"गूढ" (बेडसे लेणी-एक गूढानुभव!)
डोंगरदरिच्या कपारितुनी, हत्ती घोडे कुठून आले?
मनी वाटते-चितारताना,अकल्पिता'ही "फुटून" गेले...!
कुण्या देशीचे कोण प्रवासी नुसता हाती छिन्नी हतोडा
हातामधुनी कसा अवतरे? मत्त हाती अन निधडा घोडा!?
गूढ म्हणावे हरेकं शिल्पा... थांग मनासी लागत नाही
जुळता जुळता सर्व गणी ते...हिशेब मन का मागत नाही!?
वॄषभ तसाही खुशाल शिंगी,रोखुनी पाहि मला जणू तो
पुराणातल्या कथे सारिखा,कळे न नक्की काय सांगतो?
गूढ म्हणू की रम्य म्हणू मी?मनास द्यावा कसला परिचय?
हे ही म्हणता,ते ही म्हणता,ढळतो माझा हरेक निश्चय!!!
कथा सूत्र ती ऐकुन झाली,तरी कल्पना ओढत नेते
पुन्हा गुढाचे वस्त्र लेवूनी,सुचता..कधि हुलकाऊन जाते.
सांगिन मी ही गूढ तिच्यातिल,समीप येइल रूप लेऊनी
सुचेल पुन्हा..लिहिन तेंव्हा...आता पाने ठेवितो मिटुनी.
========================================================
डोंगरदरिच्या कपारितुनी, हत्ती घोडे कुठून आले?
मनी वाटते-चितारताना,अकल्पिता'ही "फुटून" गेले...!
कुण्या देशीचे कोण प्रवासी नुसता हाती छिन्नी हतोडा
हातामधुनी कसा अवतरे? मत्त हाती अन निधडा घोडा!?
गूढ म्हणावे हरेकं शिल्पा... थांग मनासी लागत नाही
जुळता जुळता सर्व गणी ते...हिशेब मन का मागत नाही!?
वॄषभ तसाही खुशाल शिंगी,रोखुनी पाहि मला जणू तो
पुराणातल्या कथे सारिखा,कळे न नक्की काय सांगतो?
गूढ म्हणू की रम्य म्हणू मी?मनास द्यावा कसला परिचय?
हे ही म्हणता,ते ही म्हणता,ढळतो माझा हरेक निश्चय!!!
कथा सूत्र ती ऐकुन झाली,तरी कल्पना ओढत नेते
पुन्हा गुढाचे वस्त्र लेवूनी,सुचता..कधि हुलकाऊन जाते.
सांगिन मी ही गूढ तिच्यातिल,समीप येइल रूप लेऊनी
सुचेल पुन्हा..लिहिन तेंव्हा...आता पाने ठेवितो मिटुनी.
========================================================
सर्व छायाचित्र-वल्लींकडून साभार.
वाचने
12808
वाचनखूण
प्रतिक्रिया
45
आवडले..
बुवा.. कशाला न्हाई त्या इडंबनात वेळ वाया घालवता हो..???
मस्त..............बुवा आता एखादे दीर्घकाव्य रचायला हरकत नाही..........फोटोही चांगले काढलेत.......
In reply to मस्त..............बुवा आता by जयंत कुलकर्णी
धन्यवाद हो जयंत काका. फोटोंचि किमया वल्लींची आहे,माझी नाही. :)
सुंदर! गेलो नाहीये इथे कधी. पण सगळ्याच लेण्या जणु एक प्रश्नच देऊन परत पाठवतात बघणा-याला, की 'कसं काय???'
काव्य छान आहे !
मस्त हो आत्मुस!
आवडले.
सुंदर कविता.
तुम्ही तिथे किती भारून गेला होतात हे प्रत्यक्षच पाहिलेच आहे.
कुण्या देशीचे कोण प्रवासी नसता हाती छिन्नी हतोडा हातामधुनी कसा अवतरे? मत्त हाती अन निधडा घोडा!?'नसता हाती छिन्नी हातोडा' ही शब्दयोजना चुकीची वाटतेय. कारण ह्या शिल्पकारांनी इतर कुठलीही साधने नसता फक्त छिन्नी आणि हातोडीच्याच साहाय्याने हे अफाट काम करून खडकात कवित्व ओतलंय. थोडासा बदल कसा वाटतोय पहा. कुण्या देशीचे कोण प्रवासी असता फक्त छिन्नी हतोडा खडकामधुनी कसा अवतरे? मत्त हाती अन निधडा घोडा!
In reply to सुंदर कविता. by प्रचेतस
कुण्या देशिचे कोण प्रवासी, केवळ हाती छिन्नि हतोडा.
In reply to सुंदर कविता. by प्रचेतस
सुंदर कविता आणि लेण्यांची चित्रे !
आमचे दोन पैसे...
कुण्या देशीचे कोण प्रवासी नसता हाती छिन्नी हतोडा ऐवजी
कुण्या देशीचे कोण प्रवासी नुसता हाती छिन्नी हतोडा
असं लिहिलं तर कसं वाटेल?
