साय

लीलाधर जे न देखे रवी...
साय ताजी ताजी हाय दूधावरची साय, ताजी ताजी हाय दूधावरची साय ! दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ? गोर्‍या गोर्‍या वाहिनीची साईसारखी काया, साईसारखी काया तीची वडरुपी छाया, वडरुपी छायेत करील मातृरुपी माया ! सांग कधी आणतोस अशी वहिनी भाऊराया !! गोर्‍या गोर्‍या वहिनीची वाजत गाजत काढेन वरात, कधी घेउन येशील सांग वहिनीला घरात! वहिनी येता घरी मिळेल ताजी ताजी साय, दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ? ताजी ताजी हाय दूधावरची साय, ताजी ताजी हाय दूधावरची साय ! दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ?
वर्गीकरण
लेखनविषय:

151 टिप्पण्या 54,522 दृश्ये

Comments

मोदक नवीन

In reply to by प्रचेतस

पुनर्वाचनाचा आनंद मिळाला - तुम्हाला तर मुखोद्गत आहे हे काव्य! :D असो, आम्हालाही पुनर्वाचनाचा आनंद मिळाला.

कोमल नवीन

आँ?? वल्ली ने काढला होय याला वर... तरीच म्हटलं चचा ला कसा वेळ मिळाला हिकड फिरकायला... ;)

यशोधरा नवीन

कविता आणि प्रतिसाद वाचून हहपुवा!

प्यारे१ नवीन

९७. चचा ला लग्नाचा आहेर करा '१०१' चा. ;)

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by स्पा

किती सहज, सुंदर प्रतिसाद आहे हा... कितीही वेळा वाचला तरी जितका खुला, तितकाच बंद वाटतो!

नूतन सावंत नवीन

कविता आणि त्यावरचे एक्से बढकर एक प्रतिसाद वाचून ह.ह.पु.झा.बाकी वडासारखी छाया हवी आहे म्हणून कदाचित वाहिनीच सगळी साय खाउन टाकेल हा धोका आहेच.

सतिश गावडे नवीन

वाह... साय वर आली. वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. टागोरांची "गितांजली", हरिवंशराय बच्चन यांची "मधूशाला" आणि लिलाधर यांची "साय" कितीही वेळा वाचले तरी प्रत्येक वेळी नविन वाटतात.

बॅटमॅन नवीन

In reply to by सतिश गावडे

मोकलाया दाही दिश्या, कस्सा राव थांबू, भांडे का लपविता, इ.इ. महाकाव्यांना तुम्ही कसे विसरू शकता मालक? :(

नाखु नवीन

In reply to by यसवायजी

पी एस पी ओ नही जानता !!!!!! कस हुणार याचं !! अन्या दातार* बरोबर राहुनही पुरेशी तयारी झाली नाही हे खेदाने सांगावे लागत आहे. अखिल बालक्-पालक्-(चालढकल) शिक्षण सेवा संघातर्फे अ.मि.मां.का.मि.प.तर्फे कोल्हापूर कट्टा हजेरींसाठी प्रकाशीत. *ह्यो कोण याची चवक्शी करू नै.

सूड नवीन

In reply to by तिमा

अर्रर्र!! आता स्मायल्यांचा मारा झेलायला तयार राहा काका!! ;)

तिमा नवीन

,साय, खाये सैंया हमारो !

नाखु नवीन

In reply to by तिमा

लेखकाने साय लिहून अगोदरच हाय खाल्ली आहे !!!! त्यात तुम्ही सैंय्या म्हटल्याने भैय्या रागवणार नाही याची खात्री देता येत नाही.
कोल्हापूर कट्ट्यामध्ये "साय्"वाचन+ सूड निरूपण प्रत्यक्ष पाहिलेला
अनुभवी नाखु

भिंगरी नवीन

बिनधास्त 'साय'लिही गड्या तुला भिती कुणाची 'गणपती'करण्याची रीतच हाय मिपाकरांची स्वतः लिहायला घाबरणारी भिंगरी

पैसा नवीन

सांप्रत कवी आणि त्यांचे दादा दोघेही मिपावरून गायब असतात असे निरीक्षण नोंदवते.

सूड नवीन

सदाहरित काव्य!! मिपाच्या कलोनियन कजिन्सनी पुन्हा एकत्र यावं आणि सायीनंतर पुढे खवा, कुंदा, गुलाबजाम अशी मालिका चालू ठेवावी.

नाखु नवीन

नविन फलक प्रभुकी लीला अपरंपार!! लीला की साय अटकेपार !!! अखिल मिपा निवासी अनिवासी अनवट वाटेवरील वाटेवरील कविता वाचनाचा कार्यक्रम सादर करायला हवा रे संघटना सदस्य लोकांना कवींच्या रचना त्यांच्या आवाजात ऐकायला आवडेल अशी यादी सुचवणी द्यावी ही विनंती

अभ्या.. नवीन

लील्या म्हणजे तोच ना सो साय टी चे संविधान वाटणारा? . . कसं व्हायचं ह्याचं कुणास ठाउक? (च्यायला, मला लै लौकर हा फील यायला सुरुवात झाली ;) )

ज्ञानोबाचे पैजार नवीन

In reply to by प्रचेतस

आणि ऐतिहासिक सुध्दा, पुढे कधी काळी कोणी जर मिपावर पीएचडी वगेरे केली तर ही कविता ऑप्शनला सोडता येणार नाही. पैजारबुवा,