रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (चार)
अधिक देखणे तरी निरंतर पाहणे
योगिराज विनवणें मन आले ॐ मयी । (श्री ज्ञानेश्वर महाराज)
फक्त समोर पाहण्यानं तुम्ही मनाच्या चकव्यातनं बाहेर पडू शकता!
____________________________________
ज्ञानेश्वर महाराजांच्या चित्तदशेशी एकात्मता साधून, अत्यंत शांतपणे; त्यांनी वर्णन केलेली ही काव्यात्मक प्रक्रिया समजावून घेऊ.
मनाची तीन प्रमुख अंग आहेत : दृक, वाक आणि श्राव्य.
या अभंगात महाराज दृक प्रक्रियेविषयी सांगतायत. ही एक प्रक्रिया साधल्यावर, मनाच्या इतर दोन प्रक्रिया तुमच्या काह्यात येतात... 'मन आले ॐ मयी' हा तुमचा अनुभव होतो... महाराजांच्या चित्तदशेशी आपण समरूप होतो.
______________________________
पाहणं आपल्या जाणिवेचा जवळजवळ ऐंशी ते पंचाऐंशी प्रतिशत भाग व्यापून आहे. नजर आपल्या आकलनाचं सर्वात प्रमुख साधन आहे. त्यामुळे मेंदूचा अत्यंत मोठा प्रभाग दृक स्मृतींनी व्यापला आहे.
आपल्याला वाटतं पाहतो तर आपण सदैव आहोतच, 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' यानं विशेष काय साधणार आहे? पण मजा म्हणजे आपण 'फक्त पाहत' नाही, पाहताना विचार करतो... आपण सक्रिय झालेल्या मनानं पाहतो.
त्यामुळे :
चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला
तैसा म्यां देखिला निराकार ॐ मयी ।
हा आपला अनुभव होत नाही.
आपली नजर सतत प्रकट जगावर राहते, व्यक्त गोष्टींवर राहते, आकार पाहते; सर्वव्यापी 'निराकार ' आपल्याला दिसत नाही.
_______________________
ट्राय टू अंडरस्टँड धिस,
एखाद्या निवांत वेळी पाहण्याच्या प्रक्रियेचं आकलन करून घेण्याचा प्रयत्न करा. समोरची वस्तू दिसते, मग स्मृतीतल्या आकाराशी वेरिफाय करून मन आपल्याला ती काय आहे याचं 'नांव' सांगतं. तो आकार आणि नांव स्मृतीत मॅच झालं की आपल्याला कळतं, 'सफरचंद'. पण गाडी तिथे थांबत नाही, कारण स्मृती सक्रिय झालेली असते. मग सफरचंदावरनं अॅडम, इव्ह किंवा न्यूटन> गुरुत्वाकर्षण> बाग > मग सखी बरोबर आपण गेलो होतो ती बाग डोळ्यासमोर तरळते > मग तिच्या समवेत हनीमून >त्यानंतर झालेले वादंग स्मरतात.. आणि असं होताहोता समोरचं सफरचंद दिसेनासं होतं.
थोडक्यात आपण 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' असं पाहत नाही. आपलं पाहणं आणि विचार करणं सायमल्टेनिअसली चालू असतं. आणि हे एकदा-दोनदा नाही तर नेहमी, सतत, निरंतर चालू असतं. जागेपणी आपण त्याला विचार म्हणतो आणि निद्रेत स्वप्नं, इतकाच काय तो फरक!
________________________
झेन संप्रदायात झाझेन (Zazen ) नांवाची ध्यानप्रणाली आहे. भिंती समोर साधारण दोन फूट अंतरावर बसायचं आणि शांतपणे समोरच्या रिकाम्या भिंतीकडे पाहत राहायचं. तुमच्या लक्षात येईल मनाचा प्रोजेक्टर भिंतीवर विविध प्रतिमा प्रोजेक्ट करायला लागतो आणि आतमध्ये संवाद सुरू होतो.
