Skip to main content

वेदना

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 13/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
अस्त सूर्याचा पाहुनी मी किरणांसाठी झुरतो ll १ ll ती वेळ सुरु परतीची थवा घरट्यास उडतो ll २ ll सांजेचा दीप तोही एकलाच गाभारी जळतो ll ३ ll दिव्यास सोबत माझी तो वातीत काजळतो ll ४ ll भाव दाटला नयनी अलगद गाली ओघळतो ll ५ ll जणू सन्यस्त होऊनी मी ओठी दु:ख थोपवतो ll ६ ll गोठली वेदना एकांती मी स्मृतींमागे पळतो ll ७ ll झाकून दर्दभावना सारी मी मलाच रे सावरतो ll ८ ll आरशास पाहता फिरुनी तो नकळत काही सुचवतो ll ९ ll वाटे चेहराच मला माझा काय असा फसवतो ll १० ll - सार्थबोध
लेखनविषय:

वाचने 991
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

अस्त सूर्याचा पाहुनी, मी किरणांसाठी झुरतो | ती वेळ सुरु परतीच|, थवा घरट्यास उडतो ||
अशी करुन वाचली, अजुनच आवडली.