सच्चिदानंद बाबांची गोष्ट
In reply to १६ व्या वर्षी संस्कृत गीतेवर by धन्या
In reply to उगीच्च? by प्यारे१
चमत्कार या शब्दाला अवतरण चिन्ह देण्याचं कारण समजलं नाही का 'रे धन्या' तुला? त्यातला उपहास पोचला असावा असं वाटत होतं. नाही पोचला.शिकेल हळूहळू दुनियादारी. तेव्हढं पारायणाचं घ्या ज्ञानेश्वरी "वाचून काढायची" असेल तर. :)
In reply to गुरुवर्य... by धन्या
तरीही या प्रतिसादाच्या निमित्ताने माझी प्रतिवाद करण्याची हौस भागवून घेतोपहिली गोष्ट, तुमच्याशी वाद घालण्यात मला रस नाही कारण तुमचं स्वतःचंच मत नक्की नाही. त्या प्रतिसादात शेवटी तर तुम्ही स्वतःच्या लेखनाची जवाबदारी नाकरलीये.
ती वाक्ये म्हणजे माझे मत नाही. तसेच सच्चिदानंद बाबांची गोष्ट हा नियर डेथ एक्स्पेरियन्स होता असंही माझं मत नाही. तसं काही असू शकेल असा माझा फक्त अंदाज आहे.थोडक्यात सगळा तुमचा अंदाज आहे. विषय संपला! तिथे तुम्ही म्हटलंय :
माझा चमत्कारांवर विश्वास नाही. त्यामुळे ज्ञानदेवांबद्दल नितांत आदर असूनही मला त्यांच्या नावावर सांगितले जाणारे सारे चमत्कार हे दंतकथा वाटतात.तुम्हालाच `सारे चमत्कार हे दंतकथा वाटतात' तर या लेखाचं प्रयोजन काय? आणि पुढे म्हणतायं :
त्या बालसंन्याशाच्या नावावर खपवल्या जाणार्या इतरही चमत्कार कथा एकतर दंतकथा असाव्यात किंवा त्यात काही तथ्य असले तरी त्यामागे काहीतरी कार्यकारणभाव असावातुम्ही एकदा दंतकथा म्हणतायं आणि त्याच वाक्यात `तथ्य' असल्याची शक्यता व्यक्त करतायं. तुमचंच नक्की ठरत नाहीये, तस्मात या लेखाला अर्थ नाही. असो, माझा हातखंडा असलेला अध्यात्म हा विषय....असं तुम्हाला वाटत असलं तरी तसं काहीही नाही. माझ्या लेखनावर, काहीही अभ्यास नसतांना, इतके दिवस तुम्ही उगीचच तिरकस प्रतिसाद दिलेत इतकंच सांगतो.
In reply to ज्याचं स्वतःचंच नक्की ठरत नाही त्याच्याशी चर्चा निष्फळ आहे! by संजय क्षीरसागर
पहिली गोष्ट, तुमच्याशी वाद घालण्यात मला रस नाही कारण तुमचं स्वतःचंच मत नक्की नाही.तुम्हाला लोकांशी वाद घालण्यात अजिबात रस नसतो हे मला माहिती आहे. पण मलाच तुमच्याशी काही मुद्द्यांवर प्रतिवाद करायचा होता. म्हणून मी तो प्रतिसाद दिला. ज्या गोष्टीचं मला पुर्णतः आकलन झालेलं नाही त्याबाबतीत मी कधीच स्वतःची ठाम मतं बनवत नाही. स्वतःची चूकीची मते रेटण्याईतका कोडगेपणा माझ्यात नाही.
थोडक्यात सगळा तुमचा अंदाज आहे. विषय संपला!ती घटना जवळपास आठशे वर्षांपूर्वी घडलेली आहे. आठशे वर्षांपूर्वी काय घडले असेल याचा आपण फक्त अंदाजच बांधू शकतो. मी म्हणतो तसंच घडलं होतं किंवा तसंच आहे असं रेटून सांगण्यासाठी माणूस कमालीचा दुराग्रही असावा लागतो. मी तसा नाही.
तुम्हालाच `सारे चमत्कार हे दंतकथा वाटतात' तर या लेखाचं प्रयोजन काय?दंतकथेच्या पाठीमागे काही तथ्यांश असू शकतो. त्या तथ्यांशाची चर्चा करणे हे या लेखाचं प्रयोजन.
तुम्ही एकदा दंतकथा म्हणतायं आणि त्याच वाक्यात `तथ्य' असल्याची शक्यता व्यक्त करतायं. तुमचंच नक्की ठरत नाहीये, तस्मात या लेखाला अर्थ नाही.माझं वाक्य असं आहे: त्या बालसंन्याशाच्या नावावर खपवल्या जाणार्या इतरही चमत्कार कथा एकतर दंतकथा असाव्यात किंवा त्यात काही तथ्य असले तरी त्यामागे काहीतरी कार्यकारणभाव असावा मी जर तर अशी वाक्य रचना केली आहे. एकतर दंतकथा असाव्यात किंवा दंतकथा नसतील तर तर त्यात काही तथ्यांश असून त्यामागे कार्यकारणभाव असावा. तुम्ही म्हणताय तसं "तुम्ही एकदा दंतकथा म्हणतायं आणि त्याच वाक्यात `तथ्य' असल्याची शक्यता व्यक्त करतायं" असं नाही.
