रूपयाचे चिन्ह अन रूपयाचे अवमुल्यन

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in काथ्याकूट
18 Aug 2013 - 6:33 am
गाभा: 

रूपयाचे चिन्ह अन रूपयाचे अवमुल्यन

जुलै २०१० मध्ये भारतीय रूपया या चलनाचे नविन चिन्ह स्विकारले गेले. दैनिक सामनाच्या या बातमीनुसार अंकशास्त्रतज्ञ तसेच वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र यांच्या तज्ञांच्या मते हे चिन्ह अशुभ आहे. केवळ या कारणामुळे रूपया या चलनाचे अवमुल्यन अंतरराष्ट्रीय बाजारात होते आहे असेही या तज्ञांना वाटते. हे चिन्ह बदलण्यात यावे व त्याचबरोबर नोटांवर असलेली गांधीजींच्या प्रतिमेचीही दिशा बदलवण्यात यावी असे या तज्ञांनी सुचवलेले आहे.

मुळात देवनागरी वर्णमालेत रू. हे अक्षर सुटसुटीतपणे लिहीता येत असतांना हे नविन चिन्ह स्पर्धेव्दारे निवड केले जाणे हेच मोठे अतार्तीत होते. जुने रू. चिन्ह रदबदली करून अनेक प्रश्न उपस्थीत झाले आहेत. जेथे जेथे रू. हे चिन्ह वापरत होते तेथे तेथे नविन रूपयाचे चिन्ह वापरावे लागले असेल. टांकसाळीत नविन डाईज, नोटांवर नविन छपाई आदींमध्ये बदल करावे लागले असतील.

त्याचबरोबर संगणकाच्या लिपीमध्येही हे चिन्ह तयार करावे लागले. हा नविन फॉन्ट म्हणजे केवळ इमेज म्हणून वापरला गेल्याने बहूतेक ठिकाणी तो ठिगळासारखा दिसतो हे मान्य करावे लागेल.

नाविन्याचा शोध घ्यायला हरकत नाही पण ज्या गोष्टी प्रचलित आहेत, सोप्या आहेत त्या बदल करून काय मिळते?
या बदलाआधी रूपया हे अक्षरात लिहीता येत होतेच की. आणि केवळ चिन्ह बदल केला म्हणजे फार काही मोठी गोष्ट केली असे होत नाही. चिन्हात बदल केल्याने ज्या गोष्टी रूपया किंबहूना भारतीय चलनासोबत होत होत्या व भविष्यातही होत राहतील त्यात काही बदल होणार नाही.

देवनागरी वर्णमाला रूपया हे अक्षर रू. या चिन्हात लिहीण्यासाठी परिपुर्ण असतांना केवळ काहीतरी वेगळे करायचे हे ठसविण्यासाठी रूपयाचे नविन चिन्ह स्विकारले गेले असे म्हणता येईल.

अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र काहीही म्हणोत. भारत सरकारने रू. हे जुनेच चिन्ह कायम करावे कारण तेच जास्त लोक अजुनही वापरतात व त्याद्वारे देवनागरी लिपीची ओळख नष्ट होत नाही.

प्रतिक्रिया

हा लेख लिहील्यानंतर रूपयाच्या नविन चिन्हावर अधिक प्रकाश टाकणारा हा ब्लॉग सापडला.

हे नविन चिन्ह स्विकारतांना भ्रष्टाचार झालेला आहे. याविरूद्ध ही संघटना कायदेशीर लढाही देत आहे.
कृपया आपण अधिक माहीतीसाठी वरील ब्लॉगवर असलेल्या लेखाखाली असलेल्या कमेंट्स वाचू शकतात. त्यात रोहन या नावाने लिहीलेली कमेंट उल्लेखनीय आहे.

