रात्रीस उखाणा सुचला
लेखनविषय:
काव्यरस
मी शब्द तुला सुचलेला, उधळून लावीतो कविता
मी सूर उसवले दोन्ही, तिसर्याच्या उदयाकरता
बघणार्या नजरांमधले वाटेत थांबले अंतर
नजरेच्या क्षितिजाआडून सतरंगी जंतरमंतर
वाजवता रंग उद्याचे, शत-गंध मोकळे होती
ओघळत्या सेकंदांचे अडवून ठेवले मोती
देऊळ-खांबा पक्षी क्षत-पंख पुसे इवलासा
रदबदली अंधाराशी, हा निव्वळ फोल दिलासा
वितळत्या भूतकाळातून निसरडी पाऊले आली
घमघमत्या आज-उद्याशी आडवी-तिडवी रमली
कधी स्तब्ध उभ्या असलेल्या, डोंगरमाथ्याआडून
मुक्त स्वरांनी सरिता नाचते जाणीवा विसरून
वाचने
2654
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
छान आहे,पण शृंगार रस म्हणवा तसा फुलला नाही.
प्रेम रस मात्र भरपूर आहे. :)
शृंगार बिंगार तर सोडा, ओळीच्या शेवटाचे अक्षर शेम हाय एवड्च क्वालीफिकेशण मला तर दिसलं. :(
बाकी अजुन काय कोणाला आढ्ळल्यास समजावून सांगण्याची कृपा करावी ही नम्र विनंती.
गुर्जींना पण भर्पूर प्रेम रस कूठे दिसला कुणास ठाऊक. बहुधा ते स्वतःच प्रेमस्वरुप झाले असावेत. ;)
In reply to शृंगार बिंगार तर सोडा, by अभ्या..
@बहुधा ते स्वतःच प्रेमस्वरुप
झाले असावेत. smiley>>> =))
झाले असावेत. smiley>>> =)) काहि कळले नाहि. कोणीतरी रसग्रहण करुन समजवून सांगेल का?
मला आवडली कविता, मधली दोन कडवी नाही समजली पण बाकिचे कळले अन आवडले सुद्धा!
अरे तुम्ही सगळे एव्हढ छान कस काय टाइप करताय? अवघड आहे बुवा.......
छान आहे,पण शृंगार रस म्हणवा