्रश्न मनात आलेत. त्यामुळे मग मिपाची मदत घेण्याचे ठरवले.
पहिला प्रश्न असा की वरील निर्देशित देशांमधे दरमहा साधारण खर्च किती येतो (रुपयांमधे). (पगाराच्या मागणीसाठी जरूरी माहिती).
तसेच प्रवासासाठी आवश्यक पूर्वतयारी काय करायला हवी? (परदेश प्रवासाच्या बाबतीत आम्ही साक्षात "ढ ' असल्यामूळे) अगदी बारीक सारीक माहिती, आवश्यक सूचना, धोके, ई. सर्व बाबतीत येथील जाणकारांनी मदत करावी ही विनंती.
आपल्यापैकी कोणी केनिया किंवा ब्राझिल या देशांमधे वास्तव्याला आहे का?
धन्यवाद
वाचने
3460
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
बिंधास्त जा...
ब्राझिल - विलासरावांची लेखमालिका
सावधगिरी
In reply to सावधगिरी by चित्रगुप्त
अजून काही...
In reply to अजून काही... by डॉ सुहास म्हात्रे
परंतू काही मूलभूत काळजी घेतली
In reply to परंतू काही मूलभूत काळजी घेतली by डॉ सुहास म्हात्रे
उलट खूप मजा येईल. उगाच खूप