पाभे विषय तर मस्त काढलाहात तर माझे पण चार आणे.
१. नवीन चिन्ह स्विकारताना झालेल्या अपप्रकाराविषयीचे आ़क्षेप मला तरी बरोबर वाटतात कारण गिलीसारखी (गीतांजली) कंपनी एखादे भारतीय डिझाईन ज्वेलरी साठी स्पर्धापध्दतीने मागविते तेव्हा ती त्या स्पर्धेचे तपशील जाहीरातींद्वारे पुरेशा कालावधीत जवळपास सर्व भारतात पोहोचवू शकते. इथे तर भारतच्या चलनचिन्हाचा प्रश्न होता. ही स्पर्धा कशी व कधी घेतली गेली हे सुध्दा कळले नव्हते. नवीन चिन्ह कुठल्या निकषावर निवडले गेले हेही कळले नाही. डॉलर येन किंवा युरोवरील दोन रेषा एवढेच साधर्म्य जाणवले. भारतीयत्व कुठेही नाही.
२. डिझाइन ही कुणाची मक्तेदारी नाही हे कबूल केले तरी आयायटीचा माणूस एखादे डिझाइन बनवतो त्यावेळी त्याचे रिप्रॉडक्शन, कॉम्पॅटीबिलिटी आदी गोष्टींचा विचार करत असेल असे वाटते. त्या निकषावर हे चिन्ह पण उतरत नाही.
३. जरी हे अक्षरचिन्ह म्हणून स्विकारले आहे तेंव्हा त्याचा टायपोग्राफीकल पध्दतीने जसा विचार व्हायला हवाय( उदा. सॅन सेरीफ फॉन्टस मधे किंवा सेरीफ फॉन्टस मध्ये कसे असावे? स्टेम्प किती असावी? ते कॅरेक्टरमध्ये कसे बसेल? कीती साईजमध्ये त्याची रिडॅबिलीटी राहील, स्पेसिंग आदि निकषावर पण हे चिन्ह कुठेही उतरत नाही) तसा झाला नाही. हे मोठे शास्त्र आहे. याचा खूप वर्षे अगदी शास्त्रशुध्द रीतीने अभ्यास केला जातो. अगदी खिळे जुळविण्याच्या काळापासून ते आजच्या कम्प्युटर फॉन्टस परयन्त. तो उपयोजित कला पदवी/पदवीकेला ४ वर्षाचा विषय पण आहे.
c
c2
असेच शास्त्र देवनागरी फॉन्टसबाबतीत पण वापरले जाते. शिरोरेषा असलेल्या भारतीय भाषात व इतर उपलब्ध फॉन्टसमध्ये (उदा श्रीलिपी, आयेसेम, कृती, नुडी) हे चिन्ह कसे वापरावे याचे निर्देश नाहीत. जो तो आपला विकिपिडीयमध्ये उपलब्ध लोगोला वापर्तोय झालं. बाकी काहीही व्हेरिएशन्स नाहीत.
४. जर हे चिन्ह हाताने लिहिताना वापरले गेले तर त्याचे रुप कसे होईल याचाही विचार केला गेलेला नाही. म्हणजेच त्या रोहनने म्हणल्याप्रमाणे सिंगलपिक्सेल फॉर्म अ‍ॅव्हेलेबल नाही.

बाकी अवमूल्यन करायेचच ठरवलेय स्वतः सरकारने मग काय कशाचेही करतील. कला असो की शास्त्र. :(

संजय क्षीरसागर's picture

19 Aug 2013 - 1:25 pm | संजय क्षीरसागर

कॅलिग्राफीविषयी विचारांना नवी दिशा मिळाली, मनःपूर्वक धन्यवाद!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Aug 2013 - 9:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> अंकशास्त्रतज्ञ तसेच वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र यांच्या तज्ञांच्या मते हे चिन्ह अशुभ आहे. केवळ या कारणामुळे रूपया या चलनाचे अवमुल्यन अंतरराष्ट्रीय बाजारात होते आहे असेही या तज्ञांना वाटते. हे चिन्ह बदलण्यात यावे व त्याचबरोबर नोटांवर असलेली गांधीजींच्या प्रतिमेचीही दिशा बदलवण्यात यावी असे या तज्ञांनी सुचवलेले आहे.

