वाक्प्रचार, म्हणी,रूपकातील प्राणीवाचक उल्लेखांची अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि असांसदीयतेच्या नेमक्या सीमारेखा
उपरोक्त वाक्प्रचारातील प्राणी वाचक उल्लेख असांसदीय समजावा का ?नाही. कारण इथे थेट "तू गाढव आहेस्/तू रेडा आहेस" असे काही म्हटलेले नाही. कोणाचे खाते बॅन केले नाहीत त्याबद्दल अभिनंदन. पण त्याचवेळी अशा म्हणी वापरण्यावर बंदी घातली असेल तर ते मला बरोबर वाटत नाही. अशा म्हणींच्या पाठी काही कथा असतात आणि त्यातले तात्पर्य एवढ्याच स्वरूपात त्या घ्यायच्या असतात. इथे लाक्षणिक अर्थ महत्त्वाचा, वाच्यार्थ लागू होत नाही, जर दुसर्या सदस्यावर थेट शाब्दिक हल्ले केले नसतील तर. समजा मला एखाद्याने असे म्हटले की, "तुला काही सांगून फायदा नाही, गाढवापुढे वाचली गीता इ. इ." तर त्याचा अर्थ "मला गाढव म्हटले आहे" असा मी तरी घेणार नाही. अर्थात हा प्रत्येकाच्या संवेदनाशीलतेचा प्रश्न आहे. इतर कोणाला ते खूप जास्त लागू शकेल. पण जर तिसर्या कोणाबद्दल चौथ्या सदस्याने अशी तक्रार केली तर वेळ काळ परिस्थिती पाहून इतर संपादक सल्लागारांबरोबर चर्चा करून मिपावर काय तो निर्णय घेतला जातो. तुम्ही दिलेल्या यादीतील बहुसंख्य म्हणी अगदी खमंग असल्या तरी असांसदीय नाहीत. अशा म्हणी आपली भाषा समृद्ध करतात. मिपावर काही दिवसांपूर्वी असांसदीय भाषा/शिव्या याबद्दल एक जोरदार चर्चा झाली होती, http://www.misalpav.com/node/24569 आणि त्यात माझे जे मत होते तेच इथेही कायम आहे. की जी भाषा आपण घरात बोलू शकणार नाही ती एखाद्या संस्थळावर वापरू नये. कोणी असेही म्हणतील की सगळ्याच गोष्टी आपण आईबापांसमोर करत नाही, मग घरी सभ्य राहून इथे शिव्या दिल्या तर काय बिघडलं? बिघडत काहीच नाही. पण त्या सगळ्या गोष्टी आपण चव्हाट्यावरही करत नाही. स्त्रिया आणि पुरुष अशी मिश्र उपस्थिती असलेलया सार्वजनिक ठिकाणी सभ्यतेचे जे संकेत आहेत ते किमान पाळावेत अशी अपेक्षा आहे. http://www.misalpav.com/node/298 http://www.misalpav.com/node/11148 http://www.misalpav.in/node/15135 इथेही वेळोवेळी असभ्य असांसदीय भाषा याबद्दल चर्चा झाल्या आहेत. केवळ प्राण्यांचा उल्लेख असलेल्या म्हणी आहेत म्हणून त्यावर बंदी घालणे योग्य नाही, पण कोणालाही थेट शिव्या देणे, अश्लील शेरे मारणे हे मात्र नक्कीच असांसदीय आहे. तुम्ही व्यवस्थापक असाल तर प्रत्येक वेळी प्रसंग आणि त्यात भाग घेणार्या व्यक्ती या दोन गोष्टींचा विचार करूनच तारतम्याने काय तो निर्णय घ्यावा.