माझा हातखंडा असलेला अध्यात्म हा विषय....असं तुम्हाला वाटत असलं तरी तसं काहीही नाही.इथे "माझा हातखंडा असलेला अध्यात्म हा विषय...." या शब्दरचनेला तुम्ही माझ्या आयटीवरील लेखाचा दूवा दिला आहे. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आयटी हा माझा हातखंडा असलेला विषय आहे असं मी कधीच दावा केलेला नाही. माहिती तंत्रज्ञान ही ज्ञानशाखा हा महासागर आहे. या महासागरातील फार फार तर ओंजळभर पाणी मी उचललं असेल. त्यामुळे या विषयात माझा हातखंडा आहे असं विधान मी कधीच करु शकणार नाही.
माझ्या लेखनावर, काहीही अभ्यास नसतांना, इतके दिवस तुम्ही उगीचच तिरकस प्रतिसाद दिलेत इतकंच सांगतो.तुम्ही ज्या विषयावर लिहिता त्याचा माझा काहीही अभ्यास नाही असं तुम्ही म्हणताय ते कदाचित तथ्य असेलही. माझे प्रतिसाद तुम्हाला तिरकस वाटले असतील तर मी त्याबद्दल दिलगीर आहे.
ज्याचं स्वतःचंच नक्की ठरत नाही त्याच्याशी चर्चा निष्फळ आहे!आणि तरीही तुम्ही हा प्रतिसाद देऊन तुमचा बहुमोल वेळ वाया घालवलात.
In reply to पहिली गोष्ट, तुमच्याशी वाद by धन्या
त्या तथ्यांशाची चर्चा करणे हे या लेखाचं प्रयोजन.तुम्ही फक्त अंदाज व्यक्त करतायं आणि त्याला तथ्याचा मुलामा देतायं.
त्यामुळे सच्चिदानंद बाबांची गोष्ट आपल्याला त्या बालसंन्याशाच्या योगसामर्थ्याचा चमत्कार वाटत असला तरी त्यामागेही अशीच काहीतरी वैज्ञानिक कारणे असतील.आणि तुम्हाला पुढे जाऊन रेडा आणि भिंतपण कव्हर करायची आहे, म्हणून म्हणतायं :
त्या बालसंन्याशाच्या नावावर खपवल्या जाणार्या इतरही चमत्कार कथा एकतर दंतकथा असाव्यात किंवा त्यात काही तथ्य असले तरी त्यामागे काहीतरी कार्यकारणभाव असावाहे वाक्य पाहा :
ज्यावेळी माणसाची मती कुंठीत होते, समोर घडलेल्या घटनेचं आकलन होत नाही त्यावेळी त्या घटनेला तो चमत्कार म्हणून मोकळा होतो.याचा अर्थ, ते चमत्कार नव्हते तर त्यामागे कार्यकारण असावं हे तुम्हाला सुचित करायचंय. आणि तुमचा मूळ हेतू (दंतकथेच्या पाठीमागे काही तथ्यांश असू शकतो) तुम्ही पुढे दामटतायं. अर्थात, गाडी शेवटी पुन्हा चमत्कारावर आणली आहेच :
मग आपणही शाळेत विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये जडत्व, गती, न्युटनचे गतीविषयक नियम अभ्यासलेले असतानाही आळंदीला गेल्यावर निरागसपणे विचारतो, "ती भींत कुठे आहे हो?"मी खरं तर इतकं लिहीणार नव्हतो पण इतकी प्रगल्भ भारतीय बुद्धीमत्ता तुमच्यासारख्या (तरूणांच्या) भंपक विचारसरणीमुळे संशोधनाभिमुख होऊ शकत नाही ही प्रामाणिक खंत आहे. पाश्चिमात्य विमानाचा शोध लावतात आणि `रामायणात पुष्पक विमानाचा उल्लेख आहे' म्हणजे `ती टेक्नॉलॉजी आमच्याकडे पूर्वीपासनं होतीच' असा मूर्ख स्टँड घेऊन आपण भारतीय स्वतःच हसूं करून घेतो. ते सेल फोनचा शोध लावतात आणि आपण म्हणतो त्यात काय विषेश? कर्णपिशाच्च्य विद्या तर आम्ही पूर्वीपासूनच जाणतो! आता तुम्ही म्हणतायं `वी कॅन रेज अ डेड', आणि मी विचारतोयं `कुठेय तो फॉर्म्युला? फार हास्यास्पद परिस्थिती करून ठेवली आहे देशाची, या तुमच्यासारख्या मानसिकतेनं . धड संशोधन नाही की अध्यात्म नाही. संशोधन नाही कारण आपला विश्वास चमत्कारांवर! आपल्याला सगळं कष्ट न करता फुकट हवंय आणि अध्यात्माची वाट लावलीये कारण उत्तोमोत्तम साहित्याला असले भंपक चमत्कार जोडून ठेवलेत. तुम्हाला मी काय म्हणतोय ते पटत असेल तर पाहा. `गेलेल्या माणसाला जिवंत करून महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून घेतली' असं मूर्ख विधान करून (आणि त्यात पुन्हा तथ्य शोधण्याचा बहाणा केल्यानं) ज्ञानेश्वरीचं अवमूल्यन होतं. कारण किमान बुद्धी असलेला माणूस देखील म्हणेल, ज्ञानेश्वरी नंतर वाचू, कुठेय तो फॉर्म्युला? ____________________________
माझे प्रतिसाद तुम्हाला तिरकस वाटले असतील तर मी त्याबद्दल दिलगीर आहेधनाजीराव, तुम्ही अनेक तिरकस प्रतिसाद दिलेत हे तुम्हाला माहिती आहे. पण का कोण जाणे, तुम्हाला तिथल्यातिथे सुनवावं असा मला कधीही वाटलं नाही. तुमची ही दिलगीरी बहुदा मनापासून असावी. माझ्याबाजूनं, आय ऑलवेज लव्ह टू स्टार्ट ऑन अ क्लिन स्लेट, अँड ऑफकोर्स फॉर यू, दॅट इज माय प्रॉमिस.