हाहाहाहा. हे सर्व रोचक आहे. :)

>>> नाविन्याचा शोध घ्यायला हरकत नाही पण ज्या गोष्टी प्रचलित आहेत, सोप्या आहेत त्या बदल करून काय मिळते?

बदल हा चराचर सृष्टीचा नियम आहे तेव्हा विविध बदलांचे आपण स्वागत केले पाहिजे. केलेला, झालेला कोणताही बदल काही दिवस रुचत नाही, पण एकदा की त्याची सवय झाली, मग झालेला, केलेला बदल आपलासा वाटायला लागतो.

बाकी, चिन्हाच्या बाबतीत उल्लेख असलेला ब्लॉग वरील विषय चाळला. मला असं वाटतं आपल्या भारतीय मनाला आता (चुभुदेघे) अधिक चिकित्सेची आणि संशयाची सवय लागली आहे. चिकित्सा चांगलीच पण किती करावी, याबाबत मतभेद होऊ शकतात. आणि राहीला संशयाचा विषय तर त्याबाबत तर बोलूच नका. असा क्षणच जाईना की संशयाशिवाय काही पाहता येते, तेव्हा अशा विषयाचे नवल नाही.

अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र काहीही म्हणोत. पाभे, आपल्या मताचा आदर करुन म्हणतो की, असलेलं चिन्ह उत्तम आहे. राहीला रुपयाचे अवमुल्यन तर त्याला अनेक कारणं आहेत. भारतात डॉलरची गुंतवणूक वाढली की रुपयाचे मुल्य सुधारेल (एवढंच कळतं मला). बाकी, किरकोळ क्षेत्रात विदेशी गुंतवणूक, निर्यात वाढवणे, या आणि अशा गोष्टी आवश्यक त्यावर उतारा आहे, असे तज्ञ म्हणतात. असो, बाकी... लवकरच रुपयाचे मुल्य वाढेल अशी आपण आशा करु या...!

-दिलीप बिरुटे

जुलै २०१० मध्ये भारतीय रूपया या चलनाचे नविन चिन्ह स्विकारले गेले. दैनिक सामनाच्या या बातमीनुसार अंकशास्त्रतज्ञ तसेच वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र यांच्या तज्ञांच्या मते हे चिन्ह अशुभ आहे. केवळ या कारणामुळे रूपया या चलनाचे अवमुल्यन अंतरराष्ट्रीय बाजारात होते आहे असेही या तज्ञांना वाटते. हे चिन्ह बदलण्यात यावे व त्याचबरोबर नोटांवर असलेली गांधीजींच्या प्रतिमेचीही दिशा बदलवण्यात यावी असे या तज्ञांनी सुचवलेले आहे.

विना तोडफोड वास्तुशास्त्र किंवा तुषारचे तुश्शार करणारे यांची मदत नाही घेता येणार का?

पाभे, तुम्हाला दु:ख कशाचं आहे? चिन्ह बदलल्याचं की बदललेलं चिन्ह वास्तुशास्त्र आणि अंकशास्त्रानुसार अशुभ आहे याचं? :)

चित्रगुप्त's picture

18 Aug 2013 - 10:49 am | चित्रगुप्त

प्रतिमेचीही दिशाच कशाला ... मुळात गांधीजींचे चित्रच काढून टाकावे.
जिथे तिथे हवेच कशाला ? भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात आणखी कोणी झालेच नाही का, नोटांवर छापण्यालायक ?
खालील नोटा बघा:
५०० फ्रँक ची नोट व्हिक्टर ह्यूगो(कादंबरीकार)चे चित्र.
a
बेल्जियम ची नोटः चित्रकार Bernard van Orley चे चित्रः
s
आईन्स्टाईन चे चित्राची नोटः (इस्त्रायल)
d

फ्रान्सः ५०० फ्रँक नोटः
f

फ्रेंच चित्रकार Eugène Delacroix याचे चित्र असलेली नोटः
g

संगीतकार Hector Berlioz याचे चित्र असलेली नोटः

h

लेखक वोल्टेयर चे चित्र असलेली नोटः
j

जुलै २०१०? तुम्हाला जुलै २०११ म्हणायचं आहे का?