In reply to सुंदर कविता आणि लेण्यांची by डॉ सुहास म्हात्रे
येकदम पर्फेक्ट.
In reply to सुंदर कविता आणि लेण्यांची by डॉ सुहास म्हात्रे
कुण्या देशीचे कोण प्रवासी नुसता हाती छिन्नी हतोडा>>> ग्रेट...ग्रेट...हेच बरोब्बर!!! (संपादक हाच बदल करा!...लवकर...प्लीज!!!)
माझा "केवळ" हा(बदललेला) शब्दपण तीच अर्थनिष्पत्ती करतो,पण परिणामकारता साधली ती इस्पिकच्या एक्क्यानेच...!!! त्यामुळे तोच बदल हवा. :)
In reply to कुण्या देशीचे कोण प्रवासी by अत्रुप्त आत्मा
केलाय..केलाय.
किती घायकुतीला येता हो अत्रुप्त. :)
In reply to सुंदर कविता. by प्रचेतस
+१११ सुचविलेल्या बदला साठी ! पण मत्त हाती की हत्ती ? ऑं ?
सुंदर कविता. शिल्पांना साजेशी.
वा बुवा!!
(अत्रुप्त आत्मा - एक गूढानुभव!)
खालील ओळीत प्रश्नचिन्हाची दुरूस्ती केली आहे.
हातामधुनी कसा अवतरे मत्त हाती अन निधडा घोडा!?
जुळता जुळता सर्व गणीते...हिशेब मन का मागत नाही!?
बाकी वेगळ्याच अनुभूतीची कविता.
खुपच छान. मस्त.
फोटो आणि वर्णन कवितेच्या माध्यमातून बघताना, वाचताना वेगळाच अनुभव आला.
सहीच.
बुवा आता एखादे दीर्घकाव्य रचायला हरकत नाही+१००
??????????????????फोटोच आवडले. गद्य वर्णन जास्त आवडले असते.
मस्त धागा.
काव्य अणि फोटो दोन्हीही अतिशय आवडले.
गुड मॉर्निन्ग झाली माझी एकदम! :)
In reply to मस्त धागा. by कवितानागेश
बुवा. एक नंबर. फोटोंबरोबर काव्या द्यायची आयडिया पण खूप आवडली
सुरेख
In reply to सुरेख by स्पा
जे आहे ते बेशर्त स्विकारून पाहाया विषयावर तेजग्यान फाउंडेशनच्या सरश्रींचं "स्विकाराची जादू" नावाचं छान पुस्तक आहे.
In reply to जे आहे ते बेशर्त स्विकारून by धन्या
भौतिक सुखांच्या राशित असतात असे निरीक्षण आहे. खरं खोटं देवाक माइत.
लय भारी रे आत्मुस.
बरं हे फोटो घेताना मांडी घालून बसला होता की नाही? ;)
वाह बुवा,
सुरेख.
औरभी आन दो.
लेण्यांइतकीच सुघड घडण !
रच्याकने कुठे आली हो ही बेडसे लेणी ?
In reply to सुघड by सस्नेह
जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत वरून पवनानगर (काळे कॉलनी) कडे जाणार्या रस्त्यावर ११/१२ किमी पुढे करूंज गाव आहे. करूंज गावातूनच उजवीकडे १/१.५ किमी आत बेडसे गाव. तिथल्याच डोंगरात ही लेणी खोदलेली आहेत.
In reply to सुघड by सस्नेह
पुण्यास आलात तर जाउ आपण.. अशी जवळ आहेत. वल्ली बुवा तल्लीन होऊन इतिहास ऐकवतात व मी इतिहासाची मस्करी करतो दोन्ही अनुभव मस्त असतील.
In reply to पुण्यास आलात तर जाउ आपण.. by चौकटराजा
वल्ली बुवा तल्लीन होऊन इतिहास ऐकवतात
पॉईंट नोटेड!वा बुवा
या लेण्या पाहायला कसे जायचे याचे वर्णन पण लिहा ना
In reply to वा बुवा by कान्होबा
काँलिंग वल्ली... तुमच्या बेडसे लेणीच्या धाग्याचि लिंक टाका हो इथे! म्हणजे कामच होइल. :)
In reply to काँलिंग वल्ली... तुमच्या by अत्रुप्त आत्मा
हे घ्या. :)
http://misalpav.com/node/16902
कविता आवडली. फटूंमुळे अजून जास्त भारी वाटले.
गुर्जी गुर्जी ब्येस्ट ब्येस्ट.
आवडले एकदम :)
व्वा बुवा!!
वल्लीच्या जबरदस्त फोटोंना तुमच्या सुंदर काव्याची साथ मिळालीय.!
लेणी आवडली !
तुमचा आणि वल्लीदा दोघांचा धागा मस्तच. मी बघितली आहेत हि लेणी.
सुरेख.
सु रे ख!
पद्य वर्णन आणि वल्लीने काढलेले फोटो आवडले!
समसमा !बहारदार !!
आणी सर्व वाचक आणी प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद!

आवडले..