साधना मजेशीर आहे. दहा मिनिटं जर आपण बसलो तर केवळ काही सेकंद समोरची भिंत दिसते आणि आजूबाजूला काय चाललंय ते ऐकू येतं. त्या काही सेकंदभरापुरते आपण मनाच्या चकव्यातून बाहेर पडलेलो असतो.
'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' म्हणजे समोरची भिंत अधिकाधिक वेळ दिसणं आणि त्या वेळी आजूबाजूला चाललेलं स्पष्टपणे ऐकू येणं.
असे निर्विकल्प क्षण जितके दीर्घकालीन होतील तितकी तुमच्या जीवनात शांतता येईल. पुढेपुढे ती शांतता भिंत समोर नसताना देखिल तुम्ही अनुभवाल. कारण प्रश्न भिंतीचा नाही, मनाची अविरत प्रक्रिया थांबण्याचा आहे.
_________________________________
देहबळी देऊनी साधिली म्यां साधनी
तेणे समाधान मज जोडले ॐ मयी ।
त्या निर्वेध क्षणात तुम्हाला कळेल की पाहणारा देहापेक्षा वेगळा आहे. देह बसलाय आणि आपल्याला कळतंय. मग दैहिक विवंचनांतून तुम्ही हळूहळू मोकळे व्हायला लागाल. वय, वजन, व्याधी, वार्धक्य शरीराला आहे, आपल्याला नाही, हा उलगडा तुम्हाला होईल. त्या समाधानातून मनाची प्रक्रिया आणखी शांत व्हायला लागेल.
___________________________
अनंगपण फिटले मायाछंदा साठविले
सकळ देखिले आत्मस्वरूप ॐ मयी ।
असा निवांतपणा सघन होत गेल्यावर एक दिवस अचानक तुम्हाला, भिंत आणि शरीरामध्ये असलेलं 'अंतर' दिसेल. तुमची नजर केवळ भिंत न पाहता, शरीर आणि भिंत यातली स्पेस पाहू लागेल. त्या स्पेसवर, निराकारावर, नजर स्थिर होईल.
ज्या क्षणी तुम्हाला निराकार दिसेल त्या क्षणी समोर पाहणार्या नजरेचं रिवर्सल होईल. तुमची नजर दुहेरी होईल. भिंत आणि शरीर या दोन्ही गोष्टी ती एकावेळी पाहू लागेल.
तुम्ही समरसतेनं प्रक्रिया केली तर तुमच्या लक्षात येईल की हा निराकार फक्त समोर नाही. तो आत-बाहेर, इथे-तिथे, सर्व व्यापून आहे; सकळ आहे. प्रत्येक आकार अंतर-बाह्य व्यापून आहे. तो सकळांचं आत्मस्वरुप आहे.
तुम्हाला बुद्धाची अलौकिक बुद्धिमत्ता कळेल... 'कुणाच्याही आत कुणीही नाही'.
जग माया आहे म्हणजे `ते नाही' असं नाही. तो भास नाही. स्वच्छंद आहे. तुमचं जगणं उत्स्फूर्त होईल, आनंदाच होईल.
__________________________
पुरे पुरे आता प्रपंच पाहणे
निजानंदी राहणे स्वरुपी ॐ मयी ।
हा निराकार दिसणं तुम्हाला तरल करेल. त्या तरलतेला निजानंद म्हटलंय. तुम्ही प्रपंच कराल पण त्याचं ओझं राहणार नाही.
________________________________
ऐसा ज्ञानसागरु रखुमादेविवरु
विठ्ठलु निर्धारु म्यां देखिला ॐ मयी ।
हा निराकार सर्व ज्ञानाचा स्रोत आहे.
ओशो म्हणतात : ज्ञानी सर्वज्ञ होता है इसका मतलब ये नही की वो पंक्चर निकाल लेगा या बिना सिखे हवाई जहाज उडा लेगा. ज्ञानी जाननेकी क्षमताको उपलब्ध होता है. जिस चिज़मे वह रस लेगा उसे समग्रतासे जान लेगा (अष्टावक्र महागीता)
असा हा निराकार निर्धारानं, सदासर्वकाळ, तुमच्या समोर उभा आहे. त्याला कोणत्याही आधाराची गरज नाही. तुम्ही फक्त 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' इतकंच करायचंय.