गंगाधर मुटे's picture

18 Aug 2013 - 1:01 pm | गंगाधर मुटे

पाभे, घाबरु नका, आहे तसे राहुद्या.

रुपयाचे जेवढे जास्त अवमुल्यन होईल तेवढा जास्त शेतकर्‍यांना फायदा होतो. देव करो आणि हा रुपया आणखी भरपूर घसरो. :)

प्रसाद गोडबोले's picture

18 Aug 2013 - 4:51 pm | प्रसाद गोडबोले

बाकी ,ह्या हिशोबाने मी सध्या शेतकरी आहे ;)

प्रसाद गोडबोले's picture

18 Aug 2013 - 4:50 pm | प्रसाद गोडबोले

अंकशास्त्रतज्ञ तसेच वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र यांच्या तज्ञांच्या मते हे चिन्ह अशुभ आहे.

=)) =)) =))

आपल्या देशातले भ्रष्ट आणि माजुरडे राजकारणीच खरे तर राष्ट्रासाठी पनौती ठरले आहेत. त्यांना निवडुन देणारे आपल्या सारखे हुशार लोक देखील त्यास हातभार लावुन आहेत.

जाता जाता :- ज्या देशासाठी इतके क्रातींकारक हुतात्मा झाले,त्यांची आठवण देशाला राहवी असे सरकारला वाटत नसावे, इतके वर्ष गांधीं शिवाय इतर प्रतिमा नोटेवर छापणे शक्य झाले नाही त्यामागे हे एक कारण असण्याची शक्यता वाटते.

नानबा's picture

19 Aug 2013 - 11:30 am | नानबा

वाचतोय... :)

यसवायजी's picture

19 Aug 2013 - 12:55 pm | यसवायजी

सुन रहा है ना तू.... रो रहा हुं मै... ;)
rupee

(जालावरुन)
--------------

या लेखाबाबत एक निरीक्षण असं की एकूण त्या चिन्हाच्या विरोधात जे काही मुद्दे जमवता येतील ते जमवले आहेत. चिन्हामुळे रुपयाचं अवमूल्यन होणं याला सपोर्ट करण्यासाठी

दैनिक सामनाच्या या बातमीनुसार अंकशास्त्रतज्ञ तसेच वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र यांच्या तज्ञांच्या मते हे चिन्ह अशुभ आहे. केवळ या कारणामुळे रूपया या चलनाचे अवमुल्यन अंतरराष्ट्रीय बाजारात होते आहे असेही या तज्ञांना वाटते. हे चिन्ह बदलण्यात यावे व त्याचबरोबर नोटांवर असलेली गांधीजींच्या प्रतिमेचीही दिशा बदलवण्यात यावी असे या तज्ञांनी सुचवलेले आहे.

वर दिलेले ओपनिंग स्टेटमेंट हे वास्तुशास्त्र किंवा फेंगशुई किंवा न्युमरॉलॉजी किंवा तत्सम "शास्त्रा"वर विश्वास नसणार्‍यांना पटणार नाही. म्हणून ते वाक्य म्हणजे या शास्त्रांवर विश्वास ठेवणार्‍यांच्या सपोर्टसाठी घेतलेलं वाटतं.

मग राहिला उरलेला ऑडियन्स (पक्षी विश्वास न ठेवणारा) त्याला पटण्यासाठी पुढे तार्किक मुद्देही घेतले आहेत.. म्हणजे
-स्पर्धा किंवा तत्सम प्रकारे हे चिन्ह ठरवण्यातली मुळातली प्रोसेसच कितपत योग्य आहे..
-त्यानंतर मग एकदा चिन्ह ठरवलंच आहे तर ते इम्प्लीमेंट करण्यात किती अडचणी येतील
-कसे मोठे बदल करावे लागतील हेही मांडलं आहे.

मग शेवटी :

अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र काहीही म्हणोत.