In reply to दंतकथेच्या पाठीमागे काही तथ्यांश असू शकतो? by संजय क्षीरसागर
In reply to मूर्ख विधान?? by जे.जे.
धनाजीराव, तुम्ही अनेक तिरकस प्रतिसाद दिलेत हे तुम्हाला माहिती आहे. पण का कोण जाणे, तुम्हाला तिथल्यातिथे सुनवावं असा मला कधीही वाटलं नाही.लेखकाला उद्देशून मला काहीही म्हणायचं नाही. ते विधानाच्या संदर्भात आहे. आणि लेखकाशी मी केव्हाच सेटल केलंय हे तुम्ही विसरतायं :
तुमची ही दिलगीरी बहुदा मनापासून असावी. माझ्याबाजूनं, आय ऑलवेज लव्ह टू स्टार्ट ऑन अ क्लिन स्लेट, अँड ऑफकोर्स फॉर यू, दॅट इज माय प्रॉमिस.आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सोडून देतायं
मी खरं तर इतकं लिहीणार नव्हतो पण इतकी प्रगल्भ भारतीय बुद्धीमत्ता तुमच्यासारख्या (तरूणांच्या) भंपक विचारसरणीमुळे संशोधनाभिमुख होऊ शकत नाही ही प्रामाणिक खंत आहे.
फार हास्यास्पद परिस्थिती करून ठेवली आहे देशाची, या तुमच्यासारख्या मानसिकतेनं . धड संशोधन नाही की अध्यात्म नाही.
संशोधन नाही कारण आपला विश्वास चमत्कारांवर! आपल्याला सगळं कष्ट न करता फुकट हवंय आणि अध्यात्माची वाट लावलीये कारण उत्तोमोत्तम साहित्याला असले भंपक चमत्कार जोडून ठेवलेत.मला वाटतं चर्चा भरकटवण्यापेक्षा, या अँगलनं ती विधायक होईल.
In reply to हम्म by मूकवाचक
In reply to श्रद्धा आणि चिकित्सा या by धन्या
In reply to आम्हाला by तिमा
आम्हाला एक मूलभूत प्रश्न पडला आहे तो कोणीच कसा विचारला नाही ? 'सच्चिदानंद बाबाला जिवंत केल्यावर त्याला आठ मुले झाली का ? की सन्यास स्वीकारल्यामुळे पुन्हा ज्ञानेश्वरांचा आशीर्वाद खोटाच ठरला ?ज्ञानदेवांचे समकालिन संत नामदेव हे ज्ञानदेवांचे आद्य चरित्रकार. ते ज्ञानदेवांना प्रत्यक्ष भेटलेले, त्यांच्यासह प्रवास केलेला. या प्रवासात नामदेव आणि ज्ञानदेव यांना तहान लागल्याची गोष्ट तर खुपच प्रसिद्ध आहे. नामदेवांनी ज्ञानदेवांचे जीवनचरीत्र आपल्या अभंगांतून तीन छोटया संहितांमध्ये लिहिले आहे, आदि, तीर्थावळी आणि समाधि. यातील आदि या नावाने ओळखले जाणारे अभंग मी अजून वाचलेले नाहीत. यामध्ये बहुधा ज्ञानदेवांच्या बालपणाचे वर्णन असावे. तीर्थावळीचे ६२ अभंग आहेत. यामध्ये नामदेव आणि ज्ञानदेव यांनी एकत्र केलेल्या प्रवासाचे वर्णन आहे. तर जवळपास ७० अभंग ज्ञानदेवांच्या समाधी घेण्याच्या प्रसंगावर आहेत. सच्चिदानंद बाबांचे पुढे काय झाले याबद्दल कुठेच काही वाचनात येत नाही. "अष्टपुत्रा सौभाग्यवती भव" असा आशिर्वाद एखाद्या स्त्रीला मिळाल्यानंतर त्या स्त्रीला आठ मुले होतातच असेही कुठे वाचनात नाही. :)
पहिल्या परिच्छेदात 'काळाचा' खूपच गोंधळ घातला आहे असे वाटते.उदाहरणार्थ, मार्गक्रमण करत असतात. चौघांच्याही वयात थोडे थोडे अंतर असल्याचे जाणवत होते.तसं झालंय खरं. परंतू लेख अजिबात न कळण्यापेक्षा थोडाफार का होईना पण कळतोय हे तुम्हा वाचकांचे भाग्य नाही का? ;)
In reply to निअर डेथ एक्सपेरिअयंस by arunjoshi123
In reply to अत्यंत उत्तम प्रतिसाद! by संजय क्षीरसागर