तो आकार नाही, स्थिती आहे. आणि तुम्ही त्यापासून वेगळे नाही. तुम्ही आणि तो एकरूप आहात. केवळ मनाच्या अविरत प्रक्रियेनं तुम्हाला त्याचं दर्शन दुर्लभ झालंय.
__________________________
या काव्यपंक्ती प्रक्रिया आणि परिणाम दोन्ही सांगतात. 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' ही प्रक्रिया आहे आणि 'मन आले ॐ मयी' हा मनाच्या 'वाक' भागावर तिचा होणारा परिणाम आहे.
'मन आले ॐ मयी' ही तितकीच रम्य स्थिती आहे. वैखरी>मध्यमा>परा>पश्यंती या प्रक्रियेतनं आपण ध्वनिशास्त्र काय आहे ते जाणून घेणार आहोत. स्वरमाधुर्य कशानं निर्माण होतं याचा वेध घेणार आहोत . त्या प्रक्रियेनं आपण वैश्विक शांतीशी एकरूप होतो.
'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' यावरचे प्रतिसाद आणि अनुभव तुम्ही लिहीलेत, की त्याविषयी पुन्हा केव्हा तरी.
In reply to या धाग्यावर किंवा या विषयावर by अभ्या..
In reply to या धाग्यावर किंवा या विषयावर by अभ्या..
मनाच्या दोन विंग्ज आहेत, एक ऑडिओ आणि दुसरी विज्युअल.मग आता ही तीन अंग कुठून आली? अंग आणि विंग्ज यात फरक काय? ऑडिओ म्हणजे श्राव्य आणि विज्युअल म्हणजे दृक ना? मग हे तिसरे 'अंग' कुठून आले?
In reply to का हो पहिल्या भागात तर दोन विंग्ज आहेत असे सांगितले होते by लंबूटांग
In reply to आमच्या एका मित्रवर्यांनी एका by धन्या
In reply to एका निरुपद्रवी संप्रदायाच्या by मोदक
In reply to थोडा तर्क लावत जा की राव. by धन्या
In reply to ईश्श्य! by निराकार गाढव
In reply to बाकी तुमचे सदस्यनाम लैच क्यूट by बॅटमॅन
In reply to अस आहे होय. मी हा अभंग असा by प्रकाश घाटपांडे
In reply to प्रचलित अभंगातले शब्द - by संजय क्षीरसागर
In reply to "निरंजन पाहणे" सुद्धा असू by आदूबाळ
In reply to तुम्ही म्हणता ते सगळे केल्या by ज्ञानोबाचे पैजार
In reply to संसार आणि अध्यात्म यात विरोध कुठे आहे? by संजय क्षीरसागर
असे प्रतिसाद, आपल्या श्रद्धास्थानांवर आपलाच विश्वास नाही हे दर्शवतात. तोही एकवेळ व्यक्तिगत प्रश्न आहे पण त्यामुळे आपण इतरांची दिशाभूल करतो याचं भान असणं आगत्याचं आहे.जर कोणी आपल्या विचारां बद्दल असहमती दर्शवली तर त्याचा प्रतिवाद करताना व्यक्तीगत टिका करण्याचे काहिच प्रयोजन नाही. ज्ञानोबाराया मला पूर्णपणे उलगडला असा माझा मुळीच गैरसमज नाही. किंबहुना मी ज्ञानोबारायासारखा होण्याचा मुळी प्रयत्नच करत नाही. ती निर्गुण निराकार आवस्था त्यालाच लखलाभ होवो. माझ्या मर्यादांची मला पुर्णपणे जाणीव आहे, त्यातच माझ्या बरोबर निवृतीनाथांसारखा गुरु ही नाही. त्या मर्यादांमधे राहुन तुम्ही ज्या मर्गावर चालायचा