समर्पण

सार्थबोध जे न देखे रवी...
ओढ लागली दत्ताची वाढे गोडी परमार्थाची मिळे स्फूर्ती साधनेची होई पूर्ती आनंदाची ll १ ll मूर्ती साजिरी मायेची प्रेमळ सावली वात्सल्याची उभी पाठीशी कायमची चिंता वाहे भक्तांची ll २ ll घ्यावी प्रचीती दत्तांची चित्तवृत्ती हो पावनतेची सेवा करिता चरणांची मिळे अनुभूती चैतन्याची ll ३ ll दत्तनाम घेता वाची स्वानुभव अष्टांग रोमांची राख होतसे दु:खांची हि किमया दत्तकृपेची ll ४ ll काय चिंता भविष्याची भीती कायसी अशाश्वताची मनी भावना समर्पणाची फिटेल चिंता नि:शंकची ll ५ ll श्री गुरु चरणरज, © www.saarthbodh.com
वर्गीकरण
लेखनविषय:

4 टिप्पण्या 2,837 दृश्ये

Comments

मिसळलेला काव्यप्रेमी नवीन

|| श्री गुरुदेव दत्त || __/\__

सार्थबोध नवीन

धन्यवाद मिसळलेला काव्यप्रेमी आपण माझे भजन वाचल्याबद्दल आणि आपल्या प्रतिक्रियेबद्दल मी आभारी आहे -सार्थबोध

चित्रगुप्त नवीन

भजन आवडले. b दत्तांविषयी गूगलताना हैहेय साम्राज्य, कार्तिवीर्यार्जुन, आणि त्याचा परशुरामाने केलेला वध, वगैरे प्रतिमा मिळतात. दत्ताविषयीच्या पोथी-पुराणातून याविषयी काय माहिती मिळते, हे वाचण्यास आवडेल. a b j डावीकडील चित्रः राजस्थान १९ वे शतक,(ब्रिटिश म्यूझियम, लंडन) मधले चित्रः इ.स १८०० (बहुधा माळवा शैली) ब्रिटिश म्यूझियम, लंडन. उजवीकडील चित्रः 'कंपनी' शैली, १९ वे शतक.

सार्थबोध नवीन

In reply to by चित्रगुप्त

धन्यवाद चित्रगुप्त , मला ही मुद्देसूद माहिती मिळाल्यास नक्कीच पोचती करेन…