तस्मात, लेखातली घटना, (लेखकाच्या तर्काप्रमाणे) near death experience असेल तर `द डेड वॉज नॉट रेज्ड अॅट ऑल! आणि मग लेखाला अर्थच उरत नाही.धन्यवाद सर. तुमच्यासारख्या स्वतःची लेखनिक कारकिर्द असणार्या ज्ञानी व्यक्तीने ज्याअर्थी हे लिहिलंय तर त्यात नक्की तथ्य असणार. इतरांसारख्या माझ्या लेखावर नुसत्या पिंका न टाकता तुम्ही दुनिया काय म्हणेल, धागाकर्त्याला काय वाटेल याचा विचार न करता तुमचे परखड मत मांडलेत याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. मला माझी चुक कळली आहे. इतकी प्रगल्भ भारतीय बुद्धीमत्ता माझ्यासारख्या (तरूणांच्या) भंपक विचारसरणीमुळे संशोधनाभिमुख होऊ शकत नाही ही प्रामाणिक खंत आहे आपण याच धाग्यावरील प्रतिसादात व्यक्त केली आहे, त्याचा अर्थ आता मला कळतोय. माझ्यासारख्याच्या मानसिकतेनं फार हास्यास्पद परिस्थिती करून ठेवली आहे देशाची. धड संशोधन नाही की अध्यात्म नाही. खरं आहे सर हे तुमचं म्हणणं. पण मला आता बदलायचं आहे. मला त्यासाठी मार्गदर्शन हवं आहे. या जिकडे तिकडे पिंका टाकत फीरणार्यांचा भरणा असणार्या संस्थळावर मला फक्त एक तुम्हीच काय ते सुज्ञ आणि ज्ञानी दिसत आहात. मला तुमचे मौलिक मार्गदर्शन लाभेल का? तसं झालं तर मी कृतकृत्य होईन, शुन्य होईन. मी ही निराकार होईन. सर कराल ना माझ्यासाठी एव्हढं. माझं हे भरकटलेलं तारु किनार्याला आणण्याचं सामर्थ्य फक्त तुमच्यात आहे. फक्त तुम्हीच अवघड ते सोपे करुन सांगू शकता. ज्ञानी पुरुष फक्त चुक दाखवून थांबत नाहीत. तर ते चुक सुधारण्याचा मार्गही दाखवतात असं मी कुठेतरी वाचलं होतं. सर तुम्हीही माझी चुक दाखवून थांबू नका. मला माझी चुक सुधारण्याचा मार्गही दाखवा. कराल ना सर माझ्यासाठी एव्हढं?
In reply to तस्मात, लेखातली घटना, by धन्या
In reply to तस्मात, लेखातली घटना, by धन्या
In reply to वाईट वाटतं. by प्रभाकर पेठकर
In reply to "लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण by धन्या
तुम्ही दुनिया काय म्हणेल, धागाकर्त्याला काय वाटेल याचा विचार न करता तुमचे परखड मत मांडलेत याबद्दल मी तुमचा ऋणी आहे.सारी व्यथा पोहोचली. इंटरनेट या अत्यंत प्रभावी माध्यमाचा केवळ मनोरंजनासाठी उपयोग व्हावा असं मला तरी वाटत नाही. निदान मराठी माणसाचा दृष्टीकोन तरी वस्तुनिष्ठ आणि वैज्ञनिक व्हावा या हेतूनं सगळं लिहीलंय. तुम्ही ते व्यक्तिगत घेणार नाही अशी अपेक्षा होती. अशा वेळी भावनाविवश होण्यात काय पॉइंट ? माझ्या दृष्टीनं विषय संपला होता. तुम्ही तर त्याही पुढे गेलात आणि नवा लेख लिहीलात. (तुमचा तो हेतू नसावा अशी आतापर्यंत आशा होती पण वर तुम्ही स्वतःच म्हणतायं). एकच सांगतो, भावनाविवश होऊन तुम्ही स्वतःची समजूत काढतायं, वास्तविकात तसं काही नाही. टू बी वेरी स्ट्रेट, तुमच्या जागी जर मी असतो, आणि इतक्या घाऊक स्वरूपातल्या माझ्या भावनिक धारणा कुणी व्यर्थ ठरवल्या असत्या, तर मला आनंद झाला असता. कारण धारणा मुक्ती हीच तर खरी अध्यात्मिक प्रक्रिया आहे, ती तुम्हाला धारणारहित चित्तदशेप्रत नेते. तुम्हाला निर्भार करते.