प्रयत्न करता तो माझ्या सारख्या सामान्यांसाठी नाही इतकेच मी सांगु इच्छीतो. त्याही पुढे जाऊन, अध्यात्म मृत्यूचा धसका संपवत :- या असल्या दाव्यांनाच माझा विरोध आहे. अध्यात्मामुळे नक्की कोणते फायदे तोटे याचा दावा या क्षेत्रातले दिग्गजदेखील करत नाहीत. तो पुर्णपणे व्यक्तीगत सापे़क्ष अनुभव असतो. असल्या सवंग दव्यांमुळेच माझ्या सारखे सामान्य लोक साशंक होतात. सध्या देहात असलो तरी मुळात आपण विदेह आहोत :- हा देह आहे म्हणुनच आपल्याला विदेही पणाची जाणीव होते. समजा हा देहच नसता तर? पिंजर्यातल्या पोपटाला पिंजरा तोडणे शक्य नसते. उगाच त्याला गरुडभरारीची स्वप्ने दाखवु नयेत. मन तुम्हाला फसवतंय. मानसिक धारणांमुळे आपल्याला आपण व्यक्ती आहोत असं वाटतंय :- माझे मन मला का बरे फसवेल? ते माझ्याशी का म्हणुन वैर घेईल? माझे मन जर खरोखर माझे असेल तर ते माझ्या हिताचाच विचार करेल. मनाच्या शक्ती बद्दल बोलायचे झाले तर वेगळा धागा काढावा लागेल. आणि क्षणभर समजून चालु की तुमचे मन तुमच्याच विरुध्द बंडखोरी करतय. तर त्याला जागेवर आणायचे सोडुन तुम्ही त्याला बाजुला फेकुन द्यायला सांगत आहात. घरातला लहान मुलगा जर बंडखोरी करु लागला तर त्याला वठणीवर आणायचे की त्याला दुर्लक्षीत करुन बाजुला टाकायचे? माझे शरीर, माझे मन,माझा मेंदु व त्यातल्या माझ्या स्मृती आणि सगळ्यात शेवटी माझा आत्मा हे सगळे एकत्र म्हणजे मी आहे. या पैकी एकाच्याही अनुपस्थीतीमुळे माझे अस्तित्व संपते. तेच तर दुर्दैव आहे कारण मिल्खा किती भागेल? आणि कितीही भागला तरी शेवटी त्याला मृत्यू गाठेलच :-यात तुम्ही काहीच नविन सांगत नाही आहात. मृत्यु हेच एकमेव शाश्र्वत सत्य या जगात आहे. मिल्खा धावला किंवा नाही धावला तरी त्याचा मृत्यु अटळ आहे. आणि हाच नियम या जगात आलेल्या सगळ्यांसाठी आहे. पण त्या चित्रपटाने जो आनंद मला दिला त्या आनंदाची तुलना मी तुम्ही वर्णन केलेल्या आनंदाशी केली तेव्हा चित्रपट बघणे मला जास्त आनंददायी वाटले. ज्याला निवांतपणी झाला नाही त्याला निर्वाणीच्या क्षणी, त्या घालमेलीत, निराकाराचा उलगडा असंभव आहे. :- मुळात ज्ञान हे जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्ती कडे सारखेच असते. ते वढु शकत नाही किंवा कमी होउ शकत नाही. चांगला गुरु सुध्दा नेहमी तुम्हाला तुमच्या कडल्या ज्ञानाची जाणीव करुन देत असतो. माझ्या कडे जे आहेच त्याची जाणीव फक्त माझ्या मेंदुच्या पातळीवर करुन घ्यायचा हा सगळा खाटाटोप वाटतो.जो प्रश्र्ण आपल्याला डिग्रीच्या परिक्षेला विचारला जाणार आहे त्याची तयारी के.जी. मधे कशाला करायची? वेळ आली की सगळे आपोआप समजेलच ना.
.......अरे रे रे रे........!