In reply to माझी काही उत्तरे by पैसा
In reply to संवेदनशीलता by अरुण मनोहर
In reply to तोलून मापून शब्दप्रयोग. by प्रभाकर पेठकर
In reply to स्वतःची योग्य बाजू मांडताना by स्पंदना
In reply to हा लेख गम्मत म्हणून आहे कि by बोलघेवडा
In reply to नियम बनवणे नव्हे,नियमा बनवण्याकरता लागणार्या सामुग्रीचा अभ्यास by माहितगार
In reply to हा लेख गम्मत म्हणून आहे कि by बोलघेवडा
In reply to काही म्हणी by राही
In reply to म्हणी आणि वाक्प्रचार हे by दत्ता काळे
In reply to सहमत by बॅटमॅन
आचार ओवळा झाला की विचार अधिक सोवळे होतात
छातीत ठोका चुकला बरं का एकदा ! " सत्य" असे भिडते की..........In reply to सहमत by बॅटमॅन
In reply to सहमत by बॅटमॅन
...आचार ओवळा झाला की विचार अधिक सोवळे होतात हा अनुभव तर नेहमीचाच आहे...In reply to सहमत by बॅटमॅन
In reply to म्हणी आणि वाक्प्रचार हे by दत्ता काळे
In reply to हो.. एक सांगायचं राहिलं. ह्या by दत्ता काळे
In reply to मला वाटते... by राही
In reply to अर्थातच, अट्टाहास ठीक नव्हेच. by बॅटमॅन
In reply to अन्नेसेसरिली by राही
In reply to मला वाटते... by राही
In reply to मनमोकळ्या प्रतिसादाकरीता धन्यवाद by माहितगार
मला वाटते आपल्या भाषेत शीष्ट न समजले जाणारे वैचारीक स्वातंत्र्य परभाषेत उपभोगावयाचे आणि आपल्या स्वतःच्या भाषेत नको हि कदाचीत मानवी प्रवृत्ती असावीम्हणूनच मराठी माणसे पॅथोलॉजी लॅबमध्ये "युरीन" आणि "स्टूल" यांची सँपल्स देतात! ;)
In reply to माझ्या मते प्रश्न म्हणी आणि by आतिवास
काही वेळा अगदी 'सांसदीय' (हल्ली संसदेत जी भाषा वापरतात ती आपण वापरायची म्हटलं तर कठीण आहे!!)भाषा वापरुनही समोरच्याचा जबरदस्त पाणउतारा करता येतो.एक सिंपल उदा. "%^&*च्या" प्रत्ययान्त असलेल्या शिव्या तादृश लागत नाहीत. पण एका विशिष्ट अॅक्सेंटमध्ये "बाऽव्ळट" म्हटल्यास ते बेक्कार लागते =))
In reply to माझ्या मते प्रश्न म्हणी आणि by आतिवास
सार्वजनिक ठिकाणी सभ्यतेचे जे संकेत आहेत ते किमान पाळावेत
हे आणि एव्ढेच खरे , बाकी फार विचार करु नये नाहीतर ".... खतरें में है " म्हणून आपल्या देशात फाजील लाड आणि लांगूलचालन चालू आहे तेच होईल . मूठ्भर लोकांसाठी सारे जण वेठीस धरण्यात काय हशील ?
कोणालाही दिवाणखान्यात मोठ्ठ्यांदा वाचताना संकोच होऊ नये इतपत तत्व प्रत्येकाने जबाबदारीने पाळावे.
अन काय सांसदीय धरून बसलात ? उप मुख्यमंत्रीमहोदयांचे उद्गार आठवा .. त्यापूर्वी एक मुख्यमंत्री म्हणाले . या तीन क्ष़़़़ बाया आहेत !! आता बोला ?
तेव्हा तर्री वाढ्वा मालक .. मजा येईल , जे आपल्याबरोबर येतील ते आपले , जे ठसका लागतो म्हणतील , ते आपसूकच थांबतील. मिपावर न येण्याचा प्रत्येकाचा अधिकार अबाधित आहे !
काय हे शिंचे .. हल्ली चांगले धागेच निघत नाहीत !
In reply to ह्म्म.... by विटेकर
In reply to साधारण १ -१/२ by शिल्पा ब
माझी काही उत्तरे