In reply to श्रीयुत धनेश्वरजी, by संजय क्षीरसागर
टू बी वेरी स्ट्रेट, तुमच्या जागी जर मी असतो, आणि इतक्या घाऊक स्वरूपातल्या माझ्या भावनिक धारणा कुणी व्यर्थ ठरवल्या असत्या, तर मला आनंद झाला असता. कारण धारणा मुक्ती हीच तर खरी अध्यात्मिक प्रक्रिया आहे, ती तुम्हाला धारणारहित चित्तदशेप्रत नेते. तुम्हाला निर्भार करते.अरेरे… म्हणजे तुम्हाला आनंद मिळण्याचा एक मार्क बंद झाला. शिवाय ती "खरी अध्यात्मिक प्रक्रिया" तुम्हाला यापुढे कधीही अनुभवता येणार नाही. काय हा दैवदुर्विलास !!!
In reply to टू बी वेरी स्ट्रेट, तुमच्या by विश्वनाथ मेहेंदळे
शिवाय ती "खरी अध्यात्मिक प्रक्रिया" तुम्हाला यापुढे कधीही अनुभवता येणार नाही?इथे लेखक निरूत्तर झाल्यानं भावनाविवश झाला आहे. इतक्या उघड गोष्टीवर पुन्हा सारवासारव करून काय उपयोग? असो, या निमित्तानं एक सांगावसं वाटतं, कंपूबाजी करून चुकीच्या गोष्टी बरोबर ठरत नाहीत. उलट तुम्ही जास्त उघडे पडता. माझ्या लेखनावर सारखा गोंधळ का होतो याचं उत्तर देखिल तुमच्या(सारख्यांच्या) प्रतिसादातून आणि लेखनातून स्पष्ट होतं. वास्तविकात, या लेखातले निष्कर्श संपूर्ण चुकीचे आहेत तरीही, पदार्थवाचक नांव असणार्या एका सदस्यानं माझ्या लेखावर, `तुम्हाला काँप्लेक्स आला असावा' असा दिव्य अंदाज काढला. या लेखाची सद्य परिस्थिती बघून तो किती बाळबोध होता हे लक्षात येईल. दरम्यान मला एका वेगळ्या कारणासाठी व्य. नि. आला आणि त्यात, माझ्याविषयी इथे कायकाय गैरसमज पसरले आहेत (का पसरवले गेले आहेत?), ते सांगितलं. त्याला उत्तर देतांना, त्या गैरसमजात काहीही तथ्य नाही, तशी शक्यता या जन्मी तरी नाही. आय लीव इन टोटल सेलिब्रेशन असं सांगून, माझा दिनक्रम आणि इतर व्यक्तिगत माहिती मी दिली आणि तो व्य.नि. `कंपूलाही पाठवा' (म्हणजे त्यांना प्रकाश पडेल) असं सांगितलं. आणि नंतर दोन दिवस ट्रीपला गेलो. इथे येऊन पाहतो तर काय आश्चर्य? नार्सिसिझमवरच्या लेखाचा रोख `नक्की कुणाकडे आहे' ते खुद्द लेखकानंच कबूल केलं (लोकासांगे ब्रह्मज्ञान)! अशाप्रकारे तुम्ही जास्तजास्त उघडे पडत जाता. थोडक्यात काय तर `मेजर डिस-कनेक्ट, तज्ञांची मदत' ... ते पार पीडा, वगैरे फालतू जादूचे प्रयोग माझ्यावर करणं मूर्खपणा आहे. यापूर्वी इथे एका सदस्येनं (अर्थात, `सो कॉल्ड अध्यात्मिक' सदस्यासाठी) माझ्यावर `दुफळी' वगैरे शब्दप्रयोग करून, माझं इथलं लेखन बंद पाडण्याचे निकराचे प्रयत्न केले आहेत (ते प्रतिसाद नंतर आश्चर्यकारकपणे गायब झाले). पण या प्रकारात तुम्ही, तुमची मानसिकता माझ्यावर लादतायं किंवा स्वतःचं सांत्वन करतायं (नार्सिसिझम) इतकंच. जो मनासारख्या विषयावर स्वतःची लेखमाला सुरू करू शकतो त्याला तुम्ही स्वतःच्या फ्रस्ट्रेशनमधे अडकवणं अशक्य आहे. पण त्याही पुढे जाऊन, माझ्या लेखावर गोंधळ घालून इतरांची दिशाभूल करणं, तुमचं अस्वास्थ्य कमी करेल हा भ्रम सोडून द्या. त्यापेक्षा शांतपणे ते लेख वाचून त्यावर विधायक चर्चा घडू दिली तर ती संकेतस्थळाला उपयोगी ठरेल (आणि कदाचित तुम्हालाही उपयोग होईल). उदाहरणार्थ `नार्सिसिझम' हा लेख प्रकाशित करून लेखकानं, व्यक्तिगत निराशेपायी इतरांचा वेळ घेतला आणि (माझ्याविषयी) दिशाभूलही करण्याचा प्रयत्न केला, हे अयोग्य आहे.
