मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रेषा आणि लढाया

प्रसाद साळवी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
त्वेषाने त्या भांडत होत्या रेघोट्यांच्या मधल्या जागा एकसंध धरतीला तोडीत जशा उन्हाळी सलत्या भेगा पुन्हा एक त्यांना होण्याला दोनच रस्ते आता उरती पाऊस पडून चिखल होणे किंवा उन्हाने होणे रेती

वाचने 838 वाचनखूण प्रतिक्रिया 2