मन म्हणते आहे !!
लेखनविषय:
काळाच्या घावाने
फरफटत जावे,
धडपडून उठावे
मन म्हणते आहे !!
ती सोनेरी क्षणे
जीवास ओलावे,
डोळ्यात गुंतावे
मन म्हणते आहे !!
जे राहिले चित्र कोरे
काही रंग भरावे,
कुंचल्यास उचलावे
मन म्हणते आहे !!
तुला शौक सुगंधाचा
विश्व गांधाळूनी यावे,
चंदनासावे झिजावे
मन म्हणते आहे !!
भ्रमराचे ओठ अन
कळीने खुलावे,
गीत होऊन जगावे
मन म्हणते आहे !!
रात्रीस धास्तावले ते
तुझ्या नजरेचे काजवे,
पहाट बनून जावे
मन म्हणते आहे !!
श्री. साजीद यासीन पठाण
दह्यारी जिल्हा - सांगली (महाराष्ट्र)
वाचने
1871
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
सुरेख
आवडली आहे एकदम.
मिपावर स्वागत
सुरेख
आवडली आहे एकदम.
मिपावर स्वागत
In reply to सुरेख by अभ्या..
तु एकटाच दोनदा स्वागत करणार मग आम्ही काय करणार?. =))
कविता आवड्ली,! लिहीत रहा!
In reply to तु एकटाच दोनदा स्वागत करणार by आनन्दिता
ओ तुम्ही फकस्त "लढ" म्हणा की ओ हाकानाका :)) जीवन गाणे गातच जावे :)
****
छान!
सुंदर..!
आशय गर्भ कविता.
बर्याच खोलातुन उमटलेल्या दिसताहेत.
मी एवढेच म्हणेन तुम्ही तुमच्या घड्या हळुहळु उलगडत चला बाकी मिपाकर आहेतच जे काय म्हणायचे ते म्हणायला :))
तुमच्या अभिप्रायबद्दल धन्यवाद !
सुरेख