अजूनी तो हरित नयनांचा आला नाही का धाग्यावरी? की मनी विहरते आहे त्याच्या "संदेशा"ची ती परी ? करोनी कौतुके घेतो, तो कुणाही झाडावरी कडवट निघते आतून,ती-जो-देतो ती कॅडबरी सावध रहा हो नव अभ्यागत,बोक्य्या पासूनी या..! परगोलॅक्स वर्खुनी देतो,सांगतो ही "मिठाई" खा..! गोड गोड वाटून आपण भक्षितो दोन/तिन "गोळ्या" तरी..! नंतर सुरु होते आपुली - डबडे घेऊन बारी ! जेंव्हा आपण पुसतो तयाला,का मजला फसविले..! म्हणतो तो "ह्या-ह्या" करूनी,"अत्ता का तुझ्या लक्षात आले???" आजचा तांब्या संपला ,जातो टाकून मी जिल्बी..! नव-लेखकूंन्नो सावध राहा हो, अचानक व्हाल एल्बी..! =))In reply to .......अरे रे रे रे........! by अत्रुप्त आत्मा
परगोलॅक्स वर्खुनी देतो,सांगतो ही "मिठाई" खाहे तर लै भारी.
In reply to झकास षटकार... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to वर दिलेला प्रतिसाद वाचला की वस्तुस्थिती नक्की काय आहे by संजय क्षीरसागर
In reply to .......अरे रे रे रे........! by अत्रुप्त आत्मा
In reply to +१ by अवतार
In reply to खरे स्थितप्रज्ञ कोणालाही सुधारण्याचे प्रयत्न करत नाहीत, करेक्ट! by संजय क्षीरसागर
बुद्ध त्याच्या वेळीही लोकांना समजला नव्हता आणि शून्यत्वाची त्याची संकल्पना अजूनही लोकांना समजत नाही. अभ्यास वाढवा.बुद्ध त्याच्या वेळी लोकांना समजत नव्हता म्हणून त्याने आकांडतांडव केल्याचे किंवा लोकांशी तुच्छतेने बोलल्याचेही कुठे नमूद नाही.
In reply to खरे स्थितप्रज्ञ कोणालाही सुधारण्याचे प्रयत्न करत नाहीत, करेक्ट! by संजय क्षीरसागर
बुद्ध त्याच्या वेळीही लोकांना समजला नव्हता...मूळ वाक्य नीट वाचले तर अर्थ कळू शकेल. "आम्हाला कोणी समजूनच घेत नाही", अशी तक्रार एकाही स्थितप्रज्ञाने केल्याचे आजवर तरी ऐकिवात नाही बुद्ध किती लोकांना समजला होता यापेक्षा बुद्धाने किती लोकांना समजून घेतले हे जास्त महत्वाचे आहे. अभ्यास वाढवण्याची गरज कोणाला आहे हे यातून स्पष्ट व्हावे.
तुमचं आकलन स्वतंत्रपणे मांडा मग बघू...वरील प्रतिसादात स्वतंत्र आकलन मांडण्याचाच प्रयत्न केला आहे. स्वतंत्र आकलन केवळ लेखातूनच मांडता येते हे आजच कळले. जे सत्य मोजक्या शब्दांत मांडता येते त्यासाठी भाराभर शब्द वापरणे हे इतरांना सोयीचे वाटत असले तरी मला गैरसोईचे वाटते.
मग बघू...हे आव्हान झाले. आवाहन नव्हे. आव्हान देणे आणि स्वीकारणे हे अहंकाराच्या पातळीवर शोभून दिसते. सत्याच्या शोधात असणाऱ्यांना स्वत:चे म्हणणे सिद्ध करण्यासाठी आव्हान देण्याची गरज पडू नये.
In reply to अरेरे ! by अवतार
In reply to >वरील प्रतिसादात स्वतंत्र आकलन मांडण्याचाच प्रयत्न केला आहे? by संजय क्षीरसागर
In reply to इतके सारे लोक आपल्या विरुद्ध by धन्या
In reply to लोक लेखनाविषयी लिहीत नाहीयेत by संजय क्षीरसागर
ज्ञानेश्वरांसारख्या व्यक्तीच्या काव्यपंक्तीवर लोक ही ज्ञानसुमनं उधळतायंत!...
नाहीतर काय. कळतच नाही काही कुणाला इथे.