भारत सरकारने रू. हे जुनेच चिन्ह कायम करावे कारण तेच जास्त लोक अजुनही वापरतात व त्याद्वारे देवनागरी लिपीची ओळख नष्ट होत नाही.

असंही म्हटलं आहे. म्हणजे? "अंकशास्त्र, वास्तुशास्त्र काही म्हणोत" असंच जर असेल तर मग त्यांच्या दाखल्याने लेखाची सुरुवातच कशाला केली असा प्रश्न वाचताना पडला. म्हणजेच.. नवीन चिन्ह हे गैरसोयीचं आहे आणि जुन्या पद्धतीने रु. लिहीणं सोयीस्कर होतं हा (सोय) असा मुद्दाच मुख्य आणि पुरेसा असताना तेवढेच न मांडता केवळ अधिक सपोर्टसाठी वास्तु आणि अंकशास्त्र, अवमूल्यनाशी चिन्हाची जोडलेली (अतार्किक) लिंक आणि अन्य मुद्दे आणले गेलेत असं वाटलं.

याचा अर्थ या मुद्द्याने नाही पटलं तर त्या मुद्द्याने घ्या पण हे चिन्ह रद्दबातल ठरवा अश्या दृष्टीने मांडणी वाटली.

मांसाहार न करण्यामागे "जीवाची हत्या करु नये" अशा अँगलने प्रचार होतो पण बरेच लोक या हत्येला विशेष मानत नाहीत.. मग मांसाहाराची आहारशास्त्रीय दृष्ट्या निगेटिव्ह बाजू दाखवली जाते (योग्य असो वा नसो..).. आहारशास्त्राने न पटणार्‍या वर्गासाठी मग त्या आहाराला "तामसी" ठरवून त्यामुळे मनसुद्धा हिंसक बनतं अशीही थियरी मांडली जाते.. त्याखेरीज ज्यांना नाही पटत त्यांना मनुष्य हा पुरातनकालात शाकाहारीच होता असं पटवलं जातं... अगदीच काही नाही तर धार्मिक कारणाने निदान श्रावणात तरी खाऊ नये.. त्यामागे काहीतरी शास्त्र असेलच असं म्हटलं जातं.

मूळ मुद्दा असा की कोणताही कार्यकारणभाव न दाखवता एखादी गोष्ट चुकीची ठरवण्याच्या दृष्टीने सर्व प्रकारच्या वाचकांचं अपील निरनिराळ्या (परस्परांत विरोधाभासी का असेनात) मार्गांनी मिळवून प्रचारात्मक काहीतरी लिहील्याचा भास झाला.

पाभेकाका.. सॉरी हो.. जे जाणवलं ते लिहीलं.

साईनॉलॉजीवर चर्चा होऊ शकेल असा विचार मनात आला. कोणताही आकार पाहतांना आपलं मन तदाकार होतं आणि मनात अनिवार्यपणे विचार उमटतात. ते पॉजिटीव आहेत की नेगटीव यावर चिन्हाचा इंपॅक्ट ठरतो. तो पाहणार्‍याच्या मनाशी संबंधित असला तरीही, ताजमहाल पाहिल्यावर बहुतेक व्यक्ती शांत होतात. ॐ हा आकार देखिल तसा असावा.

Pic या साईनमधे व्यक्तिशः मला तरी काही नेगटीविटी दिसत नाही.

अर्थात, लेखातले मुद्दे `रूपयाचे चिन्ह अन रूपयाचे अवमुल्यन' निराधार आहेत कारण एकतर त्याचा देशाच्या प्रगतीशी सुतराम संबंध नाही. आणि साईन कशी आहे यापेक्षा पैसा या गोष्टीचाच इतका जबरदस्त इंपॅक्ट मानवी मनावर आहे की आपण फक्त नोट कितीची आहे ते पाहतो, साईनकडे कुणाचं लक्षही जात नाही.

All is well.
लवकरच १ डॉलर =७० रु हे चित्र पहावयास मिळाले तरी नवल वाटायचे नाही.

प्रसाद गोडबोले's picture

19 Aug 2013 - 2:55 pm | प्रसाद गोडबोले

१ डॉलर = १०० रुपये .