In reply to प्रतिसादकाला काय म्हणायचंय, ते त्याचं त्यालाच कळत नाहीये by संजय क्षीरसागर
In reply to जो मनासारख्या विषयावर स्वतःची लेखमाला सुरू करू शकतो त्याला by अनिरुद्ध प
In reply to शक्तीपात हा फिजिकल प्रकार आहे याची तुम्हाला कल्पना असेलच by संजय क्षीरसागर
In reply to साहेब by अनिरुद्ध प
In reply to तस्मात, लेखातली घटना, by धन्या
In reply to निअर डेथ एक्सपेरिअयंस by arunjoshi123
In reply to Near death experience आणि by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to बाबांची गोष्ट फारच लांबली by स्पा
In reply to काही मुद्दे by म्हैस
In reply to काही मुद्दे by म्हैस
१. अध्यात्माचे नियम विज्ञानाला लागू होत नाहीत तसेच विज्ञानाचे नियम अध्यात्माला लागू होत नाहीततुमचा काहीतरी गैरसमज होतोय. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. निसर्गाचे नियम सांगणारे शास्त्र. त्यामुळे जे जे विज्ञान मांडतं ते ते पूर्व अटींची पुर्तता झाली या विश्वातील प्रत्येक गोष्टीला लागू होतं. तुमची अध्यात्माची व्याख्या सांगितलीत तर यावर सखोल चर्चा करता येईल. मुद्दा २ आणि ३ बरोबर आहेत.
४.ज्ञानेश्वर महाराज अत्यंत आत्मविश्वासाने त्या माणसाला फक्त डोक्यावर हाथ ठेवून अत्यंत आत्मविश्वासाने उठ म्हन्तायेत. ५. ... त्या माणसाची प्रेतयात्रा चालली होती त्या अर्थी त्याला मारून किमान ५-६ तास तरी झाले असणार. सगळे नातेवाईक जमले असतील. रडून गागून झाला असेल. त्यात किती वेळ गेला असेल.ही जवळपास आठशे वर्षांपुर्वी घडलेली घटना आहे. त्यावेळी अगदी असंच घडलं असेल हे तुम्ही कशावरुन म्हणता?
६. मी इथे अंध श्रद्धेला पाठींबा देत नाहीये. खऱ्या योग्सामार्थ्याच्या बाजूने बोलतेय."खऱ्या योग्सामार्थ्याचा" तुम्ही स्वतः अनुभव घेतला आहे का? असे योग सामर्थ्य असणारी व्यक्ती तुमच्या पाहण्यात आहे का? की ही तुमची ऐकीव्/वाचलेली माहिती आहे?
In reply to @धन्या by म्हैस
अरे देवा. ह्या माणसाला ज्ञानेश्वराचा बालपण माहित नाही ??????????? ह्या माणसाला खरच काहीच माहित नाहीये.. कशाला उगीच प्रतिक्रिया देतो हा.तुम्हाला ज्ञानदेवांच्या बालपणाबद्दल काय माहिती आहे? तुम्हाला जी काही माहिती आहे ती तुम्हाला कुठे मिळाली? राहिली गोष्ट मी प्रतिसाद देण्याची. माझी माहिती, माझी मते चुकीची असू शकतात. पण ती चुकीची असतील तर तुम्ही तसे दाखवून दया.
ह्यांनी म्हणे भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी दोन्हीही दोन्हीही वाचलंय पण त्यांना काहीच कळलं नाही.......... हा हा हा ह्यांना एवढा सोप्या भाषेत, संदर्भासहित स्पष्टीकरण देवून लिहिलेली ज्ञानेश्वरी समजत नाही.असं मी कुठेही म्हटलेलं नाही. मी फक्त एव्हढंच म्हटलंय की "माझ्या प्रश्नांची उत्तरे मला मिळाली नाहीत."
आणि हे म्हन्तायेत संस्कृत गीतेचा निरुपण हा चमत्कार नाही.ज्ञानेश्वरीचे साहित्यमुल्य अनमोल आहे यात शंका नसली तरी ज्ञानेश्वरी ही भगवदगीतेवरील एकमेव टीका नाही. अगदी ज्ञानदेवांचे लहान भाऊ सोपान यांनीही "सोपानदेवी" नावाने भगवदगीतेवर टीका लिहिली आहे. यात चमत्कार कसला?
तुम्ही खरच आधी अभ्यास करा हो आणि मग प्रतिक्रिया देत जामी अभ्यास करुनच लिहितोय. उचल बोट आपट कीबोर्डवर असं करत नाही.
please विनंती आहे.अशी विनंती करण्यापेक्षा माझे म्हणणे तुमच्या मुददयांनी खोडून काढा.
In reply to @धन्या by म्हैस
In reply to धन्या साहेब by म्हैस
ही जवळपास आठशे वर्षांपुर्वी घडलेली घटना आहे. त्यावेळी अगदी असंच घडलं असेल हे तुम्ही कशावरुन म्हणता?मग ज्ञानेश्वरांकडे योगसामर्थ्य नवतं हे तुम्ही कशावरुन म्हणता?