In reply to नाही तर काय! by निराकार गाढव
In reply to >वरील प्रतिसादात स्वतंत्र आकलन मांडण्याचाच प्रयत्न केला आहे? by संजय क्षीरसागर
बुद्धाला अवहेलना सहन करावी लागली..याचा अर्थ ज्यांची अवहेलना होते ते सर्वच बुद्ध असतात, असा नक्कीच नाही.
तुम्हाला थोडं जरी अध्यात्मिक आकलन असतं.., तुम्हाला भिती वाटलेली दिसतेयालाच रोपटे मुळांसकट उपटून काढणे असे म्हणतात.
पण पुढे स्वतःची चूक लक्षात आली हे नशिब.हे लिहिण्याची संधी तुम्ही इतरांना कधी देणार?
In reply to अरेरेरेरे ! by अवतार
In reply to इथे वारंवार विनोदी आणि हास्यास्पद कोणाला ठरवले जात आहे? by संजय क्षीरसागर
प्रत्येक जण बुद्धच आहे, कुणाला ते समजेल कुणाला नाहीया वाक्यावरून आपली एकूण आध्यात्मिक कुवत लक्षात आली आहे.
असली मुळं काय कामाची?रोपटे एकाने उपटले म्हणून दुसऱ्या ठिकाणी ते रुजणारच नाही असे नाही. तेव्हा रोपट्याच्या मुळांना दोष देण्यापेक्षा ते उपटणाऱ्या हातांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे.
नांव `अवतार' पण प्रतिसाद काय दिलेत ते पाहा.., अवहेलना करणार्यांना शून्यवाद कळला नाही.., चर्चा भरकटवण्याचा प्रयत्न खरं तर हास्यास्पद आहेतुम्ही वापरत असलेल्या या भाषेमुळेच चर्चा लेखनविषयावर न होता लेखकाविषयी होते आहे. आणि हे तुमच्या प्रत्येक धाग्यावर होत आहे. त्यासाठी काही विशिष्ट सदस्य आणि त्यांची मानसिकता जबाबदार नाही हे सत्य समजून घेणे हे अंतिम सत्य समजण्यापेक्षाही अधिक महत्वाचे आहे.
In reply to हाहाहा! by अवतार
प्रत्येक जण बुद्धच आहे, कुणाला ते समजेल कुणाला नाही!>या वाक्यावरून आपली एकूण आध्यात्मिक कुवत लक्षात आली आहे? पुन्हा प्रगाढ अज्ञान दर्शन! आहो, बुद्ध याचा अर्थ सत्य. द काँस्टंट स्टेट, द अबसल्यूट. मला वाटलं होतं तुमचा अभ्यास कमी पडतोय. आता तर आभ्यास शून्य आहे असं दिसतं. सर्व शोध त्या स्टेटचा आहे. ती स्थिती आपलं स्वरूप आहे आणि आपण त्यावेगळे नाही हे ज्ञानेश्वर महाराज सांगतायंत : अनंगपण फिटले मायाछंदा साठविले सकळ देखिले आत्मस्वरूप ॐ मयी । याचा अर्थ ते आत्मस्वरूप सकळांचं आहे. इट इज एवरी वन्स रियालिटी. आता तुमच्या इतक्या फंडामेंटल चुका आहेत (आणि त्यावर पुन्हा `अवतार' वगैरे आयडी घेऊन कडी केली आहे) म्हटल्यावर तुमच्याशी चर्चा करण्यात अर्थ उरला नाही. माझ्या लेखांचं सोडा, आता तुम्ही स्वतःचं बघावं हे ब्येस्ट राहिल.
In reply to क्या बात है! by संजय क्षीरसागर
द काँस्टंट स्टेट, द अबसल्यूटबुद्ध याचा खरा अर्थ Awakened म्हणजे पूर्ण जागृतीच्या अवस्थेत असलेला असा आहे. सत्य हे स्थिर, अचल आणि अपरिवर्तनीय आहे हे माहित असणे वेगळे आणि त्या सत्याच्या डोहात स्वत:च्या जाणीवेला विलीन करणे हे वेगळे. ह्याच स्थितीला आपुले मरण पाहिले म्यां डोळा असे म्हटले आहे. दुसऱ्यांना अभ्यास वाढवण्याचे सल्ले देण्यापेक्षा इतक्या लोकांनी दिलेला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला मनावर (की भ्रमरावर) घेतलात तर उत्तम.
