नमस्कार मिपाकर,
हा माझा मिपावर लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. मला मिपावरच्या सर्व जाणकार मंडळींकडुन थोडीशी माहिती हवी आहे व आशा करतो कि तुम्ही सगळे मला पुर्णपणे मदत करतील.
मी सध्या कामानिमित्त लंडन येथे आहे आणि लवकरच काम संपवून भारतात परत जाणार होतो. पण, आज अचानक सकाळीच डिलीवरी मॅनेजरचा फोन आला कि मला एका नवीन प्रोजेक्टसाठी Stolkholm, स्वीडन येथे जावे लागेल. माझे जाणे नक्की झाले तर माझ्यासोबत बायको आणि मुलगा (वयः १ वर्ष) सोबत येतील.
गुगलवर स्वीडनची सगळी माहिती तर मिळाली तरीपण बरेच प्रश्न अनुत्तरीत आहेत. कोणी मिपा सदस्य तेथे राहत असतील किंवा जावून आले असतील तर खालील प्रश्नांची उत्तरे कळ्वून योग्य ती मदत करावी हि नम्र विनंती.
१) हवामान फार थंड असते हे माहिती आहे पण साधारण १ वर्ष मुलाकरीता राह्ण्यायोग्य आहे का?
२) भारतीय पदार्थ सहज उपलब्ध आहेत का?
३) घर भाड्याने घेण्यास काही अडीआडचणी आहेत का?
४) भाडेकरार करवयाचा असला तर कमितकमी किती महीने/वर्षे साठी करावा लागतो?
५) योग्य वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे का? व त्वरीत मिळ्ते का? (लंडनमध्ये वैद्यकीय सेवा मिळ्ण्यास बरीच कटकट आहे. Doctor ची appointment ३-४ दिवसांनी मिळ्ते तोपर्यंत आपला ताप पळालेला तरी असतो किंवा आणखीन भयंकर तरी झालेला असतो.)
६) फॅमीलीला घेउन जाण्यासाठी व १-२ वर्षे राहण्यासाठी स्वीडन ठिक आहे का?
वाचने
7852
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक सूचना
तेच तर. असले फुकटसल्ले मी
In reply to एक सूचना by श्रीरंग_जोशी
१) हवामान फार थंड असते हे
मेडीकल फॅसिलिटीज साठी सरळ
आयकर
अहो आठवले साहेब, जर स्वीडन
In reply to आयकर by रमेश आठवले
- स्वीडनमध्ये १८३ दिवसांपेक्षा कमी वास्तव्य असले पाहिजे
- पगार देणारी कंपनीचा "निवास" भारतात असला पाहिजे
- सदर भारतीय कंपनीची स्वीडनमध्ये "स्थावर आस्थापना" नसली पाहिजे
धागाकर्त्याने आपण १-२ वर्षे तिथे रहाण्याबद्दल लिहिले आहे. त्यामुळे स्वीडनमध्ये कर भरावाच लागेल. [यातला स्थूल-अर्थशास्त्रीय भाग असा: जर एखादा माणूस २ वर्षे देशात रहात असेल, तर देशातल्या सार्वजनिक मालमत्तेचा त्याने नियमित स्वरूपात उपभोग घेतलेला आहे. त्यासाठी त्याने आयकर भरलाच पाहिजे.] हेही बरोबर नाही कारण कलम २४(३) प्रमाणे भारतात भरलेला कर स्वीडनच्या करदायित्वातून वजावट (credit) म्हणून मिळतो. संपूर्ण करातून सुट्टी मिळत नाही. हे अगदी बरोबर आहे, कारण आयकराच्या पातळ्यांचा (slabs) फायदा मिळतो.स्वीडन
धन्यवाद
सहमत नाही
मला स्वानुभव आहे म्हणूनच
In reply to सहमत नाही by रमेश आठवले
आधी केले मग सांगितले
In reply to मला स्वानुभव आहे म्हणूनच by आदूबाळ
काहीच प्रोब्लेम नको.
आम्हाला स्टॉकहोमविषयी काहीही
.