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. निसर्गाचे नियम सांगणारे शास्त्र. त्यामुळे जे जे विज्ञान मांडतं ते ते पूर्व अटींची पुर्तता झाली या विश्वातील प्रत्येक गोष्टीला लागू होतंआपण आधी स्वताचा गैरसमज दूर करा. विज्ञानाला अति असतात. परा विज्ञान ( अध्यात्मिक ज्ञान ) अटींमध्ये बांधलेलं नाहीये. ते मुक्त आहे. विज्ञान जिथे संपतं, ईश्वरी सत्ता तिथून चालू होते. हे अगदी खरं आहे. पुस्तकांची नावं, लिंका ह्या फक्त तुम्च्या माहितीसाठी आहेत. तुम्हाला योग्य तो मार्ग सुचवण्यासाठी. मी ह्या आधीही सांगितलंय दुसरा कोणीही तुम्हाला अनुभव देवू शकत नाही. तो आपला आपणच मिळवायचा असतो. मला जे समजायचं होतं ते मला समजलंय. तुम्हाला स्वताला काय समजतंय ते महत्वाचा आहे न. खरं योगसामर्थ्य असलेल्या अनेक व्यक्तींच्या मी संपर्कात आली आहे. मी स्वतः भगवद्गीतेत सांगितलेल्या योगमार्गाची साधक आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा. माझ्या द्रीष्टीने अध्यात्म म्हणजे ईश्वराला जाणणे. स्वताला जाणणे. आत्मसाक्षात्कार, आत्मज्ञान , योगसामर्थ्य काय आहे ह्याचा स्वतः अनुभव घेणे.
In reply to माझे मत by म्हैस
In reply to माझे मत by म्हैस
मी स्वतः भगवद्गीतेत सांगितलेल्या योगमार्गाची साधक आहे.ओसम! काय आहे हा ? जाणुन घ्यायला (निसत वाचायला न्हवे तर आपल्या जाणिवांच्या पातळिवरुन उमजायला) नक्कि आवडेल.
In reply to माझे मत by म्हैस
In reply to नुकताच लोहगडाच्या विंचूकाटा by धन्या
In reply to सहमत by बॅटमॅन
In reply to हे by अनिरुद्ध प
In reply to ही लिंक बघावी. by बॅटमॅन
In reply to नुकताच लोहगडाच्या विंचूकाटा by धन्या
तस्मात मी इथेच थांबतो. "अवतारी" पुरुष/स्त्री बरोबर अध्यात्म किंवा विज्ञान या विषयांवर चर्चा करण्याची कुवत माझ्यात नाही.धन्या पहिले वाक्य एकदम झकास. दुसरे वाक्य जर्रा बदलून लिही
"अवतारी" पुरुष/स्त्री बरोबर अध्यात्म किंवा विज्ञान या विषयांवर चर्चा करण्याची कुवत माझ्यात नाही.या ऐवजी "अवतारी" पुरुष/स्त्री बरोबर अध्यात्म किंवा विज्ञान या विषयांवर इंटेलेक्च्युअल मास्टर्बे** करण्याची इच्छा माझ्यात नाही> असे लिही. एखाद्याशी चर्चा करण्याअगोदर त्याचा अधिकार काय आहे ( म्हणजे नक्की काय ते मात्र सांगायचे नाही ) बाकी आम्ही अध्यात्म वाले म्हणजे एकदम बेष्ट असे म्हणायचे. त्याबद्दल शंका घेणारे मात्र तथाकथीत इंटेलेक्च्युअल मास्टर्बे** करतात असे म्हणून चर्चा टाळायची. मुद्द्यावर कोणी आले की आपण बरेच फाटे फोडायचे. मुद्दा खोडता आला नाही की समोरच्याचा अधिकार काढायचा. Do While अधिकार= 0>
In reply to तस्मात मी इथेच थांबतो. by विजुभाऊ
In reply to ती स्वाक्षरी आहे by म्हैस
In reply to कोणीतरी म्हणाला होतं वाचायला by म्हैस
In reply to क्रियायोग ? by अग्निकोल्हा
In reply to व्यनि म्हणजे? चित्रपटात काय by म्हैस
In reply to व्यनि म्हणजे? चित्रपटात काय by म्हैस
कलीयुगामध्ये गेली २००० वर्षे महावतार बाबाजी मोठे जाणकार सिद्ध गुरु आहेत.आहेत म्हणजे ते अजूनही हयात आहेत असं म्हणायचे आहे का तुम्हाला?
तसे गुरु अजूनही आहेत परंतु ते ढोंगी बाबांसारखे स्वताला लोकांसमोर आणत नाही म्हणून त्यांची माहिती फारच कमी लोकांना असते.त्यांनी स्वतःला लोकांसमोर आणले नसेलही परंतू परमहंस योगानंद यांनी आपल्या "ऑटोबायोग्राफी ऑफ योगी" या पुस्तकात खुप वेळा उल्लेख केला आहे. क्रिया योगाचे उद्गाते म्हणून ते जगाला ज्ञात आहेत.