ह्या दिवसाची आम्ही वाट पहात आहोत ... तेवढच कॅल्क्युलेशनला सोपे जाईल =))

गंगाधर मुटे's picture

22 Aug 2013 - 4:41 pm | गंगाधर मुटे

१ डॉलर = १०० रुपये .
ह्या दिवसाची आम्ही वाट पहात आहोत ... तेवढच कॅल्क्युलेशनला सोपे जाईल

आणि तेवढाच जास्त शेतकर्‍यांच्या श्रममुल्याचा भाव वधारेल. व दोन पैसे जास्तीचे शेतकर्‍याच्या पदरात पडेल. :)

सौंदाळा's picture

19 Aug 2013 - 4:12 pm | सौंदाळा

काही दिवसापुर्वी चेपुवर नाण्यावरील चित्रांबाबत पाहीलेला मजकुरः
पुर्वी १ रुपयाच्या नाण्यावर गव्हाच्या लोंबीचे चित्र असायचे कारण तेव्हा १ रुपयात थोडातरी गहु मिळायचा.
आता १ रुपयाच्या नाण्यावर ठेंगा असतो.
काय मिळते आता १ रुपयाला?

बॅटमॅन's picture

19 Aug 2013 - 5:08 pm | बॅटमॅन

ठेंगा =)) =))

अनिरुद्ध प's picture

19 Aug 2013 - 8:02 pm | अनिरुद्ध प

नाण्याच्या आकारातिल फरक्,एक रुपयाचे नवे नाणे हे,अगदी जुन्या पन्नास पैश्याच्या नाण्याच्या आकारा एव्हडे आहे,तसेच नवीन दोन रुचे नाणे हे जुन्या एक रु च्या नाण्याच्या आकारा एव्हडे आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Aug 2013 - 2:01 am | विश्वनाथ मेहेंदळे

याचे कारण त्यातील धातूची किंमत. नाण्यातील धातूची किंमत त्याच्या चलनातील किंमतीपेक्षा जास्त झाली तर लोकं नाणी वितळवून तो धातू विकतात. म्हणून नाण्यांचा आकार कमी कमी करत रहावे लागते.

मदनबाण's picture

19 Aug 2013 - 4:22 pm | मदनबाण

Invest Safe
Barter

चर्चेचा उद्देश केवळ एकाचेच मत ग्राह्य न धरता त्या चर्चेच्या अनुषंगाने इतर मुद्यांनाही स्पर्श व्हावा हा असतो. या लेखाद्वारे आपण सर्वांनी रूपयाचे नविन चिन्ह व त्याची घसरण यावरील अनेक मुद्यांना स्पर्श केलात.

मुळात माझा अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र, भविष्य आदिंवर अजिबात विश्वास नाही. भविष्य, बुवाबाजी यांवर काही रचनाही केल्याचे काही वाचकांना स्मरत असेल.
म्हणूनच "अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र काहीही म्हणोत" असले वाक्य माझ्या लेखात मी वापरले आहे. बहूतेक वाचकांना मी अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र यांचा संबंध रूपयाच्या घसरणीशी आहे याचे समर्थन करतो आहे असे वाटून त्यांनी प्रतिवाद केल्याचे दिसून आले.

दै. सामनामधील प्रस्तूत लेखातील बातमी वाचून त्यावर टिका करण्यासाठी व रूपयाचे नविन चिन्ह कसे गरजेचे नव्हते ते ठसविण्यासाठी हा चर्चेचा धागा मांडला. माझ्या मुळ लेखात केवळ पहिल्या परिच्छेदात मी मुळ बातमीचा संदर्भ घेतला आहे.

