मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सद्गदीत

अज्ञातकुल · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
हलकेच खुणावे मज कोणी अंतरी सुरस श्रावण गाणी मन सुप्त कहाणी एकेरी व्यापल्या साचल्या आठवणी प्राजक्त क्षणांची ही वाणी ओळखी सख्यांची आळवणी उमले दरवळ कर्पुरी उरी नि:संग नितळ जणु की पाणी आकार निराकारात खुळा भिरभिर घरभर ही चाचपणी आनंद कधी विरहात भरे सद्गदीत द्वय हृदय पापणी ……………… अज्ञात

वाचने 1467 वाचनखूण प्रतिक्रिया 4

मिसळलेला काव्यप्रेमी 05/08/2013 - 23:43
प्राजक्त क्षणांची ही वाणी ओळखी सख्यांची आळवणी उमले दरवळ कर्पुरी उरी नि:संग नितळ जणु की पाणी
हे कडवे फार आवडले.

वेणू 12/08/2013 - 09:18
खरं सांगू का, मन सुप्त कहाणी एकेरी.. इथून पुढे कविता वाचल्या गेलीच नाही... ह्या निरातिशय सुंदर ओळीतच अडकले आहे