तुमच्याशी चर्चा करण्यात अर्थ उरला नाहीकाय सांगता! इतका वेळ चालली होती ती चर्चा होती? तुमच्याशी चर्चा करण्यात मुळातच काही अर्थ नाही असे सल्ले मला इतरांकडून आधीच मिळाले आहेत. तरीही इतरांना वारंवार तुच्छ लेखण्याची फंडामेंटल चूक करणे तुम्ही थांबवाल अशी अजूनही आशा होती. सत्य हे आहे की मुळात तुमच्या ह्या वृत्तीमुळे इतरांनाच तुमच्याशी गंभीर चर्चा करण्यात काही स्वारस्य उरले नाही. विषयाला सोडून येणाऱ्या विनोदी आणि उपहासात्मक प्रतिक्रियांचे हेच कारण आहे. इतक्या सदस्यांनी पदरचा वेळ खर्ची घालून केवळ चर्चा भरकटवण्यासाठी असे प्रतिसाद द्यावेत इतके तुम्ही मोठे नाही आहात.
तुम्ही स्वतःचं बघावंआमचं आम्ही बघू शकतोच. त्यासाठी तुमची कोणालाच गरज नव्हती आणि नाही. हाच सल्ला तुम्ही स्वत: वापरून पाहिलात तर कदाचित भ्रमराला थोडी स्थिरता मिळू शकेल.
In reply to प्रगाढ अज्ञान ! by अवतार
In reply to इतरांना वारंवार तुच्छ लेखण्याची फंडामेंटल चूक? by संजय क्षीरसागर
In reply to ह्या संस्थळावर by अवतार
In reply to श्रीयुत अवतार by संजय क्षीरसागर
In reply to श्रीयुत अवतार by संजय क्षीरसागर
माझ्याशिवाय कोण प्रतिवाद करणार?इतर धाग्यांवर जर उपहासात्मक प्रतिसाद आले तर लेखकाच्या बाजूने त्यांचा प्रतिवाद करायला इतर सदस्य पुढाकार घेतात. तुमच्या धाग्यांवर मात्र हे काम तुम्हाला एकट्यालाच का करावे लागते हे तुमच्या लक्षात येईल तो सुदिन.
In reply to खरं तर मी सोडून देत होतो आणि आता ही सोडून देणार होतो by संजय क्षीरसागर
सतत निष्कारण उपहासात्मक प्रतिसाद आणि असंबद्ध विडंबनं या मागची मानसिकता एकदा उलगडून दाखवतो म्हणजे पुन्हा असं करण्यापूर्वी जरा विचार केला जाईल.मी त्या मानसिकतेबद्दल वाचायला उत्सुक आहे. लवकर लिहा.
In reply to सतत निष्कारण उपहासात्मक by धन्या
In reply to @मी त्या मानसिकतेबद्दल by अत्रुप्त आत्मा
In reply to त्यात काय एव्ह्ढं? by निराकार गाढव
In reply to @ तर पुन्हा पुन्हा वाचायचं.>> by अत्रुप्त आत्मा
जे काव्य "टाकलं" गेलं,ते स्वतःवर आहे,की अजून कोणावर एव्हढंही कळायचं भान व कॉमनसेन्स न राहिलेल्या मंद मती माणसाची कथित वैचारिक उंची,कुठे सूर मारत असेल...हे कळणं अवघड नाही!
