तान्हुला
लेखनविषय:
चिमुकला तान्हा ठेऊन घरी
आई त्याची जाते कामावरी
असते गरज आणिक मजबुरी
करते मग ती लोभाची चाकरी
कोणी ठेविती त्याच्यासाठी दाई
परी आईची माया कोण देई
जीवापाड सांभाळ करू पाही
तरी आईची सर येणार नाही
पूर्ण वेळ ऑफिसात जातो
घरी येण्यास रोज ऊशिर होतो
वाट बघून बाळ झोपी जातो
झोपेतच तो आई आई म्हणतो
बाळ वाढले पाळ्णा घरात
आईबाबांच्या आठणी ऊरात
आसवांचा पुर लोट्ला जोरात
रडे तेंव्हा तो भावनेच्या भरात
आई मित्रांना शाळेत घेऊन जाती
बघुन त्याच्या डोळ्यांत आश्रु येती
आई वडिल आणिक नाती-गोती
पैशापुढे सर्वच विसरुन जाती
कोणी जाणा हो त्यांच्या भावनेला
नका छळू त्या कोवळ्या मनाला
भुकेले ते मातेच्या वात्सल्याला
द्यावे प्रेम आपुल्या तान्हुल्याला
..................बी.डी.वायळ
वाचने
2114
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
पहिल्या कडव्यातील 'गरज आणि मजबुरीच्या' स्वतःच्याच भावनेला कवीने शेवटच्या कडव्यांमधून छेद देत, आई-वडीलच स्वतःच्या मुलाचा 'छळ' करीत आहेत असा विचार मांडत, त्यांच्या 'गरज आणि मजबुरी' ह्या भावनेला स्वार्थाची झालर लावली आहे.
कविता सुमार आहे. ओढून ताणून 'लेडिज ऑड्यन्सला' रडवायला लिहील्यासारखी वाटते आहे.
In reply to पटलं नाही. by प्रभाकर पेठकर
नसता गरज अथ्वा मजबुरी । असे पाहिजे होते क? दुसरे म्हणजे कुणाला रडवण्यासाठी नाही लिहिली तर आज खरी वस्तुस्थितीच अशि आहे.
In reply to नसता गरज अथ्वा मजबुरी । असे by Bhagwanta Wayal
'नसता गरज अथवा मजबुरी' असे तरी कसे म्हणणार? कारण, आजकालच्या वाढत्या महागाईच्या काळात, 'गरज आणि मजबुरी' ही वस्तुस्थिती आहे.
''लेडिज ऑड्यन्सला' रडवायला...' हे पुलंच्या 'रावसाहेब' ह्या कथेतील वाक्य आहे. गमतीखातीर मी वापरले आहे.
In reply to पटलं नाही. by प्रभाकर पेठकर
नसता गरज अथ्वा मजबुरी । असे पाहिजे होते क? दुसरे म्हणजे कुणाला रडवण्यासाठी नाही लिहिली तर आज खरी वस्तुस्थितीच अशि आहे.
In reply to पटलं नाही. by प्रभाकर पेठकर
नसता गरज अथ्वा मजबुरी । असे पाहिजे होते क? दुसरे म्हणजे कुणाला रडवण्यासाठी नाही लिहिली तर आज खरी वस्तुस्थितीच अशि आहे.
काय राव तुम्ही. दीपीकेचा जमाना ग्येला म्हणता आणि असल्या अलका कुबलच्या कविता लिव्हता. :(
फक्त कन्सीस्टन्सी पायजे बघा.
चिमुकला आशा ठेऊन उरी
सोडली तळायला एकच पुरी
अशीच एका कविची मजबुरी
अठवण देते कट्यावरी...कट्यावरी =)) -------- कॉलिंग वल्ली...! (अँड लिल्या ऑल सो =)) )
किति तळयची झाली घाई
कोणिच ना कढई देई
पीठ मळतांना फाटली बाही
बायकू मागून हसली..ह्ही..ह्ही..ह्ही..ह्ही!!! =))
======================
ऊं.....म्ब....ऊंम्ब....! अता "अजून" होत नै! =))
मी दमलो...., :p अगोबा या हो ,अता तुंम्ही .... =))
================================================
भगवंता---रागावू नकोस रे........! ही चेष्टा आहे सारी! =))
तुम्ही घ्या तुमच्या मुखी त्याने तुम्हीही सुखी आम्हीही सुखी :)) :-P :-D
In reply to शारंगधर सुखकारक वटी by लीलाधर
अगं अगं लिली... तू परत शी केली...! :P =))
कागद आणा रेssss...!!! =))
लिहित राहा. पुले्शु.
-दिलीप बिरुटे
पटलं नाही.