मा. अभ्या यांनी कॅलीग्राफीचा मुद्दा व्यवस्थित मांडून माझ्या एका मुद्याचे विस्तृत विवेचन केले. संगणकावर तयार केलेल्या अक्षरांच्या लिपीतील वाक्यांमध्ये हे नविन चिन्ह खरोखर धेडगुजरी दिसते. ह्या नविन चिन्हाचे संगणकीय फॉन्ट फॅमेलीज मध्ये रूपांतर अजूनही योग्य पद्धतीने न केल्याने केवळ एकाच फॉन्ट फॅमेलीमधील चिन्हाचा उपयोग संगणकीय वाक्य लिहीतांना होत असल्याने त्या वाक्यात या चिन्हाची सलगता आढळून येत नाही.

दुसरा मुद्दा असा की रूपयाचे नविन चिन्हामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत फार काही क्रांतीकारक बदल घडून येणार नव्हता. अंकशास्त्र किंवा इतर तत्सम शास्त्रांच्या तत्वाचा व नविन चिन्हामुळे अर्थव्यवस्थेच्या घसरणे/ चढणे यांचा काही संबंध नाही ही बाजू मांडण्यासाठी मी "चिन्हात बदल केल्याने ज्या गोष्टी रूपया किंबहूना भारतीय चलनासोबत होत होत्या व भविष्यातही होत राहतील त्यात काही बदल होणार नाही" असे म्हटलेही आहे.

रूपयाचे नविन चिन्ह लागू करण्याआधीपासून देवनागरी वर्णमालेत रूपया हे चिन्ह "रू" अक्षराने आधीच परिपूर्णरित्या लिहीता येत होतेच. हे देवनागरी चिन्ह रूपया हे चलन वापरणार्‍या कोणत्याही देशांत (पाकीस्तान, श्रीलंका व इतर) वापरत नसतांना त्याचे वेगळेपण सिद्ध करीतच होते. त्याचमुळे रूपयाचे अगदीच वेगळे असे धेडगुजरी चिन्ह वापरात आणण्याची काहीच गरज नव्हती.

हे चिन्ह स्पर्धेद्वारे निवडल्या जाणार्‍या प्रक्रियेत असंसदीय पद्धत अवलंबली गेली. काही सामाजीक संघटना याविरूद्ध कायद्याची लढाई देत आहेत. ही बाबदेखील रूपयाच्या नविन चिन्हाकडे दुर्लक्षून चालणार नाही.

राहता राहीला नोटांवर असणार्‍या गांधीजींच्या प्रतिमेचा मुद्दा. भारतात इतरही अनेक महान व्यक्ती जन्माला आल्या. त्यांच्या प्रतिमाही नोटांवर छापण्यायोग्य आहेत. जर सरकारला त्यात राजकारण होते आहे असे वाटत असेल तर आपल्याकडे अनेक विषय आहेत जे नोटांवर भारतीय अस्मिता म्हणून छापले जावू शकतात जसे एखादा धबधबा, प्राणी, एखादे उत्कॄष्ट चित्र आदी. याबाबत श्री. चित्रगुप्तांनी इतर देशांच्या नोटांची चांगली उदाहरणे दिली आहेत. आपल्याकडेही जुन्या नोटेवर वाघाचे चित्र, भाक्रा नांगल धरणाचे चित्र होते हे चांगलेच आठवते.

गांधीजींचे चित्र नोटांवर आताच्या नकली नोटांच्या प्रश्नामुळे कसे अयोग्य आहे याबद्दल एक विनोदी विचार माझ्या मनात आहे. गांधीजींच्या डोक्यावर केस कमी होते. त्या डोक्याची प्रतिमा/चित्र नकली नोट बनवणार्‍यांना कमी श्रमात बनवता येणे लवकर शक्य होते. तेच चित्र जर एखाद्या भरघोस नेत्याचे असेल तर संगणकावरही जुळणी करतांना अवघड गोष्ट होते. तसली जुळणी करतांना त्या ऑपरेटरच्या डोक्याचे केस उडून जावू शकतील अशा भरघोस डोक्यावरचे केस असणार्‍या नेत्याचे चित्र नोटांवर असायला हवे. असो.