! ======================================= आजचा कू विचार- आपली कुठलीही वैचारिक उंची नाही वाढली तरी चालेल, पण वैचारिक तळ गाठता आला'च पाहिजे!In reply to खरं तर मी सोडून देत होतो आणि आता ही सोडून देणार होतो by संजय क्षीरसागर
खरं तर मी सोडून देत होतो आणि आता ही सोडून देणार होतो हे नक्की कशाबद्दल लिहिलेले आहे?In reply to खरं तर मी सोडून देत होतो आणि आता ही सोडून देणार होतो by संजय क्षीरसागर
In reply to खरं तर मी सोडून देत होतो आणि आता ही सोडून देणार होतो by संजय क्षीरसागर
In reply to ??? by क्लिंटन
In reply to तुम्ही पूर्ण प्रतिसाद न वाचता सर्व सदस्यांची दिशाभूल करतायं by संजय क्षीरसागर
In reply to बरं बुवा. तुम्हीच बरोबर. by क्लिंटन
In reply to गिरीश, आज ही तुला मी व्यक्तिशः ओळखत नाही by संजय क्षीरसागर
In reply to ? by क्लिंटन
In reply to ? by क्लिंटन
In reply to ? by क्लिंटन
In reply to रुणुझुणु by राजा सोव्नी
In reply to अक्षरदेखील सुवाच्य आहे by राजेश घासकडवी
In reply to अक्षरदेखील सुवाच्य आहे by राजेश घासकडवी
In reply to सुवाच्य हा शब्द शुद्ध by बॅटमॅन
In reply to हे पहा by राजेश घासकडवी
In reply to अहो बुद्धाच्या वेळीही झेन by बॅटमॅन
In reply to ते कोअन्स नसून क्ॐस आहे by राजेश घासकडवी
In reply to लादेन या ध्यानप्रक्रियेतल्या by बॅटमॅन
In reply to उपहासात्मक प्रतिसाद आणि by कवितानागेश
In reply to उपहासात्मक प्रतिसाद आणि by कवितानागेश
In reply to पैजारबुवा भाग मिल्खा भाग" by मदनबाण
In reply to प्रत्येकाने बघावाच असा हा व्हिडियो by चित्रगुप्त
In reply to धन्यवाद काका ! मला माहित होते by मदनबाण
भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे.असेही म्हणाला आहात (संदर्भ : http://www.misalpav.com/node/24998) थोडक्यात ज्ञानेश्वर माऊली काही ठिकाणी योग्य आणि काही ठिकाणी व्यर्थ बोलतात असे आपले मत आहे काय ? ह्यावर जरासा प्रकाश पाडावा . (अवांतर : हा प्रश्न गिरीजा तांबे ह्यांनी विचारला आहे कि प्रसाद गोडबोले ह्यांनी की मुहम्मद अब्दुल्ला ह्यांनी की शेल्डन कुपर ह्यांने उत्तरावर परिणाम पडु नये अशी अपेक्षा आहे . अवांतर २: वरील आणि ह्या अवांतराला उत्तर देण्याचे टाळल्यास धागा अवांतरात जाण्याचे टाळता येईल .)
In reply to काही प्रतिसाद मात्र उल्लेखनीय आहेत! by संजय क्षीरसागर
अहो कोण तुम्ही? स्वतःच्या एकूणच आवाक्याबद्दल इतके गैरसमज असतात तुमचे,मिपाकरांना या फुटकळ लेखांवर टिप्पणी करून पांडित्याची हौस आहे असं का वाटतं तुम्हाला?
In reply to पण मी कदाचित हे लेखन समजायला by स्पा
- जे आहे ते बेशर्त स्विकारून पाहाआहे ना सोप्पं?
In reply to पण मी कदाचित हे लेखन समजायला by स्पा
In reply to पण मी कदाचित हे लेखन समजायला by स्पा
In reply to स्पा रे ... by चौकटराजा
कारण उणीवेची जाणीव ही जाणीवेची पहिली पायरी आहे मित्रा !चोक्कस्स्स !
In reply to माय गॉड! इतका इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स? by संजय क्षीरसागर
In reply to प्रतिसादाचं शीर्षक + पहिलं by लंबूटांग
In reply to त्याचा संपूर्ण प्रतिसाद - केवळ ह्याच नाही तर इतरही धाग्यांवर? by संजय क्षीरसागर
In reply to फुटलो मी अक्षरशः by लंबूटांग
या धाग्यावर किंवा या विषयावर