मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भिंत

drsunilahirrao · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आधी आपण वाळूवर घर बांधले खेळता खेळता, तू मोडून टाकलेस ! नंतर आपण हवेत स्वप्न बांधले तू हलकेच फुंकर टाकलीस; पत्त्यासारखे कोसळले ! आता तुझ्या माझ्या आकाशाच्या मध्यभागी आपण एक कडेकोट भिंत बांधू ! - डॉ. सुनील अहिरराव http://aaskmed2.blogspot.in/2013/07/blog-post_1956.html

वाचने 1024 वाचनखूण प्रतिक्रिया 2

निनाव 17/07/2013 - 03:54
सुंदरच. खूप आवडले हे : नंतर आपण हवेत स्वप्न बांधले तू हलकेच फुंकर टाकलीस; पत्त्यासारखे कोसळले! खूपच सही सुचले आहे ।पुन्ह पुन्हा वाचली कविता :)