रूपयाच्या नविन चिन्हामुळे सामान्यमाणसाच्या अन भारताच्या आर्थिक बाबतीत असणारे प्रश्न सुटणार नाहीत तसेच नविन चिन्ह नाकारले जावून इतर चिन्ह स्विकारले जाणे हेही शक्य नाही. भारताचे आर्थिक बाबतीत अनेक प्रश्न विलंबीत असतांना केवळ चिन्ह बदल करणे ही गोष्ट म्हणजे फार काही मोठी गोष्ट करतो आहे हे सिद्ध करण्यासाठी हे नविन चिन्ह स्विकारले गेले अशी माझी भावना आहे.

या चर्चेत भाग घेणार्‍यांचे व सर्व वाचकांचे आभार मानून या चर्चेचा समारोप करतो.

बाळ सप्रे's picture

22 Aug 2013 - 12:39 pm | बाळ सप्रे

सर्वप्रथम रु हे रुपयाचं चिन्ह नव्हतं. रुपये या शब्दाचे लघुरुप म्हणून लिहिले जाई. इंग्लिशमध्ये Rs हे Rupees चे आणि Re हे Rupeeचे लघुरूप होत असे. आत्ताचे चिन्ह R आणि र या इंग्लिश आणि देवनागरी भाषेतील आद्याक्षरांचा सुरेख मिश्रण आहे तसेच आत्ताच्या चिन्हातील आडवी रेष ही $ € ¥ £ चलनांच्या चिन्हांशीही साधर्म्य राखून आहे.

या अक्षरचिन्हाचा टायपोग्राफिकल दृष्टीकोनातून अजुन पूर्ण विकास झाला नसला तरी तो आज ना उद्या होईलच. आता हे अक्षरचिन्ह MS Office मध्ये as a symbol उपलब्ध आहे. याचे कळफलकावरील स्थानही निश्चित करण्यात आले आहे. http://tdil-dc.in/index.php?option=com_vertical&parentid=80

बाकी अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र, साईनॉलॉजी, आणि याचिन्हाचा रुपयाच्या अवमूल्यनाशी संबंध याबाबतीत अधिकार, अनुभव वगैरे नसल्याने पास !!

चिन्हनिवड प्रक्रियेविषयी जास्त माहिती नाही पण निवडलेले चिन्ह उत्तम असल्याने त्यावरील चर्चेत जास्त रस नाही.

प्रभाकर पेठकर's picture

22 Aug 2013 - 12:48 pm | प्रभाकर पेठकर

इंग्लिशमध्ये Rs हे Rupees चे आणि Re हे Rupeeचे लघुरूप होत असे.

अनेक जणं एक रुपयालाही १ Rs. असे लिहीतात. खरं पाहता ते १ Re असे पाहिजे. पण तेवढे योग्य लेखन कोणी करीत नाही असे निरिक्षण आहे. ह्याला अज्ञान म्हणावे, आळस म्हणावे की शुद्धतेच्या आग्रहाचा अभाव म्हणावे हेच कळत नाही.

पैसा's picture

24 Aug 2013 - 5:29 pm | पैसा

असे भ्रष्टाचार अनेक ठिकाणी होत असतात. २जी, कोळसे. आणि काय काय. आपण काही करू शकत नाही.

अभ्याचा प्रतिसाद आवडला. एन आर आय ना रुपयाच्या अवमूल्यनाचा फायदा होतो हे माहित आहे.पण शेतकर्‍यांना कसा होतो हे मुटे साहेबांकडून वाचायला आवडेल.

प्रभाकर पेठकर's picture

24 Aug 2013 - 5:44 pm | प्रभाकर पेठकर

नाही होत हो. कांही अभागी जीवांना जवळ पैसे असूनही भारतात (सध्यातरी) पाठवता येत नाहीत.

रुपयाच्या घसरणीचा शेतकर्‍याना कसा फायदा होणार एत मुठे साहेबानी समजावून संगावे.
असे समजूया की सगळे शेतकरी त्यांच्या शेतीमाल डॉलर मध्ये विकताहेत. पण त्याचे वाहतूक खर्च, खते,जम्तुनाशके , शेतमजूर याचे खर्च देखील त्याच प्रमाणात वाढणार नाहीत का?