********************
*
जाम कोणी देइ अव्हेरू नये
चुंबनाला "ना" कधी सांगू नये
*
खाक जाळे दु:ख मोठे थेंबही
एकही थेंबा कधी सांडू नये
*
भेटता तू स्वर्ग भेटे या इथे
या क्षणाला दृष्ट मी लावू नये
*
काल 'हो' अन् आज 'नाही' सांगणे
काळजाशी खेळ हे खेळू नये
*
घोट घेता घात करिते वारुणी
तीत मेलेल्या पुन्हा मारू नये
*
वेगळी काही नशा होते जया
जाहिदाचे नाव त्या देऊ नये
*
********************
Taxonomy upgrade extras
वाचने
6614
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
गझल चांगली
जाहिद
विरक्त
In reply to जाहिद by धनंजय
वैच केहता ना मैं
In reply to विरक्त by विसोबा खेचर
धनंजय, "हत् करंट्या" अगदी दाद देण्यासारखेच आहे!
In reply to वैच केहता ना मैं by धनंजय
तात्या, असल्या सुखद स्मृतीत मला जमा केलेत म्हणून बरे.
In reply to विरक्त by विसोबा खेचर
अप्रतिम
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अवांतर -
In reply to सुरेख by नंदन
"अव्हेरू"च ठीक
In reply to सुरेख by नंदन
वा!
घोट घेता घात करिते वारुणी
प्रयत्न फार आवडला
जाम कोणी
मस्त!
छान..
एक जमले(से वाटते)!
:-)
In reply to एक जमले(से वाटते)! by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
धनंजय,