Skip to main content

बालमजूर

लेखक psajid यांनी मंगळवार, 13/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
आठ तासांच्या चक्रात बाबा माझं बालपण हरवून गेलं, अकाली प्रौढत्व दिलंत तुम्ही माझं खेळायचं राहून गेलं ........! दारिद्र्याचा बुजवण्या खड्डा लहान भावाला संगती न्हेलं, हुशारीची मलाच वाटली लाज दप्तर फेकून हाती खोरं घेतलं ........! यशाची माझ्या देऊन हमी मास्तरांनी हुशारीचं दिलं दाखलं, म्हणालात तुम्ही त्यानला “ पोटी माझ्या चार मुलं - ........... इतक्या मोठ्या दुनियेत मास्तर माझं पोरगच का अडाणी ऐकलं, शिकूनच का भाकरी मिळते किती अडाणी उपाशी मेलं ........? माझं हातपाय थकलं आता करील बहिणींच हात पिवळं, पर अपराधाची बोच मनी कुस्करलं दारिद्र्यानं बालपण कोवळं ........!” (मीच म्हणालो, त्यावेळी बाबा कि ........) “ वाईट नका वाटून घेऊ बाबा मला शिक्षण बास झालं, बुद्धीमाधल्या खड्ड्यापेक्षा पोटामधला डबरा खोलं........!! पोटामधला डबरा खोलं ........!! श्री. साजीद यासीन पठाण
लेखनविषय:

वाचने 2707
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

साजीद भाई, छान लिहिलंत बालकामगाराचं मनोगत, डोळ्यासमोर उभा राहिला तो मुलगा. ("बुद्धीमधल्या खड्ड्यापेक्षा, पोटामधला डबरा खोल.." हेही आवडलं.)

मिपावर स्वागत. अशाच आशयपूर्ण कविता येऊ द्यात!

छान लिहीलय

In reply to by जेपी

खूप सुंदर आणि आशय पूर्ण…

In reply to by भावना कल्लोळ

आशयपूर्ण

खास

वाईट नका वाटून घेऊ बाबा मला शिक्षण बास झालं, "बुद्धीमाधल्या खड्ड्यापेक्षा पोटामधला डबरा खोलं"........!! पोटामधला डबरा खोलं ........!!" व्वा! क्या बात है ! ! विदारक सत्य ! ! ! आवडली.

कविता आवडली वाचुन दृष्य डोळ्यासमोर आले.