आज esakal मध्ये बातमी आली आहे. "योगविद्येवर अमेरिकी मोहोर ". किती दुर्दैव आहे .इतर देशातल्या लोकांना ह्याचं महत्व कळतंय आणि आपल्या देशातले लोक मात्र योग, देव, धर्म ह्याची टिंगल करण्यातच धन्यता मानतात आणि मनुष्य जन्म वाया घालवतात.भारतीयांना जसे पाश्चिमात्य जीवनशैलीचे अप्रुप तसेच पाश्चिमात्यांना भारतीयांच्या अध्यात्म, योगा, ज्योतिष वगैरे गोष्टींचे अप्रुप असते हे स्वानुभवाने माहिती आहे. ईट इज जस्ट अनदर फॅन्सी थिंग फॉर देम. त्यात विशेष काही नाही.
In reply to कलीयुगामध्ये गेली २००० वर्षे by धन्या
आहेत म्हणजे ते अजूनही हयात आहेत असं म्हणायचे आहे का तुम्हाला?निसर्गसुलभ प्रश्न वाटतो.
त्यांनी स्वतःला लोकांसमोर आणले नसेलही परंतू परमहंस योगानंद यांनी आपल्या "ऑटोबायोग्राफी ऑफ योगी" या पुस्तकात खुप वेळा उल्लेख केला आहे.खात्रि आहे हे पुस्तक आपण वाचुन काढलेले नाहि याचि. ("बाबा" मि बघितलाय त्यातलं "बाबा सिल्वर सिल्वर बाबा" गाण मला फार आवडते)
क्रिया योगाचे उद्गाते म्हणून ते जगाला ज्ञात आहेत.जगाला म्हणजे कोणाला ?
भारतीयांना जसे पाश्चिमात्य जीवनशैलीचे अप्रुप तसेच पाश्चिमात्यांना भारतीयांच्या अध्यात्म, योगा, ज्योतिष वगैरे गोष्टींचे अप्रुप असते हे स्वानुभवाने माहिती आहे. ईट इज जस्ट अनदर फॅन्सी थिंग फॉर देम. त्यात विशेष काही नाही.:) फॅन्सी थिंग व महत्व कळणे यात फरक आहे. उदा. इबुक रिडर माझ्यासाठि फँन्सि थिंग आहे पण यातुन कागदाचा व परिणामी मानवाचा वेळ्,कश्ट्,पैसा,जागा याचा अपव्यय टळतो हे याचे (विषेशतः पर्यांवरणाच्या द्रूश्टिने) महत्व कळणे आहे.
In reply to कलीयुगामध्ये गेली २००० वर्षे by धन्या
In reply to ईट इज जस्ट अनदर फॅन्सी थिंग फॉर देम. by अनिरुद्ध प
आहेत म्हणजे ते अजूनही हयात आहेत असं म्हणायचे आहे का तुम्हाला?होय. ते अजूनही आहेत.ते अजूनही २४ वर्षांच्या तरुणासार्खेच दिसतात. चांगदेव नाही का १४०० वर्षे ह्या मृत्यूलोकात होते. सामान्य माणसे ७०-८० वर्षे जगात असताना योग्यांना इतकं दीर्घायुष्य कसा लाभतं ह्याचा उत्तर 'योगी कथामृत' (Autobiography of a yogi ) ह्या पुस्तकात दिलं आहे.
त्यांनी स्वतःला लोकांसमोर आणले नसेलही परंतू परमहंस योगानंद यांनी आपल्या "ऑटोबायोग्राफी ऑफ योगी" या पुस्तकात खुप वेळा उल्लेख केला आहे. क्रिया योगाचे उद्गाते म्हणून ते जगाला ज्ञात आहेत.होय. जगाच्या कल्याणासाठी त्यांना प्रकाशात आणणा गरजेचं असतं. परमहंस योगानंदांनी ते कार्य केला आहे. महावतार बाबाजींनी स्वताचा उल्लेख कुठेही केलेला नाहीये. एकदा एका अश्रद्ध माणसाला त्यांची महती पटवून देण्यासाठी त्यांच्याच एका शिष्याने एका बंद खोलीत त्यांचं आवाहन केलं. बाबाजी तिथे प्रगट झाले पण शिष्याला रागावले. पुन्हा मला असल्या गोष्टींसाठी बोलावत जावू नको म्हणून. हा किस्सा पुस्तकात आहे.
भारतीयांना जसे पाश्चिमात्य जीवनशैलीचे अप्रुप तसेच पाश्चिमात्यांना भारतीयांच्या अध्यात्म, योगा, ज्योतिष वगैरे गोष्टींचे अप्रुप असते हे स्वानुभवाने माहिती आहे. ईट इज जस्ट अनदर फॅन्सी थिंग फॉर देम. त्यात विशेष काही नाही.नुसतं अप्रूप वाटणं आणि महत्व पटण ह्यात फरक आहे. त्यांना ते पटलय म्हणून शाळेपासून योग हा विषय त्यांनी अभ्यासाला ठेवलाय.
महावतार बाबाजींच्या शिष्याचे शिष्य परमहंस योगानंद यांनी खुप लेखन केलय क्रिया योगावर.महावतार बाबाजींचे शिष्य शामाचरण लाहिरी. त्यांचे शिष्य युक्तेश्वर मुखी. त्यांचे शिष्य परमहंस योगानंद
उगीच्च?